या शिबिरात विधवा महिला, दिव्यांग लाभार्थी आणि वृध्द लाभार्थ्यांचे अर्ज भरून घेण्यात आले, संजय गांधी, श्रावणबाळ योजना अर्जाच्या अनुषंगाने आवश्यक सहकार्य व कागदपत्रे पडताळणी करण्यात आली. लाभार्थ्यांचे रहिवास प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्राबाबत अर्ज भरुन घेण्यात आले. संजय गांधी निराधार व श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना समिती बैठकीमध्ये त्रुटी दर्शविण्यात आलेल्या प्रकरणामध्ये त्रुटींची पुर्तता करुन घेण्यात आली. लाभार्थ्यांचे हयात प्रमाणपत्रबाबत मार्गदर्शन, ज्येष्ठ नागरिकांचे ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्रकरीता अर्ज भरुन घेण्यात आले. निवृत्तीवेतनाच्या अनुषंगाने आधार संबधी त्रुटींची पुर्तता करून घेण्यात आली. तसेच दिव्यांग लाभार्थ्यांच्या निवृत्तीवेतन संबधीच्या अडचणी सोडवण्यात आल्या.
No comments:
Post a Comment