‘केंब्रिज क्लायमेट क्वेस्ट’ या उपक्रमाविषयी
हा उपक्रम केंब्रिजच्या डिजिटल शिक्षण प्लॅटफॉर्मद्वारे इंग्रजी आणि मराठी भाषेत राबविण्यात येणार असून राज्यातील शासकीय, अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमधील इयत्ता आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांसाठी तो उपलब्ध असेल. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये हवामान बदलाचे विज्ञान, परिसंस्था, समुदाय आणि अर्थव्यवस्थेवरील परिणाम तसेच नवीकरणीय ऊर्जा, जबाबदार उपभोग आणि शाश्वत विकास याविषयीची समज विकसित करण्यात येणार आहे.
‘केंब्रिज क्लायमेट क्वेस्ट’ कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना कृतीआधारित आणि संदर्भाधारित शिक्षण पद्धतीद्वारे पर्यावरणीय आव्हानांवर चिकित्सक विचार करण्यास, प्रत्यक्ष जीवनातील परिस्थितींमध्ये ज्ञानाचा उपयोग करण्यास आणि शाश्वततेचा दैनंदिन जीवनाशी तसेच भविष्यातील करिअरशी संबंध समजून घेण्यास प्रोत्साहन दिले जाईल. तसेच जागतिक ‘ग्रीन इकॉनॉमी’मध्ये निर्माण होणाऱ्या संधींसाठी विद्यार्थ्यांना तयार करण्यासही या उपक्रमातून मदत होणार आहे.या उपक्रमाची अंमलबजावणी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी), जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डीआयईटी) आणि राज्यातील सहभागी शाळांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
0000
No comments:
Post a Comment