देशाच्या सामरिक शक्तीला नवी दिशा देण्यात सोलर समूहाचे मोलाचे योगदान
-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
रोबोटिक्स अँड युएव्ही फॅसिलिटी प्रकल्पाचे भूमिपूजन
नागपूर, दि. 7 - जगातील संरक्षणाचे क्षेत्र झपाट्याने बदलत आहे. नवा वर्ल्ड ऑर्डर तयार होत असून व्यापाराचाही शस्त्र म्हणून वापर होत आहे. अशा काळात ज्या देशाजवळ सामरिक शक्ती आणि तंत्रज्ञान आहे, तोच देश भविष्यात आघाडीवर असेल. या दिशेने आपला देश झपाट्याने वाटचाल करत असताना देशाच्या सामरिक शक्तीला नवी दिशा देण्याचे कार्य सोलर समूह करत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
सोलर डिफेन्स अँड एरोस्पेसच्यावतीने मिहानच्या विशेष आर्थिक क्षेत्रात उभारण्यात येणाऱ्या रोबोटिक्स अँड युएव्ही फॅसिलिटी प्रकल्पाच्या भूमिपूजन समारंभात मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस बोलत होते. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार चरणसिंग ठाकूर, सोलर डिफेन्स अँड एरोस्पेसचे अध्यक्ष सत्यनारायण नुवाल, व्यवस्थापकीय संचालक मनीष नुवाल, राघव नुवाल, हर्ष नुवाल आदी मान्यवर यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment