Monday, 6 April 2026

केंद्राच्या प्रभावी नेतृत्वामुळे संकटातही देश स्थिर; महाराष्ट्र शासन केंद्राच्या सूचनांचे पूर्णपणे पालन करेल

 राज्यात पीएनजी प्रक्रियेला गतीखत उपलब्धतेसाठी सातत्याने आढावा सुरू

– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

केंद्राच्या प्रभावी नेतृत्वामुळे संकटातही देश स्थिरमहाराष्ट्र शासन केंद्राच्या सूचनांचे पूर्णपणे पालन करेल

 

मुंबईदि. २७ :  जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर भारताने संतुलित आणि प्रभावी धोरण राबवले असूनयामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारची महत्त्वाची भूमिका आहेअसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार या संकटकाळात महाराष्ट्रात पीएनजी (पाईप्ड पद्धतीने वितरण) वितरणाला गती देण्यात येत असून खतांच्या उपलब्धतेसाठी सातत्याने आढावा घेतला जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

शेतकरी, महिला गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे सदस्य, कृषी मंडळे, बिजोत्पादक, फार्मर कप स्पर्धेत

   शेतकरीमहिला गटशेतकरी उत्पादक कंपन्यांचे सदस्यकृषी मंडळेबिजोत्पादकफार्मर कप स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणारे निमंत्रक व शेतकरी गटवनपट्टे धारक या सर्वांनी मोठ्या संख्येने डिजिटल शेती शाळांना जॉईन व्हावे असे आवाहन कृषी विभाग आणि नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामार्फत करण्यात येत आहे.

0000

संध्या गरवारे/विसंअ

हवामानातील वाढती अनिश्चितता, पावसाचा खंड आणि नैसर्गिक आपत्तींमुळे पारंपरिक कोरडवाहू शेती संकटात

 हवामानातील वाढती अनिश्चिततापावसाचा खंड आणि नैसर्गिक आपत्तींमुळे पारंपरिक कोरडवाहू शेती संकटात सापडली असून उत्पादन खर्च वाढत आहे. यावर मात करण्यासाठी कृषी विभागांतर्गत  नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामार्फत महाराष्ट्र राज्याकरिता  "हवामान अनुकूल तंत्रज्ञान अभियान" सुरू करण्यात आले. हे अभियान शेतीचा उत्पादन खर्च कमी करणे आणि प्रतिकूल परिस्थितीतही शेतकऱ्यांच्या उत्पन्नाची हमी देणे या उद्देशाने राबविण्यात येत आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी कृषी विभागाबरोबरचकृषी विद्यापीठेकृषी विज्ञान केंद्रेउमेदमाविमपशुसंवर्धन विभाग इ. यंत्रणादेखील सहभागी होत आहेत.  या अभियानाचा एक टप्पा म्हणजे हवामान अनुकूल तंत्रज्ञानावर आधारित विशेष डिजिटल शेतीशाळांचे आयोजन आहे. राज्यातील सर्व प्रकारच्या पिक पद्धतींना उपयुक्त असणाऱ्या तंत्रांची माहिती एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विद्यापीठे आणि कृषी विभागातील तज्ञ आणि प्रगतशील शेतकरी यांचेमार्फत या डिजिटल शेतीशाळामध्ये ज्ञानाचे आदान प्रदान होणार आहे. 

राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन

 राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन

-कृषीमंत्री दतात्रय भरणे

·         एप्रिल २०२६ मध्ये विशेष डिजिटल शेती शाळा

 

मुंबई,दि.३० : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आणि पानी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एप्रिल २०२६ महिन्यात चार विशेष डिजिटल शेती शाळा आयोजित करण्यात येत आहेत.राज्यातील कृषी विद्यापीठे आणि कृषी विभागातील तज्ञ आणि प्रगतशील शेतकरी यांचा यामध्ये सहभाग असून  १  ते २२ एप्रिल २०२६ दरम्यान विशेष डिजिटल शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले आहे या शेतीशाळांचा सर्व शेतक-यांनी लाभ घ्यावा असे आवाहन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले आहे.

           विशेष डिजिटल शेतीशाळांचे  वेळापत्रक व विषय :- शेतीशाळा १ (१ एप्रिल २०२६) : पेरणीपूर्व तंत्रज्ञान - बेड तयार करणे व  बेडवर टोकण करणेशून्य/कमीत कमी मशागत करणे आंतरपीक पद्धतबियाणे  उगवण क्षमता तपासणी आणि बीजप्रक्रियाशेतीशाळा २ (८ एप्रिल २०२६): जैविक व नैसर्गिक निविष्ठा उत्पादन- बीजामृतजीवामृतलिंबोळी अर्कदशपर्णी अर्कट्रायकोडर्मा तयार करण्याच्या पद्धती व फायदेशेतीशाळा ३ (१५ एप्रिल २०२६): एकात्मिक कीड व्यवस्थापन- सापळा पिकेपक्षी थांबेचिकट सापळेमित्र किटकांचे संवर्धनलिंबोळी आणि दशपर्णी अर्काचा वापरशेतीशाळा ४ (२२ एप्रिल २०२६) : भात शेतीसाठी सुधारित लागवड तंत्र- भाताची थेट पेरणी (डीएसआर),  श्री पद्धत आणि भात लावणीसाठी यांत्रिकी पद्धत. सर्व शेतीशाळा वर नमूद तारखांना सायंकाळी ७.३० वाजता सुरु होणार असून या शेती शाळांचे लाइव्ह प्रसारण  कृषी विभागनानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पपाणी फाउंडेशन आणि उमेद च्या यू-टयूब चॅनेलवर केले जाणार आहे.

सुदृढ गावांना मिळणार ‘आरोग्यसंपन्न गाव’ किताब

 सुदृढ गावांना मिळणार आरोग्यसंपन्न गाव’ किताब

माझं गावआरोग्यसंपन्न गाव’ या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य स्तरापासून ते ग्रामपंचायत स्तरापर्यंत तीन टप्प्यांवर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय समिती ही अभियानाच्या संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवणार आहे. तर आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांच्या नेतृत्वाखालील कृती समिती प्रत्यक्ष कामाचे नियोजन करणार आहे. त्याचबरोबर गाव पातळीवर आरोग्याचे मूल्यांकन करण्यासाठी विशिष्ट निकष ठरवण्यात आले आहेत. या निकषांच्या आधारे ७० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या गावांना आरोग्यसंपन्न गाव’ म्हणून गौरविण्यात येणार आहे. अशा गावांना स्मृतिचिन्हप्रमाणपत्र आणि रोख रकमेचा पुरस्कार देऊन प्रोत्साहित केले जाणार आहे. या संपूर्ण अभियानासाठी राज्य सरकारने ८०.७५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्हा परिषदपंचायत समितीगावप्राथमिक आरोग्य केंद्र यांना कोट्यवधी रुपयांपर्यंतची बक्षिसे दिली जाणार आहेत.

महाराष्ट्र धर्म स्वतंत्रता विधेयक से समाज में हो रही गलत गतिविधियों पर रोक लगेगी और ढोंग करने

 मुख्यमंत्री ने कहा कि महाराष्ट्र धर्म स्वतंत्रता विधेयक से समाज में हो रही गलत गतिविधियों पर रोक लगेगी और ढोंग करने वालों के खिलाफ कड़ी कार्रवाई की जाएगी।

इस अवसर पर अविचल देवाचार्यजितेंद्रानंद स्वामीरविंद्रपुरी महाराज और तुषार भोसले ने अपने विचार व्यक्त किए। इस दौरान विधायक एड. राहुल ढिकलेमहापौर हिमगौरी आडके-आहेरउपमहापौर विलास शिंदेस्थायी समिति के अध्यक्ष मच्छिंद्र सानपपूर्व विधायक बाळासाहेब सानपनगरसेवक तथा देशभर से आए साधु-संत और महंत उपस्थित थे।

00000

कुंभ मेला भारतीय आध्यात्मिक संस्कृति का सबसे बड़ा आयोजन है, जो मन और आत्मा की शुद्धि का पर्व

 उन्होंने कहा कि कुंभ मेला भारतीय आध्यात्मिक संस्कृति का सबसे बड़ा आयोजन हैजो मन और आत्मा की शुद्धि का पर्व है। यह विचारों के प्रदूषण को दूर कर भारतीय संस्कृति को प्रवाहित रखने का माध्यम है। सभी जाति और धर्मों के लोग इसमें शामिल होते हैंइसलिए यह राष्ट्रीय एकता और भारतीय संस्कृति का प्रतीक है। कुंभ मेले में केवल पवित्र स्नान ही नहींबल्कि संतों का मार्गदर्शन और विचारों का आदान-प्रदान भी होता हैजिससे आगामी कुंभ मेला अविस्मरणीय बनेगा।

Featured post

Lakshvedhi