अवैध प्रवासी वाहतुकीवर कठोर कारवाई करणार
- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई, दि.२ : अवैध प्रवासी वाहतूक रोखण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करणे गरजेचे असून अवैध प्रवासी वाहतूकीवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला.
अवैध प्रवासी वाहतुकीस आळा घालण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाच्या बांद्रा येथील कार्यालयात मोटार परिवहन विभाग व एसटी महामंडळाची उच्चस्तरीय आढावा बैठक झाली.
No comments:
Post a Comment