Sunday, 8 March 2026

अत्याधुनिक ड्रोन असो की पिनाका रॉकेटसारखे तंत्रज्ञान

 मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेएकेकाळी संरक्षण सामग्रीच्या उत्पादन क्षेत्रात कुठलीही स्पष्टता नसताना सोलर समूह या क्षेत्रात कार्य करीत राहिला. आज या समूहाने देशातील आघाडीच्या संरक्षण उत्पादन कंपन्यांमध्ये स्थान मिळवले आहे. अत्याधुनिक ड्रोन असो की पिनाका रॉकेटसारखे तंत्रज्ञान असोदेशाच्या सामरिक शक्तीला नवी दिशा देण्याचे कार्य या समूहाने केले आहे. बदलत्या जगात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानसेमी कंडक्टर परिसंस्था तसेच क्वांटम टेक्नॉलॉजी महत्त्वाची भूमिका बजावित आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने संरक्षण तंत्रज्ञानएरोस्पेस आणि डीपटेक क्षेत्रासाठी नवे धोरण तयार केले. सोलरच्या माध्यमातून या धोरणांतर्गत झालेली ही सर्वात मोठी गुंतवणूक आहेयाकडे मुख्यमंत्री फडणवीस यांनी लक्ष वेधले.

राष्ट्रप्रथम’ या विचारातून सोलर इंडस्ट्रीजची वाटचाल सुरु असताना राज्य शासनाकडून त्यांना संपू्ण सहकार्य मिळेलअशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली.

देशाच्या सामरिक शक्तीला नवी दिशा देण्यात सोलर समूहाचे मोलाचे योगदान

 देशाच्या सामरिक शक्तीला नवी दिशा देण्यात सोलर समूहाचे मोलाचे योगदान

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

रोबोटिक्स अँड युएव्ही फॅसिलिटी प्रकल्पाचे भूमिपूजन

नागपूरदि. 7 - जगातील संरक्षणाचे क्षेत्र झपाट्याने बदलत आहे. नवा वर्ल्ड ऑर्डर तयार होत असून व्यापाराचाही शस्त्र म्हणून वापर होत आहे. अशा काळात ज्या देशाजवळ सामरिक शक्ती आणि तंत्रज्ञान आहेतोच देश भविष्यात आघाडीवर असेल. या दिशेने आपला देश झपाट्याने वाटचाल करत असताना देशाच्या सामरिक शक्तीला नवी दिशा देण्याचे कार्य सोलर समूह करत आहेअसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

सोलर डिफेन्स अँड एरोस्पेसच्यावतीने मिहानच्या विशेष आर्थिक क्षेत्रात उभारण्यात येणाऱ्या रोबोटिक्स अँड युएव्ही फॅसिलिटी प्रकल्पाच्या भूमिपूजन समारंभात मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस बोलत होते. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरीवित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वालखासदार श्यामकुमार बर्वेआमदार चरणसिंग ठाकूरसोलर डिफेन्स अँड एरोस्पेसचे अध्यक्ष सत्यनारायण नुवालव्यवस्थापकीय संचालक मनीष नुवालराघव नुवालहर्ष नुवाल आदी मान्यवर यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

व्यावसायिक प्रवासी विमान उड्डाण नियमित प्रमाणे सुरू आखाती देशातील प्रवाशांसाठी महत्त्वपूर्ण सूचना pl share

 व्यावसायिक प्रवासी विमान उड्डाण नियमित प्रमाणे सुरू

आखाती देशातील प्रवाशांसाठी महत्त्वपूर्ण सूचना

मुंबईदि. 7 : आखाती देशातील युद्ध सदृश्य परिस्थितीमुळे मागील काही दिवस प्रलंबित झालेली विमान सेवा व विमान उड्डाण सुरू झाली आहेत.व्यावसायिक प्रवासी विमान उड्डाणे नियमित सुरू झाल्याने  भारतीय नागरिकपर्यटक व प्रवासी भारतात येण्यासाठी आवश्यकतेनुसार थेट तिकीट आरक्षित करू शकतातअसे परराष्ट्र मंत्रालयाच्यावतीने कळविण्यात आले  आहे.

           आखाती विविध देशात अडकलेल्या प्रवाशांना याबाबत सहाय्य व अधिक माहितीसाठी असल्यास संबंधित देशातील भारतीय दूतावास अथवा भारताच्या परराष्ट्र मंत्रालयास संपर्क साधावायाबाबत माहिती महाराष्ट्र शासनाच्या  राज्य आपत्तकालीन कार्य केंद्राच्या( SEOC )वतीने देण्यात आली आहे.

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात अश्विनी भिडे यांची विशेष मुलाखत

 आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात

अश्विनी भिडे यांची विशेष मुलाखत

मुंबईदि. 7 : "आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या" निमित्ताने पायाभूत सुविधा क्षेत्रात महिलांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मा.मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव तसेच मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या (एमएमआरसीएल) व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.

मुंबईत नुकताच पूर्ण झालेला भारतातील सर्वात लांब भूमिगत मेट्रो प्रकल्प मेट्रो 3 (कुलाबा-वांद्रे-सीप्झ)’ हा अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक प्रकल्प ठरला आहे. अभियांत्रिकी कौशल्यसातत्य आणि अचूक नियोजनाच्या जोरावर या प्रकल्पाने अनेक अडथळ्यांवर मात करत यशस्वी वाटचाल केली. या प्रकल्पाच्या पूर्ततेदरम्यान आलेले अनुभवतांत्रिक अडचणी आणि त्यावर केलेल्या प्रभावी उपाययोजनांबाबत अश्विनी भिडे यांनी या मुलाखतीत सविस्तर माहिती दिली आहे.

शिबिरात विधवा महिला, दिव्यांग लाभार्थी आणि वृध्द लाभार्थ्यांचे अर्ज भ

या शिबिरात विधवा महिलादिव्यांग लाभार्थी आणि वृध्द लाभार्थ्यांचे अर्ज भरून घेण्यात आलेसंजय गांधी, श्रावणबाळ योजना अर्जाच्या अनुषंगाने आवश्यक सहकार्य व कागदपत्रे पडताळणी करण्यात आली. लाभार्थ्यांचे रहिवास प्रमाणपत्रउत्पन्न प्रमाणपत्राबाबत अर्ज भरुन घेण्यात आले. संजय गांधी निराधार व श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना समिती बैठकीमध्ये त्रुटी दर्शविण्यात आलेल्या प्रकरणामध्ये त्रुटींची पुर्तता करुन घेण्यात आली. लाभार्थ्यांचे हयात प्रमाणपत्रबाबत मार्गदर्शनज्येष्ठ नागरिकांचे ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्रकरीता अर्ज भरुन घेण्यात आले. निवृत्तीवेतनाच्या अनुषंगाने आधार संबधी त्रुटींची पुर्तता करून घेण्यात आली. तसेच दिव्यांग लाभार्थ्यांच्या निवृत्तीवेतन संबधीच्या अडचणी सोडवण्यात आल्या.

विधवा महिला, दिव्यांग लाभार्थी आणि वृध्द लाभार्थ्यांचे अर्ज

पश्चिम खेतवाडी येथे आयोजित शिबिरात विविध दाखल्यांचे वितरण

 पश्चिम खेतवाडी येथे आयोजित शिबिरात विविध दाखल्यांचे वितरण

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान

मुंबईदि. : 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानअंतर्गत मुंबई शहर जिल्ह्यात कामाठीपुरापश्चिम खेतवाडी परिसरात समाधान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये कामाठीपुरा तसेच गिरगाव परिसरातील 150 हून अधिक निराधार महिलादिव्यांग आणि इतर नागरिक यांना विविध दाखलेज्येष्ठ नागरिक यांना ओळखपत्र व संजय गांधी निराधार योजनेसंबंधीचे सर्व लाभ एकाच ठिकाणी देण्यात आले. 

या शिबिरात रिलायन्स फाउंडेशनलोढा फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थांनी सहभाग घेतला. हे शिबीर मुंबई शहरचे जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल, अपर जिल्हाधिकारी बप्पासाहेब थोरातउपजिल्हाधिकारी गणेश सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली डी-वॉर्डचे नगरसेवक गौरांग झवेरी व श्रीमती स्नेहल तेंडुलकर, संजय गांधी योजना विभागातील सर्व अधिकारी-कर्मचारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

या शिबिरात विधवा महिलादिव्यांग लाभार्थी आणि वृध्द लाभार्थ्यांचे अर्ज भरून घेण्यात आलेसंजय गांधी, श्रावणबाळ योजना अर्जाच्या अनुषंगाने आवश्यक सहकार्य व कागदपत्रे पडताळणी करण्यात आली. लाभार्थ्यांचे रहिवास प्रमाणपत्रउत्पन्न प्रमाणपत्राबाबत अर्ज भरुन घेण्यात आले. संजय गांधी निराधार व श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना समिती बैठकीमध्ये त्रुटी दर्शविण्यात आलेल्या प्रकरणामध्ये त्रुटींची पुर्तता करुन घेण्यात आली. लाभार्थ्यांचे हयात प्रमाणपत्रबाबत मार्गदर्शनज्येष्ठ नागरिकांचे ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्रकरीता अर्ज भरुन घेण्यात आले. निवृत्तीवेतनाच्या अनुषंगाने आधार संबधी त्रुटींची पुर्तता करून घेण्यात आली. तसेच दिव्यांग लाभार्थ्यांच्या निवृत्तीवेतन संबधीच्या अडचणी सोडवण्यात आल्या.

Featured post

Lakshvedhi