Friday, 6 March 2026

श्री क्षेत्र चोंडी विकास आराखडा परिपूर्ण असावा

 श्री क्षेत्र चोंडी विकास आराखडा परिपूर्ण असावा

-         महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे

·         पर्यावरणस्नेही पर्यटनच्या दृष्टीने देखील विचार व्हावा

 

मुंबईदि. ५ :श्री क्षेत्र चोंडी विकास आराखडा हा सर्व दृष्टीने परिपूर्ण असावा. त्याचप्रमाणे पर्यावरणस्नेही पर्यटन (इको टूरिझम) यादृष्टीने देखील त्यामध्ये सुधारणा आणि विस्तार करण्यात यावा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे हे जन्मस्थान असल्याने एकावेळी किमान 50 ते 70 हजार भाविकांची यात्रेनिमित्त सोय होऊ शकेल यादृष्टीने नियोजन असावेअशा सूचना महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी दिल्या. महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे अध्यक्षतेखाली सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वनविभाग यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आलीत्याप्रसंगी ते बोलत होते. 

शैक्षणिक क्षेत्र आणि उद्योग यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्यास

 यावेळी ‘आयआयएम’ मुंबईचे संचालक प्रा. मनोज कुमार तिवारी म्हणालेमुख्य सचिवांच्या भेटीचा आम्हाला अभिमान आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे धोरणनिर्मितीशैक्षणिक क्षेत्र आणि उद्योग यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्यास आम्हाला बळ मिळेल. भविष्याभिमुख नेतृत्व आणि प्रभावी कार्यकारी शिक्षणाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विकासाच्या आकांक्षांना पाठिंबा देण्यासाठी आयआयएम मुंबई कटिबद्ध आहे.

या संवाद कार्यक्रमात संस्थेचे डीनविभागप्रमुख आणि मुख्य प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

संस्थात्मक क्षमता मजबूत करण्याबरोबरच राज्याच्या विकास व नवोन्मेषाच्या उद्दिष्टांशी उच्च शिक्षण उपक्रमांचे समन्वय साधण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.


राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन, उद्योग आणि शैक्षणिक संस्थांमधील

 मुख्य सचिव राजेश अग्रवाल म्हणाले, राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासनउद्योग आणि शैक्षणिक संस्थांमधील समन्वय अत्यंत महत्त्वाचा आहे. आयआयएम मुंबईसारख्या संस्थांद्वारे नेतृत्व विकाससंशोधन आणि कार्यकारी शिक्षणाच्या माध्यमातून प्रशासन व उद्योग क्षेत्रात सकारात्मक परिवर्तन घडवून आणता येते. त्यामुळे विकसित महाराष्ट्राच्या ध्येयपूर्तीत अशा संस्थांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.

यावेळी ‘आयआयएम’ मुंबईचे संचालक प्रा. मनोज कुमार तिवारी म्हणालेमुख्य सचिवांच्या भेटीचा आम्हाला अभिमान आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे धोरणनिर्मितीशैक्षणिक क्षेत्र आणि उद्योग यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्यास आम्हाला बळ मिळेल. भविष्याभिमुख नेतृत्व आणि प्रभावी कार्यकारी शिक्षणाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विकासाच्या आकांक्षांना पाठिंबा देण्यासाठी आयआयएम मुंबई कटिबद्ध आहे.

या संवाद कार्यक्रमात संस्थेचे डीनविभागप्रमुख आणि मुख्य प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

संस्थात्मक क्षमता मजबूत करण्याबरोबरच राज्याच्या विकास व नवोन्मेषाच्या उद्दिष्टांशी उच्च शिक्षण उपक्रमांचे समन्वय साधण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.

विकसित महाराष्ट्रासाठी 1 ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेच्या उद्दिष्टपूर्तीसाठी प्रयत्न आवश्यक

 विकसित महाराष्ट्रासाठी 1 ट्रिलियन डॉलर्स

अर्थव्यवस्थेच्या उद्दिष्टपूर्तीसाठी प्रयत्न आवश्यक

- मुख्य सचिव राजेश अग्रवाल

आयआयएम मुंबईच्या विकास व संशोधनामुळे शिक्षण क्षेत्रात परिवर्तन शक्य

 

मुंबईदि. ५ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत’ या संकल्पनेशी सुसंगत राहून विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्याची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत नेण्याच्या उद्दिष्टात राज्यातील सर्व क्षेत्रांचे सक्रिय योगदान महत्त्वाचे आहेअसे प्रतिपादन मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी केले.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांच्या उपस्थितीत आयआयएम मुंबई कॅम्पसमधील प्रगती विहार एक्झिक्युटिव्ह डायनिंग हॉल’ चे उद्घाटन करण्यात आले.

विकासकामे करताना पर्यावरणाची हानी होणार नाही आणि स्थानिक नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही,

 विकासकामे करताना पर्यावरणाची हानी होणार नाही आणि स्थानिक नागरिकांना त्याचा त्रास होणार नाहीयाची काळजी घेण्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले.

प्रलंबित प्रश्न आणि विकासकामांवर होणारे परिणाम यावर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी कार्यवाहीची दिशा निश्चित करण्यात आली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी- दोडा मार्गचा विकास आणि पर्यावरण संवर्धन यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच सिंधुदुर्ग च्या पर्यावरणवने आणि हवामान बदल विभागाशी संबंधित विविध तांत्रिक मुद्यांसंदर्भात आढावा घेण्यात आला.

केंद्र सरकारच्या नव्या अधिसूचनेमुळे स्थानिक नागरिकांच्या प्रश्नांवर आणि रोजगारावर काय परिणाम होऊ शकतोयावर चर्चा करण्यात आली.

सिंधुदुर्गच्या जैवविविधतेचे संवर्धन आणि विकासप्रकल्पांची अंमलबजावणी करताना स्थानिक नागरिकांच्या भावना लक्षात घेऊनच पावले उचलेली जातील, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

सिंधुदुर्गच्या विकासासाठी पर्यावरण समतोल आणि जनहिताला प्राधान्य

 सिंधुदुर्गच्या विकासासाठी पर्यावरण समतोल आणि जनहिताला प्राधान्य

-         मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

 

मुंबईदि. ५ : सिंधुदुर्गच्या विकासासाठी पर्यावरण समतोल राखत स्थानिक जनतेच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे,' असे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.

केंद्र शासनाच्या २४ फेब्रुवारी २०२६ रोजीच्या अधिसूचनेच्या अनुषंगाने सिंधुदुर्गच्या विविध पर्यावरणविषयक विविध मुद्द्यांवर मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक झाली. बैठकीस माजी मंत्री व आमदार दीपक केसरकरआमदार निलेश राणेपर्यावरण विभागाच्या सचिव जयश्री भोजसिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसेउपवन संरक्षक मिलनकुमार शर्मामहाराष्ट्र जैवविविधता मंडळाचे सदस्य सचिव भारत सिंगतसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र मिळविण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन व साहाय्य

 प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र मिळविण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन व साहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळामार्फत पदविका संस्थांशी समन्वय साधून इच्छुक विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात येईल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर मिळणारे श्रेयांक विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत अतिरिक्त श्रेयांक म्हणून नोंदविण्यात येतील. या करारामुळे पदविका विद्यार्थ्यांच्या कौशल्यवृद्धीस चालना मिळण्यासोबतच त्यांना परदेशातील रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार आहे, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पाटील यांना यावेळी सांगितले.

0000

Featured post

Lakshvedhi