संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावणार
– वनमंत्री गणेश नाईक
मुंबई, दि. २६ – बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा पर्यावरणीय समतोल राखत आणि आदिवासी व पात्र रहिवाशांना न्याय देत पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल. महिन्याभरात ठोस निर्णय घेऊन प्रक्रिया गतीमान करण्यात येईल, अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत दिली.
बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरातील आदिवासी पाडे व अतिक्रमित झोपडपट्टीधारकांच्या पुनर्वसनासंदर्भात सदस्य सुनील प्रभू यांनी उपस्थित केलेल्या अर्धा तास चर्चेला उत्तर देताना वनमंत्री गणेश नाईक यांनी यासंदर्भात लवकरच ठोस निर्णय घेऊन पुनर्वसन प्रक्रिया गतीमान करण्यात येईल, असे सांगितले. सात हजार रुपये अनामत भरलेल्या पात्र कुटुंबांना घरे देण्यासाठी स्वतंत्र योजना राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment