Sunday, 5 April 2026

महाराष्ट्रतील जीएसटी महसुलात १२.६ टक्क्यांची वाढ; राज्याच्या कर महसुलात विभागाचा दोन-तृतीयांश वाटा

 महाराष्ट्रतील जीएसटी महसुलात १२.६ टक्क्यांची वाढराज्याच्या कर महसुलात विभागाचा दोन-तृतीयांश वाटा

 

मुंबईदि. २ : वित्तीय वर्ष २०२५-२६ दरम्यान महाराष्ट्र राज्य जीएसटी विभागाने उल्लेखनीय महसूल कामगिरी नोंदवली आहे. वस्तू व सेवा कर (GST), मूल्यवर्धित कर (VAT) आणि व्यवसाय कर (PT) यांमधून एकूण २,५१,२५६ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला असूनमागील वर्षाच्या २,२३,०८७ कोटी रुपयांच्या तुलनेत १२.६ टक्के वाढ झाली आहे.

 

राज्यांमधील जीएसटी महसूल संकलनात महाराष्ट्राने देशात अव्वल स्थान पटकावले असूनदुसऱ्या क्रमांकाच्या राज्याच्या तुलनेत येथील महसूल दुपटीपेक्षा अधिक आहे. तसेचराज्यातील जीएसटी महसूल वित्तीय वर्ष २०२४-२५ च्या तुलनेत १४.६ टक्क्यांनी वाढून १,८६,९९१ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

इंडिया स्किल्स स्पर्धेतील या विजयामुळे महाराष्ट्रातील यशस्वी

 कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागमहाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्था आणि व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय,राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ,उद्योग भागीदार व तांत्रिक संस्था यांनी हे यश मिळवण्यासाठी गेल्या वर्षभरापासून विशेष मेहनत घेतली होती. सुमारे १५,२७५ नोंदणीकृत उमेदवारांमधून जिल्हाविभाग आणि राज्य स्तरावरील चाळणी परीक्षेतून ५४ सर्वोत्तम उमेदवारांची राष्ट्रीय स्तरासाठी निवड करण्यात आली होती. स्पर्धेपूर्वी या उमेदवारांना तज्ज्ञांमार्फत विशेष 'बूटकॅम्पप्रशिक्षण आणि मानसिक तयारीसाठी समुपदेशनही देण्यात आले होते. इंडिया स्किल्स स्पर्धेतील या विजयामुळे महाराष्ट्रातील यशस्वी उमेदवारांना आता आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. २०२६ मध्ये चीनमधील शांघाय येथे सप्टेंबर मध्ये होणाऱ्या 'वर्ल्ड स्किल्सस्पर्धेसाठी आता या विजेत्यांच्या प्रशिक्षणाची पुढील फेरी लवकरच सुरू होणार आहे.

जागतिक स्तरावर भारताचे नेतृत्व करण्याची क्षमता आपल्या तरुणांमध्ये आहे. पदके

 मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले कीकेंद्रीय कौशल्य विकास मंत्री जयंत चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांचा गुण गौरव समारंभ पार पडला आहे.महाराष्ट्रातील तरुणांमध्ये अफाट कौशल्य आहेहे या निकालाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. जागतिक स्तरावर भारताचे नेतृत्व करण्याची क्षमता आपल्या तरुणांमध्ये आहे. पदके जिंकणाऱ्या सर्व उमेदवारांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या संस्थांचे मी अभिनंदन करतो. आगामी वर्ल्ड स्किल्स स्पर्धेतही महाराष्ट्र अशीच उत्तुंग कामगिरी करेलयाची मला खात्री आहे.महाराष्ट्र २०२७ मध्ये राज्यस्तरीय महिला कौशल्य चॅम्पियन्स ही स्पर्धा सुरू करणार आहे.

इंडिया स्किल्सची आगामी स्पर्धा होणार मुंबईत

 इंडिया स्किल्स स्पर्धेत महाराष्ट्राची दमदार कामगिरी !

४ सुवर्ण पदकांसह एकूण १७ पदक केली प्राप्त

कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले विजेत्यांचे कौतुक

इंडिया स्किल्सची आगामी स्पर्धा होणार मुंबईत

 

मुंबईदि.३ :  'वर्ल्ड स्किल्सस्पर्धेसाठी रंगीत तालीम मानल्या जाणाऱ्या 'इंडिया स्किल्स २०२५-२६स्पर्धेत महाराष्ट्रातील स्पर्धकांनी ४ सुवर्ण८ रौप्य आणि ५ कांस्य पदकांची  अशी एकूण १७ पदके प्राप्त केली आहेत. उत्तर प्रदेश येथे ग्रेटर नोएडा मधील इंडिया एक्स्पो सेंटर अँड मार्ट येथे ही स्पर्धा पार पडली. आगामी २०२७-२०२८ ची ही स्पर्धा मुंबईत होण्यासाठी शिफारस करण्यात आली आहे या यशाबद्दल राज्याचे कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी संपूर्ण चमूचे आणि विजेत्या खेळाडूंचे मनापासून अभिनंदन केले आहे.

पोलीस उपनिरीक्षक शारीरिक चाचणीचा सुधारित कार्यक्रम जाहीर

 पोलीस उपनिरीक्षक शारीरिक चाचणीचा सुधारित कार्यक्रम जाहीर

 

मुंबईदि. ३ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा-२०२३ या परीक्षेत शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची चाचणी पूर्वी प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आली होती. आता सुधारित कार्यक्रमानुसार ही शारीरिक चाचणी १५ ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत घेण्यात येणार आहे.

पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा-२०२३ या परीक्षेचा निकाल ९ मे २०२५ रोजी जाहीर करण्यात आला होता.परीक्षेत शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची चाचणी पूर्वी प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आली होती.

आता सुधारित कार्यक्रमानुसार ही शारीरिक चाचणी १५ ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत घेण्यात येणार आहे. चाचणी नवी मुंबई येथील पोलीस मुख्यालयरोडपालीसेक्टर १७कळंबोली येथे पार पडणार असून ती डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीद्वारे घेतली जाणार आहे.

उमेदवारांनी शारीरिक चाचणीच्या तयारीच्या दृष्टीने याची नोंद घ्यावीअसे आवाहन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने करण्यात आले आहे. चाचणीचा सविस्तर कार्यक्रम महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात आला असल्याचे आयोगाने कळविले आहे.

शैक्षणिक धोरणाच्या संदर्भातून विकसित महाराष्ट्रासाठी शिक्षण

 मुख्यमंत्री  मान्यवरांच्या हस्ते एका स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आलेत्याचप्रमाणे ‘बेस्ट प्रॅक्टीसेस  ऑफ गोंडवाना युनिव्हर्सिटी या पुस्तिकेचे प्रकाशनही याप्रसंगी पार पडलेराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरु डॉमनाली क्षीरसागर यांनी आभार मानलेदोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत देशभरातील शिक्षण  उद्योग क्षेत्राशी निगडित तज्ज्ञ आणि प्रतिनिधी सहभागी झाले आहेतनव्या शैक्षणिक धोरणाच्या संदर्भातून विकसित महाराष्ट्रासाठी शिक्षण या थीमवर आधारित महाराष्ट्र ज्ञान सभेचे हे आयोजन होत आहे.

आले. त्याचप्रमाणे ‘बेस्ट प्रॅक्टीसेस ऑफ गोंडवाना युनि

 याप्रसंगी मुख्यमंत्री  मान्यवरांच्या हस्ते एका स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आलेत्याचप्रमाणे ‘बेस्ट प्रॅक्टीसेस  ऑफ गोंडवाना युनिव्हर्सिटी या पुस्तिकेचे प्रकाशनही याप्रसंगी पार पडलेराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरु डॉमनाली क्षीरसागर यांनी आभार मानलेदोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत देशभरातील शिक्षण  उद्योग क्षेत्राशी निगडित तज्ज्ञ आणि प्रतिनिधी सहभागी झाले आहेतनव्या शैक्षणिक धोरणाच्या संदर्भातून विकसित महाराष्ट्रासाठी शिक्षण या थीमवर आधारित महाराष्ट्र ज्ञान सभेचे हे आयोजन होत आहे.

 

Featured post

Lakshvedhi