राज्यपालांच्या अभिभाषणावर विधान परिषदेत झालेल्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी भाषणाची सुरुवात दिवंगत नेते अजित पवार यांच्या आठवणीने केली. अजितदादांच्या निधनामुळे या अधिवेशनावर दुःखाचे सावट असून त्यांनी नेहमी विकासाचे राजकारण केल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.
राज्याच्या औद्योगिक प्रगतीविषयी सांगताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र हे केवळ देशातीलच नव्हे तर जगाच्या पातळीवर गुंतवणुकीसाठी पसंतीचे राज्य बनले आहे. औद्योगिक गुंतवणुकीत महाराष्ट्र आजही देशात नंबर वन असून देशाच्या एकूण जीडीपीमध्ये राज्याचा वाटा १३.५ टक्के आहे. २०२४-२५ या वर्षात महाराष्ट्राला १ लाख ६४ हजार ८७५ कोटी रुपयांची थेट परकीय गुंतवणूक मिळाली, जी देशाच्या एकूण गुंतवणुकीच्या तब्बल ३९ टक्के आहे.
No comments:
Post a Comment