Friday, 3 April 2026

एससीईआरटीने एआयच्या माध्यमातून इयत्ता दुसरी ते पाचवीतील विद्यार्थ्यांच्या वाचन क्षमतेचे आणि एकूण प्रगतीचे

 एआय च्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे मूल्यांकन

 

एससीईआरटीने एआयच्या माध्यमातून इयत्ता दुसरी ते पाचवीतील विद्यार्थ्यांच्या वाचन क्षमतेचे आणि एकूण प्रगतीचे मूल्यांकन करण्यासाठी निपुण महाराष्ट्र उपक्रमांतर्गत नाविन्यपूर्ण प्रयोग राबवले आहेत. विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे विश्लेषण करून शिक्षक व प्रशासनाला त्वरित निर्णय घेणे सुलभ झाले आहे. डिजिटल प्रशासनाच्या क्षेत्रातही परिषदेने लक्षणीय प्रगती केली असून एकूण 152 पैकी 135.5 गुण मिळवत उच्च कामगिरी नोंदवली आहे. ई-ऑफिस प्रणालीत 100 टक्के अंमलबजावणी करत 96.94 टक्के फाइल्स निकाली काढण्यात आल्या आहेत. सर्व 92 कर्मचारी ई-ऑफिसवर सक्रिय असून कार्यालयीन कामकाज अधिक गतिमान झाले आहे.

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे विश्लेषण ई-गव्हर्नन्समध्ये एससीईआरटीची उल्लेखनीय झेप

 कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे विश्लेषण

ई-गव्हर्नन्समध्ये एससीईआरटीची उल्लेखनीय झेप

 

मुंबईदि. 29 — कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीचे रिअल-टाइम विश्लेषण आणि ट्रॅकिंग करणाऱ्या राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटीची) महाराष्ट्र शासनाच्या 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकताच सर्वोत्तम आयुक्त / संचालक गटातील 68 सहभागींपैकी तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करुन एससीईआरटीला गौरविण्यात आले असून परिषदेच्या वतीने सहसंचालक डॉ. कमलादेवी आवटे आणि उपसंचालक ज्योती शिंदे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. परिषदेचे तत्कालीन संचालक राहुल रेखावार यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे शिक्षण व्यवस्थेत डेटा-आधारित निर्णयप्रक्रियेला मोठी चालना मिळाली आहे.

एसटीने बेकायदेशीर मार्ग व वाहनांची माहिती नियमितपणे संकलित करून आर.टी.ओ. विभागास देणे,

 एसटीने बेकायदेशीर मार्ग व वाहनांची माहिती नियमितपणे संकलित करून आर.टी.ओ. विभागास देणेसंगनमत व गैरप्रकारांविरोधात स्वतंत्र चौकशी समिती नेमणेतसेच जीपीएस व फोटो रिपोर्टिंगसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून कारवाई अधिक पारदर्शक करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. अवैध प्रवासी वाहतूक रोखण्यासाठी परिवहन विभाग व महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने संयुक्तपणे काम करण्यावर भर देण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.

अवैध वाहतूक रोखण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करणे

 परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणालेअवैध वाहतूक रोखण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करणे अत्यावश्यक आहे. एसटीकडून उपलब्ध करून दिलेल्या वाहनांचा वापर केवळ कारवाईसाठीच करण्यात यावा. त्याचा कोणताही गैरवापर सहन केला जाणार नाही. तसेचआर.टी.ओ.च्या सर्व ५९ कार्यालयांना आवश्यक संसाधने उपलब्ध करून देण्यासाठी एसटीने तातडीने कार्यवाही करावी. प्रत्येक संयुक्त कारवाईचा फोटो व लेखी अहवाल मुख्य कार्यालयात सादर करणे बंधनकारक असूननिष्क्रिय व जबाबदारी टाळणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही परिवहन मंत्री सरनाईक यांनी दिला.

अवैध प्रवासी वाहतुकीवर कठोर कारवाई करणार

 अवैध प्रवासी वाहतुकीवर कठोर कारवाई करणार

- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

 

मुंबईदि.२ : अवैध प्रवासी वाहतूक रोखण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करणे गरजेचे असून अवैध प्रवासी वाहतूकीवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला.

 

अवैध प्रवासी वाहतुकीस आळा घालण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाच्या बांद्रा येथील कार्यालयात मोटार परिवहन विभाग व एसटी महामंडळाची उच्चस्तरीय आढावा बैठक झाली.

मीरा-भाईंदर परिसरात विशेष मोहीम राबवून सर्व रिक्षा

 मीरा-भाईंदर परिसरात विशेष मोहीम राबवून सर्व रिक्षा परवान्यांची सखोल तपासणी करण्यात येईल  यासाठी महिनाभराचा विशेष कॅम्प आयोजित करून प्रत्येक कागदपत्राची बारकाईने छाननी करण्यात येईल. आवश्यकतेनुसार अधिकारी व कर्मचारी तैनात करण्याचेही आदेश देण्यात आले असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

परवाने देण्याची प्रक्रिया ऑनलाइन असली तरी बोगस कागदपत्रांच्या आधारे

 परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणालेपरवाने देण्याची प्रक्रिया ऑनलाइन असली तरी बोगस कागदपत्रांच्या आधारे परवाने दिल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रात काही परदेशी नागरिकांनी  रहिवासी दाखले मिळवून रिक्षा व टॅक्सी परवाने प्राप्त केल्याच्या घटनेची सखोल चौकशी करण्यात येईल. सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांना मागील काही वर्षांत दिलेल्या परवान्यांची तपासणी करण्याचे निर्देश देत या मोहिमेची सुरुवात मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातून करण्यात येणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

Featured post

Lakshvedhi