चांदोली अभयारण्यातील ३२ गावांच्या पुनर्वसनासाठी मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव
- वनमंत्री गणेश नाईक
मुंबई, दि. २६ : चांदोली वन्यजीव अभयारण्य परिसरातील गावांच्या पुनर्वसनाबाबत शासन सकारात्मक असून याबाबत मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव ठेवला जाईल, असे वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत अर्धा तास चर्चेला उत्तर देताना सांगितले.
सदस्य सत्यजित देशमुख यांनी चांदोली धरण परिक्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांना नागरी सोयी सुविधा उपलब्ध न झाल्याबाबत उपस्थित केलेल्या अर्धा तास चर्चेला उत्तर देताना मंत्री गणेश नाईक बोलत होते.
No comments:
Post a Comment