Sunday, 5 April 2026

महाराष्ट्रतील जीएसटी महसुलात १२.६ टक्क्यांची वाढ; राज्याच्या कर महसुलात विभागाचा दोन-तृतीयांश वाटा

 महाराष्ट्रतील जीएसटी महसुलात १२.६ टक्क्यांची वाढराज्याच्या कर महसुलात विभागाचा दोन-तृतीयांश वाटा

 

मुंबईदि. २ : वित्तीय वर्ष २०२५-२६ दरम्यान महाराष्ट्र राज्य जीएसटी विभागाने उल्लेखनीय महसूल कामगिरी नोंदवली आहे. वस्तू व सेवा कर (GST), मूल्यवर्धित कर (VAT) आणि व्यवसाय कर (PT) यांमधून एकूण २,५१,२५६ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला असूनमागील वर्षाच्या २,२३,०८७ कोटी रुपयांच्या तुलनेत १२.६ टक्के वाढ झाली आहे.

 

राज्यांमधील जीएसटी महसूल संकलनात महाराष्ट्राने देशात अव्वल स्थान पटकावले असूनदुसऱ्या क्रमांकाच्या राज्याच्या तुलनेत येथील महसूल दुपटीपेक्षा अधिक आहे. तसेचराज्यातील जीएसटी महसूल वित्तीय वर्ष २०२४-२५ च्या तुलनेत १४.६ टक्क्यांनी वाढून १,८६,९९१ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi