बालविवाहमुक्त भारतासाठी 100 दिवसांची जनजागृती मोहीम यशस्वी;
180 संभाव्य बालविवाह रोखले
- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे
· मुंबई व उपनगर जिल्हा कार्यालयाने संयुक्तिकरित्या केलेली मोहिम यशस्वी
मुंबई दि 10 : बालविवाहमुक्त भारत घडविण्याच्या दिशेने देशात एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत महिला व बालविकास विभागाने 100 दिवसांची तीव्र जनजागृती मोहीम राबविली होती. या यशस्वी मोहिमेदरम्यान संभाव्य बालविवाहाच्या 180 प्रकरणांची ओळख पटवून त्यांना रोखण्यात यश मिळाले असून, 6 बालविवाह वेळेवर हस्तक्षेप करून थांबविण्यात आले असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
ऑक्टोबर महिन्यात सुरू झालेल्या या मोहिमेचा समारोप आंतरराष्ट्रीय महिलादिनाच्या निमित्ताने झाला. 2030 पर्यंत बालविवाहमुक्त भारत निर्माण करण्याच्या राष्ट्रीय उद्दिष्टाला बळ देणारा हा उपक्रम ठरला आहे. या ऐतिहासिक उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी महिला व बालविकास मुंबई जिल्हा कार्यालय, मुंबई उपनगर जिल्हा कार्यालय संयुक्तीकरित्या काम केले.
No comments:
Post a Comment