Sunday, 8 March 2026

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात अश्विनी भिडे यांची विशेष मुलाखत

 आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात

अश्विनी भिडे यांची विशेष मुलाखत

मुंबईदि. 7 : "आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या" निमित्ताने पायाभूत सुविधा क्षेत्रात महिलांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मा.मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव तसेच मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या (एमएमआरसीएल) व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.

मुंबईत नुकताच पूर्ण झालेला भारतातील सर्वात लांब भूमिगत मेट्रो प्रकल्प मेट्रो 3 (कुलाबा-वांद्रे-सीप्झ)’ हा अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक प्रकल्प ठरला आहे. अभियांत्रिकी कौशल्यसातत्य आणि अचूक नियोजनाच्या जोरावर या प्रकल्पाने अनेक अडथळ्यांवर मात करत यशस्वी वाटचाल केली. या प्रकल्पाच्या पूर्ततेदरम्यान आलेले अनुभवतांत्रिक अडचणी आणि त्यावर केलेल्या प्रभावी उपाययोजनांबाबत अश्विनी भिडे यांनी या मुलाखतीत सविस्तर माहिती दिली आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi