Wednesday, 4 March 2026

विक्रोळीतील कन्नमवार नगर येथील क्रांतीवीर महात्मा ज्योतीबा फुले रूग्णालय १९९५

 राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या, विक्रोळीतील कन्नमवार नगर येथील क्रांतीवीर महात्मा ज्योतीबा फुले रूग्णालय १९९५ बांधले होते. त्यावेळी ते १३० खाटांचे होते. हे रूग्णालय जुने झाले असल्यामुळे लोकप्रतिनिधींची मागणी लक्षात घेऊन ही इमारत निष्काषित करून पुनर्बांधणी करण्यात येत आहे. या हॉस्पिटलची ५०० खाटापर्यंत क्षमता वाढविण्यात येत आहे. म्हाडाला प्रिमीयमचे १३ कोटी रूपये दिले आहेत तसेच जागेसाठी देखील २४ कोटी रुपये दिले आहेत. म्हाडाने जागेचा ताबा दिला असून वसतीगृहाचे काम सुरू आहे. ही इमारत २१ मजली असून यामध्ये वसतीगृह, प्रशासकीय कामकाज होणार आहे. सद्यस्थितीत १२ टक्के काम पूर्ण झाले असून सन २०२८ पर्यंत या हॉस्पिटलचे काम पूर्ण होईल असेही राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या.

या प्रश्नाच्या चर्चेत विधानसभा सदस्य अबू आझमी यांनी सहभाग घेतला.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi