पायाभूत सुविधांच्या विकासाबाबत बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबईसह संपूर्ण राज्याचा चेहरा बदलणाऱ्या प्रकल्पांची माहिती दिली. मुंबईत आशियातील सर्वात मोठे 'जागतिक क्षमता केंद्र' उभारले जाणार असून त्यातून ४५ हजार रोजगार निर्माण होतील. पालघरमधील वाढवण बंदर हे जेएनपीटीच्या तिप्पट क्षमतेचे असून तो एक 'गेमचेंजर' प्रोजेक्ट ठरेल, ज्यामुळे ४० लाख कोटींची गुंतवणूक आणि ५० लाख रोजगार निर्माण होतील. याशिवाय समृद्धी महामार्ग, कोस्टल रोड आणि अटल सेतू यांमुळे राज्याची कनेक्टिव्हिटी वाढली आहे.
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Thursday, 5 March 2026
राज्याच्या औद्योगिक प्रगतीविषयी
राज्यपालांच्या अभिभाषणावर विधान परिषदेत झालेल्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी भाषणाची सुरुवात दिवंगत नेते अजित पवार यांच्या आठवणीने केली. अजितदादांच्या निधनामुळे या अधिवेशनावर दुःखाचे सावट असून त्यांनी नेहमी विकासाचे राजकारण केल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.
राज्याच्या औद्योगिक प्रगतीविषयी सांगताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र हे केवळ देशातीलच नव्हे तर जगाच्या पातळीवर गुंतवणुकीसाठी पसंतीचे राज्य बनले आहे. औद्योगिक गुंतवणुकीत महाराष्ट्र आजही देशात नंबर वन असून देशाच्या एकूण जीडीपीमध्ये राज्याचा वाटा १३.५ टक्के आहे. २०२४-२५ या वर्षात महाराष्ट्राला १ लाख ६४ हजार ८७५ कोटी रुपयांची थेट परकीय गुंतवणूक मिळाली, जी देशाच्या एकूण गुंतवणुकीच्या तब्बल ३९ टक्के आहे.
महाराष्ट्रात आता नवी औद्योगिक क्रांती.. महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत ग्वाही
महाराष्ट्रात आता नवी औद्योगिक क्रांती..
महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत ग्वाही
मुंबई, दि.२६: राज्यात गेल्या सुमारे चार वर्षांपासून स्थगितीचे राजकारण संपून प्रगतीची घौडदौड सुरू झाली आहे. महाराष्ट्रात एक नवी औद्योगिक क्रांती होत असून महाराष्ट्राच्या विकासाची गती आता कुणीही थांबवू शकणार नाही. औद्योगिक गुंतवणुकीत महाराष्ट्र आजही देशात क्रमांक एकचे राज्य आहे. राज्यात सुरू असलेल्या विकासयात्रेचे प्रतिबिंब राज्यपालांच्या अभिभाषणात उमटले असून प्रगत, समृद्ध आणि सुरक्षित महाराष्ट्र घडवणे हेच राज्य शासनाचे प्रमुख ध्येय आहे. विकास आणि लोककल्याणाची महाराष्ट्राची ही विकासयात्रा कधीही थांबणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत दिली.
राज्यपालांच्या अभिभाषणावर विधान परिषदेत झालेल्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी भाषणाची सुरुवात दिवंगत नेते अजित पवार यांच्या आठवणीने केली. अजितदादांच्या निधनामुळे या अधिवेशनावर दुःखाचे सावट असून त्यांनी नेहमी विकासाचे राजकारण केल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.
Wednesday, 4 March 2026
महाराष्ट्रात आता नवी औद्योगिक क्रांती.. महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत ग्वाही
अर्थसंकल्पीय अधिवेशन 2026
विधान परिषद कामकाज
वृत्त क्र – 26
विधानपरिषद कामकाज :
महाराष्ट्रात आता नवी औद्योगिक क्रांती..
महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत ग्वाही
मुंबई, दि.२६: राज्यात गेल्या सुमारे चार वर्षांपासून स्थगितीचे राजकारण संपून प्रगतीची घौडदौड सुरू झाली आहे. महाराष्ट्रात एक नवी औद्योगिक क्रांती होत असून महाराष्ट्राच्या विकासाची गती आता कुणीही थांबवू शकणार नाही. औद्योगिक गुंतवणुकीत महाराष्ट्र आजही देशात क्रमांक एकचे राज्य आहे. राज्यात सुरू असलेल्या विकासयात्रेचे प्रतिबिंब राज्यपालांच्या अभिभाषणात उमटले असून प्रगत, समृद्ध आणि सुरक्षित महाराष्ट्र घडवणे हेच राज्य शासनाचे प्रमुख ध्येय आहे. विकास आणि लोककल्याणाची महाराष्ट्राची ही विकासयात्रा कधीही थांबणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत दिली.
राज्यपालांच्या अभिभाषणावर विधान परिषदेत झालेल्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी भाषणाची सुरुवात दिवंगत नेते अजित पवार यांच्या आठवणीने केली. अजितदादांच्या निधनामुळे या अधिवेशनावर दुःखाचे सावट असून त्यांनी नेहमी विकासाचे राजकारण केल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.
डॉ. पंजाबराव देशमुख देशांतर्गत शिष्यवृत्ती योजनेतील सर्व लाभार्थ्यांना लाभ देणार
डॉ. पंजाबराव देशमुख देशांतर्गत शिष्यवृत्ती योजनेतील सर्व लाभार्थ्यांना लाभ देणार
-राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल
मुंबई,दि. २६: सारथी संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या डॉ. पंजाबराव देशमुख देशांतर्गत शिष्यवृत्ती योजनेतील सर्व लाभार्थ्यांना लाभ देणार असल्याचे राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी विधानसभेत सांगितले.
मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण पूर्ण करता यावे यासाठी देण्यात येणारी डॉ. पंजाबराव देशमुख देशांतर्गत शिष्यवृत्ती योजनेतील सन २०२५-२६ साठी शिष्यवृत्तीबाबत सदस्य जयंत पाटील यांनी प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना ॲड.आशिष जयस्वाल बोलत होते.
राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल म्हणाले की, सारथी संस्थेद्वारे डॉ. पंजाबराव देशमुख देशांतर्गत शिष्यवृत्ती योजना सन २०२१-२२ मध्ये सुरू करण्यात आली असून, ही योजना सन २०२१-२२ ते २०२४-२५ या कालावधीत यशस्वीपणे राबविण्यात आली असल्याने मराठा समाजातील असंख्य विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक आधार मिळाला आहे. योजनेंतर्गत २०२५-२६ मध्ये ३८८ लाभार्थ्यांना ७.२४ कोटी इतकी शिष्यवृत्तीची रक्कम वितरित करण्यात आली असून ३७९ लाभार्थ्यांना ५.९६ कोटी इतकी शिष्यवृत्ती रक्कम वितरीत करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. संस्थेला वेगवेगळ्या योजना राबविण्यासाठी ३०० कोटींचा अर्थसंकल्पीय निधी मंजूर करण्यात आला असून संस्थेच्या मागणीनुसार अतिरिक्त खर्च भागविण्यासाठी पूरवणी मागणीद्वारे आणखी १०० कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत. या निधीचे नियोजन करुन २०२५-२६ मध्येही सारथी संस्थेमार्फत लक्ष्यित गटातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणास प्रोत्साहन मिळावे यासाठी योजना राबविण्यात येत आहेत. मराठा समाजातील मुलांच्या हितासाठी शासन काम करत आहे. या योजनेसाठी मार्च २०२६ पूर्वी जाहिरात काढून लाभार्थ्यांना लाभ दिला जाईल, असे त्यांनी सांगितले.
या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य राजेश पवार, अर्जुन खोतकर, अभिजीत पाटील यांनी सहभाग घेतला.
विक्रोळीतील कन्नमवार नगर येथील क्रांतीवीर महात्मा ज्योतीबा फुले रूग्णालय १९९५
राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या, विक्रोळीतील कन्नमवार नगर येथील क्रांतीवीर महात्मा ज्योतीबा फुले रूग्णालय १९९५ बांधले होते. त्यावेळी ते १३० खाटांचे होते. हे रूग्णालय जुने झाले असल्यामुळे लोकप्रतिनिधींची मागणी लक्षात घेऊन ही इमारत निष्काषित करून पुनर्बांधणी करण्यात येत आहे. या हॉस्पिटलची ५०० खाटापर्यंत क्षमता वाढविण्यात येत आहे. म्हाडाला प्रिमीयमचे १३ कोटी रूपये दिले आहेत तसेच जागेसाठी देखील २४ कोटी रुपये दिले आहेत. म्हाडाने जागेचा ताबा दिला असून वसतीगृहाचे काम सुरू आहे. ही इमारत २१ मजली असून यामध्ये वसतीगृह, प्रशासकीय कामकाज होणार आहे. सद्यस्थितीत १२ टक्के काम पूर्ण झाले असून सन २०२८ पर्यंत या हॉस्पिटलचे काम पूर्ण होईल असेही राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या.
या प्रश्नाच्या चर्चेत विधानसभा सदस्य अबू आझमी यांनी सहभाग घेतला.
कन्नमवार नगर येथील क्रांतीवीर महात्मा ज्योतीबा फुले रूग्णालयाचे काम २०२८ पर्यंत पूर्ण होणार
कन्नमवार नगर येथील क्रांतीवीर महात्मा ज्योतीबा फुले
रूग्णालयाचे काम २०२८ पर्यंत पूर्ण होणार
-राज्यमंत्री माधुरी मिसाळ
मुंबई, दि. २६ : विक्रोळीच्या कन्नमवार नगर येथील क्रांतीवीर महात्मा ज्योतीबा फुले रूग्णालयाचे खासगीकरण झालेले नाही. या हॉस्पीटलचे काम २०२८ पर्यंत पूर्ण होईल आणि पूर्वीप्रमाणेच इथे रूग्णांना आरोग्य सेवा मिळतील असे राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत सांगितले.
कन्नमवार नगर येथील क्रांतीवीर महात्मा ज्योतीबा फुले रूग्णालयासंदर्भात सदस्य सुनिल राऊत यांनी विधानसभेत प्रश्न विचारला होता. या प्रश्नास उत्तर देताना राज्यमंत्री माधुरी मिसाळ बोलत होत्या.
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...