होळी, धुलीवंदनानिमित्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या शुभेच्छा
मुंबई, दि.2: महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी होळी तसेच धुलीवंदनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.
होलिकापूजन तसेच प्रेम, स्नेह व बंधुभावाचे प्रतिक असलेला रंगोत्सव सर्वांच्या जीवनात आनंदाचे रंग भरो व परस्परांमधील द्वेष भावना नष्ट करो, या अशा शुभेच्छांसह राज्यपाल श्री. देवव्रत यांनी नागरीकांना होळी व रंगोत्सव साजरा करताना पर्यावरण रक्षणाबद्दल जागरुक राहण्याचे आवाहन आपल्या संदेशातून केले आहे.
0000
No comments:
Post a Comment