केवळ जनजागृती वाढली नाही, तर बालविवाहाविरुद्ध सामूहिक लढा अधिक बळकट झाला आहे. 2030 पर्यंत देशातून बालविवाह पूर्णपणे समाप्त करण्याच्या निर्धाराला या उपक्रमामुळे नवी उर्जा मिळाली आहे. तज्ञांच्या मते, प्रत्येक मुलीला शिक्षणाचा हक्क, सन्मान आणि सुरक्षित भविष्य मिळवून देण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्रितपणे पुढे येणे आवश्यक आहे. बालविवाहमुक्त भारताच्या दिशेने ही मोहीम एक महत्त्वाचा टप्पा ठरली आहे.
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Wednesday, 11 March 2026
महिला व बाल विकास विभागाने कमिटेड कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्ट (सीसीडीटी) या संस्थेची नोडल एजन्सी
महिला व बाल विकास विभागाने कमिटेड कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्ट (सीसीडीटी ) या संस्थेची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती केली होती. मुंबई जिल्हा व मुंबई उपनगर जिल्हा कार्यालयाने संस्थेच्या समन्वयातून विविध स्तरांवर जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात आल्या.
मोहिमेअंतर्गत ‘बालविवाह मुक्ती रथ’ मुंबई, मुंबई उपनगर तसेच पुणे जिल्ह्यातील शहरी झोपडपट्ट्या, ग्रामीण तसेच आदिवासी भागांमध्ये फिरत राहिला. या माध्यमातून बालविवाहाचे दुष्परिणाम, मुलींचे हक्क आणि शिक्षणाचे महत्त्व याबाबत व्यापक जनजागृती करण्यात आली. तसेच समाजातील विविध घटकांना एकत्र आणून सामूहिक कृतीला चालना देण्यात आली. चाईल्डलाईप हेल्पलाईन 1098 यांचा सक्रिय सहभाग होता. तसेच मुंबई व पुण्यात समुदायातील सदस्य, फ्रंटलाईन वर्कर्स आणि स्थानिक भागधारकांनीही सक्रिय सहभाग नोंदवला, असल्याची माहिती मुंबई जिल्हा महिला व बालविकास अधिकारी शोभा शेलार यांनी दिली.
या मोहिमेमुळे केवळ जनजागृती वाढली नाही, तर बालविवाहाविरुद्ध सामूहिक लढा अधिक बळकट झाला आहे. 2030 पर्यंत देशातून बालविवाह पूर्णपणे समाप्त करण्याच्या निर्धाराला या उपक्रमामुळे नवी उर्जा मिळाली आहे. तज्ञांच्या मते, प्रत्येक मुलीला शिक्षणाचा हक्क, सन्मान आणि सुरक्षित भविष्य मिळवून देण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्रितपणे पुढे येणे आवश्यक आहे. बालविवाहमुक्त भारताच्या दिशेने ही मोहीम एक महत्त्वाचा टप्पा ठरली आहे.
०००
बालविवाहमुक्त भारतासाठी 100 दिवसांची जनजागृती मोहीम यशस्वी; 180 संभाव्य बालविवाह रोखले
बालविवाहमुक्त भारतासाठी 100 दिवसांची जनजागृती मोहीम यशस्वी;
180 संभाव्य बालविवाह रोखले
- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे
· मुंबई व उपनगर जिल्हा कार्यालयाने संयुक्तिकरित्या केलेली मोहिम यशस्वी
मुंबई दि 10 : बालविवाहमुक्त भारत घडविण्याच्या दिशेने देशात एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत महिला व बालविकास विभागाने 100 दिवसांची तीव्र जनजागृती मोहीम राबविली होती. या यशस्वी मोहिमेदरम्यान संभाव्य बालविवाहाच्या 180 प्रकरणांची ओळख पटवून त्यांना रोखण्यात यश मिळाले असून, 6 बालविवाह वेळेवर हस्तक्षेप करून थांबविण्यात आले असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
ऑक्टोबर महिन्यात सुरू झालेल्या या मोहिमेचा समारोप आंतरराष्ट्रीय महिलादिनाच्या निमित्ताने झाला. 2030 पर्यंत बालविवाहमुक्त भारत निर्माण करण्याच्या राष्ट्रीय उद्दिष्टाला बळ देणारा हा उपक्रम ठरला आहे. या ऐतिहासिक उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी महिला व बालविकास मुंबई जिल्हा कार्यालय, मुंबई उपनगर जिल्हा कार्यालय संयुक्तीकरित्या काम केले.
केंब्रिज क्लायमेट क्वेस्ट’ या उपक्रमाविषयी
‘केंब्रिज क्लायमेट क्वेस्ट’ या उपक्रमाविषयी
हा उपक्रम केंब्रिजच्या डिजिटल शिक्षण प्लॅटफॉर्मद्वारे इंग्रजी आणि मराठी भाषेत राबविण्यात येणार असून राज्यातील शासकीय, अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमधील इयत्ता आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांसाठी तो उपलब्ध असेल. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये हवामान बदलाचे विज्ञान, परिसंस्था, समुदाय आणि अर्थव्यवस्थेवरील परिणाम तसेच नवीकरणीय ऊर्जा, जबाबदार उपभोग आणि शाश्वत विकास याविषयीची समज विकसित करण्यात येणार आहे.
‘केंब्रिज क्लायमेट क्वेस्ट’ कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना कृतीआधारित आणि संदर्भाधारित शिक्षण पद्धतीद्वारे पर्यावरणीय आव्हानांवर चिकित्सक विचार करण्यास, प्रत्यक्ष जीवनातील परिस्थितींमध्ये ज्ञानाचा उपयोग करण्यास आणि शाश्वततेचा दैनंदिन जीवनाशी तसेच भविष्यातील करिअरशी संबंध समजून घेण्यास प्रोत्साहन दिले जाईल. तसेच जागतिक ‘ग्रीन इकॉनॉमी’मध्ये निर्माण होणाऱ्या संधींसाठी विद्यार्थ्यांना तयार करण्यासही या उपक्रमातून मदत होणार आहे.या उपक्रमाची अंमलबजावणी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी), जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डीआयईटी) आणि राज्यातील सहभागी शाळांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
0000
हवामान शिक्षणाला महत्त्व देण्यासाठी हा उपक्रम
राज्यमंत्री डॉ.भोयर म्हणाले, हवामान शिक्षणाला महत्त्व देण्यासाठी हा उपक्रम चालू केला आहे. आठवी आणि नवव्या वर्गाच्या विद्यार्थ्यांकरिता हा क्लायमेट क्वेस्ट ई-लर्निंग कार्यक्रमाच्या माध्यमातून जागतिक दर्जाचं पर्यावरण विषयक ज्ञान देण्याचा प्रयत्न करणार आहे. हा कार्यक्रम महाराष्ट्र शासनाच्या शाश्वत आणि पर्यावरणपूरक भविष्य घडविण्याच्या दृष्टीने बांधणीचे प्रतीक आहे. केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड असेसमेंट व महाराष्ट्र शासनाचे संयुक्त प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. सध्या हा अभ्यासक्रम इंग्रजी भाषेत सुरू करण्यात येणार असून या अभ्यासक्रमाचा मराठी अनुवाद लवकर उपल्बध करून ग्रामीण भागामधील सर्व विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमात सहभागी करुन घेता येईल.
केंब्रिज क्लायमेट क्वेस्ट’ हा ई-लर्निंग उपक्रम
पर्यावरण व हवामान बदल व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘केंब्रिज क्लायमेट क्वेस्ट’ हा ई-लर्निंग उपक्रम शालेय शिक्षण विभागाने हाती घेतला आहे. शालेय शिक्षण विभाग व केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड असेसमेंट इंडिया यांच्यासोबत झालेल्या या सामंजस्य करारामुळे पर्यावरण कसे वाचवता येईल याबाबत शालेय विद्यार्थ्यांमध्ये जाणीव जागृती निर्माण करण्यास मदत होणार आहे.
विद्यार्थ्यांना पर्यावरण, हवामान बदल आणि त्यासंबंधित विषयांवरील सविस्तर अभ्यासक्रम
शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे म्हणाले की, या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पर्यावरण, हवामान बदल आणि त्यासंबंधित विषयांवरील सविस्तर अभ्यासक्रम उपलब्ध करून दिला जाणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात इयत्ता आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांपासून या उपक्रमाची अंमलबजावणी केली जाणार असून पुढे तो अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार आहे. याशिवाय शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेबाबतही जागरूकता निर्माण करण्यासाठी विशेष उपक्रम राबवले जाणार आहेत. विद्यार्थ्यांची वैयक्तिक स्वच्छता, शाळा आणि घराच्या परिसरातील स्वच्छता याबाबत प्रत्यक्ष अंमलबजावणीवर भर दिला जाणार आहे. येत्या जून महिन्यात पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमांमध्ये शालेय शिक्षण विभाग सक्रिय सहभाग घेणार असल्याचे त्यांनी सांगितले
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...