वनमंत्री नाईक म्हणाले की, अतिक्रमित झोपडपट्टीतील सात हजार रुपये भरलेल्या पात्र झोपडपट्टीधारकांसाठी खासगी ३० एकर जागेवर टीडीआरच्या माध्यमातून पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच उद्यानातील मूळ रहिवाशांचे ९० एकर जागेवर ‘ग्राउंड प्लस वन’ स्वरूपातील बांधकाम करून पुनर्वसन करण्याची शासनाची तयारी आहे. आरे कॉलनी परिसरातील उपलब्ध जागेबाबत झोनल मास्टर प्लॅन तयार केला जात असून महिन्याभरात निर्णय होईल. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत सर्व लोकप्रतिनिधींची बैठक घेऊन विषय निकाली काढण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
उद्यानातील आतील पाड्यांना सुविधा देण्यास न्यायालयाने नेमलेल्या समितीने मनाई केली आहे. मात्र उद्यानाबाहेरील वस्तींसाठी, उद्यानातून गेलेल्या पाणीपुरवठा पाइपलाइनच्या दुरुस्तीला मान्यता दिली जाईल, असे वनमंत्र्यांनी स्पष्ट केले.
०००
No comments:
Post a Comment