Wednesday, 4 March 2026

डॉ. पंजाबराव देशमुख देशांतर्गत शिष्यवृत्ती योजनेतील सर्व लाभार्थ्यांना लाभ देणार

 डॉ. पंजाबराव देशमुख देशांतर्गत शिष्यवृत्ती योजनेतील सर्व लाभार्थ्यांना लाभ देणार

-राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

 

मुंबई,दि. २६: सारथी संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या डॉ. पंजाबराव देशमुख देशांतर्गत शिष्यवृत्ती योजनेतील सर्व लाभार्थ्यांना लाभ देणार असल्याचे राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी विधानसभेत सांगितले.

            मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण पूर्ण करता यावे यासाठी  देण्यात येणारी डॉ. पंजाबराव देशमुख देशांतर्गत शिष्यवृत्ती योजनेतील सन २०२५-२६ साठी शिष्यवृत्तीबाबत सदस्‍य जयंत पाटील यांनी प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना ॲड.आशिष जयस्वाल बोलत होते.

            राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल म्हणाले कीसारथी संस्थेद्वारे डॉ. पंजाबराव देशमुख देशांतर्गत शिष्यवृत्ती योजना सन २०२१-२२ मध्ये सुरू करण्यात आली असूनही योजना सन २०२१-२२ ते २०२४-२५ या कालावधीत यशस्वीपणे राबविण्यात आली असल्याने मराठा समाजातील असंख्य विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक आधार मिळाला आहे. योजनेंतर्गत २०२५-२६ मध्ये ३८८ लाभार्थ्यांना ७.२४ कोटी इतकी शिष्यवृत्तीची रक्कम वितरित करण्यात आली असून ३७९ लाभार्थ्यांना ५.९६ कोटी इतकी शिष्यवृत्ती रक्कम वितरीत करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. संस्थेला वेगवेगळ्या योजना राबविण्यासाठी ३०० कोटींचा अर्थसंकल्पीय निधी मंजूर करण्यात आला असून संस्थेच्या मागणीनुसार अतिरिक्त खर्च भागविण्यासाठी पूरवणी मागणीद्वारे आणखी १०० कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत. या निधीचे नियोजन करुन २०२५-२६ मध्येही सारथी संस्थेमार्फत लक्ष्यित गटातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणास प्रोत्साहन मिळावे यासाठी योजना राबविण्यात येत आहेत. मराठा समाजातील मुलांच्या हितासाठी शासन काम करत आहे. या योजनेसाठी मार्च २०२६ पूर्वी जाहिरात काढून लाभार्थ्यांना लाभ दिला जाईलअसे त्यांनी सांगितले.

या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य राजेश पवारअर्जुन खोतकरअभिजीत पाटील यांनी सहभाग घेतला.

 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi