Monday, 2 March 2026

अतिक्रमित झोपडपट्टीतील सात हजार रुपये भरलेल्या पात्र झोपडपट्टीधारकांसाठी खासगी ३० एकर

 वनमंत्री नाईक म्हणाले कीअतिक्रमित झोपडपट्टीतील सात हजार रुपये भरलेल्या पात्र झोपडपट्टीधारकांसाठी खासगी ३० एकर जागेवर टीडीआरच्या माध्यमातून पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच उद्यानातील मूळ रहिवाशांचे ९० एकर जागेवर ग्राउंड प्लस वन’ स्वरूपातील बांधकाम करून पुनर्वसन करण्याची शासनाची तयारी आहे. आरे कॉलनी परिसरातील उपलब्ध जागेबाबत झोनल मास्टर प्लॅन तयार केला जात असून महिन्याभरात निर्णय होईल. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत सर्व लोकप्रतिनिधींची बैठक घेऊन विषय निकाली काढण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

उद्यानातील आतील पाड्यांना सुविधा देण्यास न्यायालयाने नेमलेल्या समितीने मनाई केली आहे. मात्र उद्यानाबाहेरील वस्तींसाठी, उद्यानातून गेलेल्या पाणीपुरवठा पाइपलाइनच्या दुरुस्तीला मान्यता दिली जाईल, असे वनमंत्र्यांनी स्पष्ट केले.

०००

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावणार

 संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावणार

– वनमंत्री गणेश नाईक

मुंबईदि. २६ – बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा पर्यावरणीय समतोल राखत आणि आदिवासी व पात्र रहिवाशांना न्याय देत पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल. महिन्याभरात ठोस निर्णय घेऊन प्रक्रिया गतीमान करण्यात येईल, अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत दिली.

       बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरातील आदिवासी पाडे व अतिक्रमित झोपडपट्टीधारकांच्या पुनर्वसनासंदर्भात सदस्य सुनील प्रभू यांनी उपस्थित केलेल्या अर्धा तास चर्चेला उत्तर देताना वनमंत्री गणेश नाईक यांनी यासंदर्भात लवकरच ठोस निर्णय घेऊन पुनर्वसन प्रक्रिया गतीमान करण्यात येईल, असे सांगितले. सात हजार रुपये अनामत भरलेल्या पात्र कुटुंबांना घरे देण्यासाठी स्वतंत्र योजना राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

चांदोली वन्यजीव अभयारण्य परिसरातील जमीन मुळात चांदोली धरणासाठी

 वनमंत्री गणेश नाईक म्हणाले कीचांदोली वन्यजीव अभयारण्य परिसरातील जमीन मुळात चांदोली धरणासाठी संपादित करण्यात आली होती. त्या ठिकाणी असलेली बाजारपेठ नष्ट झाल्याने अनेक ग्रामस्थांनी येथे राहण्याची इच्छा नसल्याचे सांगितले. सांगलीसाताराकोल्हापूर आणि रत्नागिरी या जिल्ह्यांतील एकूण ३२ गावांचा यामध्ये समावेश आहे. या प्रकरणी १९९९ च्या मूल्यांकनानुसार पुनर्वसनाचा मोबदला निश्चित करण्यात आला आहे. तथापिसध्याच्या बाजारभावानुसार मोबदला वाढवायचा असल्यास मंत्रिमंडळाची संमती आवश्यक असल्याने याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात येईल. पर्यायी जमीन देणे किंवा आर्थिक मोबदला देणे याबाबत निर्णय घेताना आजच्या बाजारभावाचा विचार केला जाईलअसे वनमंत्री नाईक यांनी सांगितले.


चांदोली अभयारण्यातील ३२ गावांच्या पुनर्वसनासाठी मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव

 चांदोली अभयारण्यातील ३२ गावांच्या पुनर्वसनासाठी मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव

- वनमंत्री गणेश नाईक

 

मुंबईदि. २६ : चांदोली वन्यजीव अभयारण्य परिसरातील गावांच्या पुनर्वसनाबाबत शासन सकारात्मक असून याबाबत मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव ठेवला जाईलअसे वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत अर्धा तास चर्चेला उत्तर देताना सांगितले.

सदस्य सत्यजित देशमुख यांनी चांदोली धरण परिक्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांना नागरी सोयी सुविधा उपलब्ध न झाल्याबाबत उपस्थित केलेल्या अर्धा तास चर्चेला उत्तर देताना मंत्री गणेश नाईक बोलत होते.

प्रदूषणाच्या कारणांच्या प्रमाणात त्यांना दंड आकारण्यात आला असल्याचे त्यां

 पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, या परिसरातील उद्योगांबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर संबंधित उद्योगांना वेळोवेळी कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. प्रदूषणाच्या कारणांच्या प्रमाणात त्यांना दंड आकारण्यात आला असल्याचे त्यांनी नमूद केले. तथापि केवळ दंडात्मक कारवाईने प्रश्न सुटणार नसल्याने दंडाची रक्कम वाढविण्याचाही विचार सुरू असल्याचे पर्यावरण मंत्री मुंडे यांनी स्पष्ट केले.


उद्योगांमध्ये ‘कंटीन्युअस एम्बियंट एअर क्वालिटी मॉनिटरिंग सिस्टीम’ (सीएएक्यूएमएस) आणि ‘ऑनलाइन कंटीन्युअस एमिशन मॉनिटरिंग सिस्टीम’ (ओसीईएमएस) बसविण्यात आल्याची माहिती देत, त्याद्वारे सल्फर डायऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड आदींचे प्रमाण तपासले जात असल्याचे मंत्री मुंडे यांनी सांगितले. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई, रोजगार आणि सीएसआरमधून विकासकामे करण्याबाबत संबंधित विभागांशी समन्वय साधणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांचे अहवाल व स्थानिक जनतेच्या तक्रारींतील तफावत दूर करण्यासाठी स्वतः प्रत्यक्ष भेट देऊन तपास करणार असल्याचे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले.


०००००

राजुरा-चंद्रपूर परिसरातील प्रदूषण प्रकरणी पाहणी करणार; नियमांचे पालन न करणाऱ्या उद्योगांवर कारवाई करणार

 राजुरा-चंद्रपूर परिसरातील प्रदूषण प्रकरणी पाहणी करणार;

नियमांचे पालन न करणाऱ्या उद्योगांवर कारवाई करणार

- पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

·         संबधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश

मुंबईदि. २६ : राजुरा-चंद्रपूर परिसरातील औद्योगिक प्रदूषणाच्या तक्रारींची गंभीर दखल घेत आपण स्वतः अधिवेशनानंतर या परिसराची प्रत्यक्ष पाहणी करूअसे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानसभेत सांगितले.

याप्रकरणी माहिती घेण्यासाठी पर्यावरण मंत्र्यांनी बोलावल्यानंतरही प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी आले नसल्याने हा सभागृहाचा अवमान असल्याचे सांगून तालिका अध्यक्ष दिलीप लांडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांस निलंबित करण्याचे आदेश दिले.

सदस्य देवराव भोंगळे यांनी नांदाफाटा येथे असलेल्या सिमेंट कंपन्यांमुळे गडचांदूर येथे होत असलेल्या प्रदूषणाबाबत उपस्थित केलेल्या अर्धा तास चर्चेला उत्तर देताना पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे बोलत होत्या.

होळी, धुलीवंदनानिमित्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या शुभेच्छा

 होळीधुलीवंदनानिमित्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या शुभेच्छा

 

मुंबई, दि.2: महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी होळी तसेच धुलीवंदनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

 

होलिकापूजन तसेच प्रेमस्नेह व बंधुभावाचे प्रतिक असलेला रंगोत्सव सर्वांच्या जीवनात आनंदाचे रंग भरो व परस्परांमधील द्वेष भावना नष्ट करो या अशा शुभेच्छांसह राज्यपाल श्री. देवव्रत यांनी नागरीकांना होळी व रंगोत्सव साजरा करताना पर्यावरण रक्षणाबद्दल जागरुक राहण्याचे आवाहन आपल्या संदेशातून केले आहे.

 0000

Featured post

Lakshvedhi