Thursday, 5 March 2026

महाराष्ट्रात आता नवी औद्योगिक क्रांती.. महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत ग्वाही

 महाराष्ट्रात आता नवी औद्योगिक क्रांती..

महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत ग्वाही

 

मुंबईदि.२६: राज्यात गेल्या सुमारे चार वर्षांपासून स्थगितीचे राजकारण संपून प्रगतीची घौडदौड सुरू झाली आहे. महाराष्ट्रात एक नवी औद्योगिक क्रांती होत असून महाराष्ट्राच्या विकासाची गती आता कुणीही थांबवू शकणार नाही. औद्योगिक गुंतवणुकीत महाराष्ट्र आजही देशात क्रमांक एकचे राज्य आहे. राज्यात सुरू असलेल्या विकासयात्रेचे प्रतिबिंब राज्यपालांच्या अभिभाषणात उमटले असून प्रगतसमृद्ध आणि सुरक्षित महाराष्ट्र घडवणे हेच राज्य शासनाचे प्रमुख ध्येय आहे.  विकास आणि लोककल्याणाची महाराष्ट्राची ही विकासयात्रा कधीही थांबणार नाहीअशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत दिली.

 

राज्यपालांच्या अभिभाषणावर विधान परिषदेत झालेल्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी भाषणाची सुरुवात दिवंगत नेते अजित पवार यांच्या आठवणीने केली. अजितदादांच्या निधनामुळे या अधिवेशनावर दुःखाचे सावट असून त्यांनी नेहमी विकासाचे राजकारण केल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi