Sunday, 1 March 2026

‘सक्षम कौशल्य सर्वेक्षण’ योजनेचे सांस्कृतिक कार्य मंत्री आणि कौशल्य विकास मंत्री यांच्या हस्ते सोमवारी उद्घाटन

 सक्षम कौशल्य सर्वेक्षण’ योजनेचे

सांस्कृतिक कार्य मंत्री आणि कौशल्य विकास मंत्री यांच्या हस्ते सोमवारी उद्घाटन

 

मुंबई, दि. १ :  सक्षम कौशल्य सर्वेक्षण, सक्षम युवकसक्षम राज्य या नाविण्यपूर्ण योजनेचे उद्घाटन सांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या हस्ते सोमवारदि. २ मार्च२०२६ रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा हे या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी असतील. वांद्रे (पश्चिम) येथील आर. डी. नॅशनल कॉलेज येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मुंबई उपनगर जिल्ह्याचे कौशल्य विकास सहायक आयुक्त शैलेश भगत यांनी दिली आहे.जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगर यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात प्रथमच अशा प्रकारचे कौशल्य सर्वेक्षण करण्यात येत आहे. या माध्यमातून १८ ते ४० वयोगटातील युवकांचा कौशल्य कल जाणून घेऊन त्यांना आवश्यक प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यानंतर संबंधित उमेदवारांना जवळच्या आस्थापना व उद्योजकांकडे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येतील.


000000



राज्य आपत्कालीन कार्यकेंद्र (एसईओसी) २४×७ सुरुनागरिकांनी फोन १०७७ (टोल फ्री) फोन +९१-९३२१५८७१४३ दूरध्वनी : ०२२-२२०२७९९० ई-मेल : controlroom@gov.in यावर संपर्क साधावा.,pl share

 राज्य आपत्कालीन कार्यकेंद्र (एसईओसी२४×७ सुरु

परदेशात अडकलेल्या नागरिकांबाबत माहिती देण्यासाठी अथवा आपत्कालीन मदतीसाठी राज्य आत्पकालीन कार्य केंद्र २४×७ सुरु राहणार आहे.  नागरिकांनी  फोन  १०७७ (टोल फ्री) फोन  +९१-९३२१५८७१४३ दूरध्वनी : ०२२-२२०२७९९० ई-मेल : controlroom@gov.in यावर संपर्क साधावा.

 

परराष्ट्र व्यवहार मंत्रालय गल्फ व मध्य-पूर्व देशांतील भारतीय दूतावासांचे देशनिहाय आपत्कालीन संपर्क क्रमांक- कतार (दोहा) फोन : ००९७४-५५६४७५०२ / ००९७४-५५६४७५०३ई-मेल : cons.doha@mea.gov.in

 

संयुक्त अरब अमिरात (अबूधाबी / दुबई) – टोल फ्री : ८००-४६३४२व्हॉट्सॲप : +९७१-५४३०९०५७१ई-मेल : pbsk.dubai@mea.gov.inई-मेल : ca.abudhabi@mea.gov.in

 

सौदी अरेबिया (रियाध / जेद्दाह) – फोन : ००-९६६-११-४८८४६९७व्हॉट्सॲप (फक्त) : ००-९६६-५४२१२६७४८टोल फ्री : ८००-२४७-१२३४ई-मेल : cw.riyadh@mea.gov.in

 

बहरीन (मनामा) - फोन : ००९७३-३९४१८०७१

कुवैत फोन : +९६५-६५५०१९४६ (२४×७ आपत्कालीन)ई-मेल : community.kuwait@mea.gov.in

ओमान (मस्कत)- कम्युनिटी टोल फ्री : ८००७१२३४व्हॉट्सॲप : +९६८-९३५७७९७९,

कॉन्सुलर हेल्पलाईन : २४६९५९८१

 

इराण (तेहरान)- फोन : +९८-९१२-८१०-९११५फोन : +९८-९१२-८१०-९१०९फोन : +९८-९१२-८१०-९१०२,

फोन : +९८-९९३-२१७-९३५९

 

इस्रायल (तेल अवीव)-  फोन : +९७२-५४-७५२०७११फोन : +९७२-५४-२४२८३७८ई-मेल : cons1.telaviv@mea.gov.in

 

जॉर्डन (अम्मान)-  फोन : ००९६२-७७०४२२२७६ (तातडीने देश सोडण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे)

 

पॅलेस्टाईन (रामल्लाह)- फोन : +९७०-५९२९१६४१८ई-मेल : repoffice@mea.gov.in

 

परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना

  • सुरक्षित ठिकाणीच वास्तव्यास राहावे व अनावश्यक हालचाल टाळावी
  • भारतीय दूतावास व वाणिज्य दूतावासांच्या अधिकृत सूचनांचे काटेकोर पालन करावे
  • आपले सध्याचे लोकेशन व परिस्थिती कुटुंबीयांना नियमित कळवावी मोबाईल फोन पूर्ण चार्ज ठेवावा व आवश्यक कागदपत्रे जवळ बाळगावीत
  • सोशल मीडियावरील अफवा व अप्रमाणित माहिती प्रसारित करू नये
  • संबंधित दूतावासाकडे नोंदणी करणे अत्यावश्यक आहे

 

महाराष्ट्र शासन व भारत सरकारचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालय हे संयुक्तपणे परदेशातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी चोवीस तास कार्यरत आहे. आवश्यक मदतमाहिती समन्वय तसेच परिस्थितीनुसार स्थलांतराची (इव्हॅक्युएशन) तयारी सुरू असल्याचे आपत्कालीन कार्य केंद्राचे उपसचिव दत्तात्रय कदम यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

000000

 

युद्धजन्य परिस्थितीमुळे आखाती देशांमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी राज्य आत्पकालीन कार्य केंद्राकडून सूचना

 युद्धजन्य परिस्थितीमुळे आखाती देशांमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील

नागरिकांसाठी राज्य आत्पकालीन कार्य केंद्राकडून सूचना

 

मुंबईदि. १ : इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर मध्य-पूर्व व आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा विचार करूनपरदेशात वास्तव्यास असलेल्या व अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र शासनाने अत्यावश्यक सूचना जारी केल्या असल्याची माहिती राज्य आत्पकालीन कार्य केंद्राकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार खात्यानेतसेच विविध भारतीय दूतावासांनी २४×७ आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वित केले असूनराज्य शासन या परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळण्याचेतसेच दूतावासाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचना व मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

अफवांवर विश्वास ठेवू नये

मध्य-पूर्व व आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या  परिस्थितीत स्थानिक प्रशासनाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सुरक्षा सूचनांचे काटेकोर पालन करावेकोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच स्थानिक घडामोडींवर लक्ष ठेवावे. आपत्कालीन परिस्थितीत भारतीय दूतावास आणि वाणिज्य दूतावास नेहमीप्रमाणे कार्यरत आहे. भारतीय नागरिकांनी शांतता राखून परिस्थितीबाबत जागरूक राहावे आणि पुढील अधिकृत सूचनांची प्रतीक्षा करावी.

उद्योग धरण आणि ' इज ऑफ डूइंग बिझनेस' विषयी सादरीकरण

 उद्योग विभागाचे सचिव पी अन्बळगण यांनी राज्य शासनाच्या उद्योग धरण आणि इज ऑफ डूइंग बिझनेसविषयी सादरीकरण केले. तर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण चे अतिरिक्त महानगर आयुक्त विक्रम कुमार यांनी मुंबई महानगर क्षेत्रात सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या कामांविषयीसिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ एज्युसिटीमेडिसिटी एरोसिटीखारघर येथील आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र याविषयी सादरीकरण केले. उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी यांनी नवी मुंबई येथे विदेशी विद्यापीठांसाठी उभारण्यात येत असलेल्या पायाभूत सुविधा व राज्यातील उच्च शिक्षणाच्या परिस्थितीविषयी सादरीकरण केले. तसेच मित्रा संस्थेच्या वतीने राज्यातील विकासाच्या परिवर्तनाविषयी चित्रफित दाखवण्यात आली.

कॅनडा शिष्टमंडळाचा भारत दौरा आणि मुंबईतील हा कार्यक्रम आपल्या द्विपक्षीय संबंधांची

 कॅनडा शिष्टमंडळाचा भारत दौरा आणि मुंबईतील हा कार्यक्रम आपल्या द्विपक्षीय संबंधांची खरी सुरुवात आहे. भविष्यातही कॅनडाने अशाच प्रकारे भारत आणि महाराष्ट्राला भेट देण्याचे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

यावेळी कॅनडाचे राष्ट्रीय महसूल मंत्री फ्रँकोइस-फिलिप शॅम्पेन यांनी भारत आणि कॅनडा यांच्यातील द्विपक्षीय संबंधांना मोठा इतिहास असल्याचे सांगत भविष्यातही हे सहकार्य असेच दृढ होत राहीलअसा विश्वास व्यक्त केला. तसेच कॅनडाच्या न्यू ब्रन्सविकच्या राज्याच्या प्रीमियर सुसान होल्ट यांनी महाराष्ट्र आणि न्यू ब्रन्सवीकमधील सहकार्य आणि संबंधाविषयी भाष्य केले.

भविष्यातील महाराष्ट्र घडवण्यासाठी डाटा सेंटर, ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर, स्टार्टअप आदी क्षेत्रात कार्य

 कॅनडा कृत्रिम बुद्धिमत्ताआधुनिक तंत्रज्ञानपर्यावरण संवर्धन यामध्ये मोठे काम करीत आहे. कॅनेडियन शासनाने यासाठी व्यवस्था उभ्या केल्या आहेत. त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासन भविष्यातील महाराष्ट्र घडवण्यासाठी डाटा सेंटरग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटरस्टार्टअप आदी क्षेत्रात कार्य करीत आहे. नुकतीच कृषीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावरती यशस्वी वैचारिक मंथन करणाऱ्या परिषदेचे आयोजन शासनाच्या वतीने करण्यात आले. कृषी विकासासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात येत आहे. राज्यातील शेतकऱ्यांना ॲग्री स्टॅकच्या माध्यमातून डिजिटल व्यासपीठावर आणण्यात आले आहे. याकरिता राज्य शासन महाविस्तार उपक्रमही राबवत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतात मागील दहा वर्षात मोठ्या प्रमाणावर परिवर्तन होत आहे.  महाराष्ट्र पण त्याला अपवाद नसल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

राज्यात मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांची कामे सुरू

 मुख्यमंत्री म्हणालेराज्यात मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत. मुंबईला दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ मिळाले आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे या भागात विकासाच्या मोठ्या संधी आहेत. तसेच नवी मुंबई येथे आंतरराष्ट्रीय 'एज्युसिटीनिर्माण करण्यात येत आहे. या ठिकाणी विदेशातील नामांकित विद्यापीठे आपले शैक्षणिक दालने उघडणार आहेत. आतापर्यंत पाच विद्यापीठांना लेटर ऑफ इन्टेंटदेखील देण्यात आले आहे. विद्यापीठांना जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन काम करीत आहे. महाराष्ट्र हे ६० टक्के २७ वर्ष वयापर्यंत लोकसंख्या असलेले राज्य आहे. कॅनडा येथे राज्यातून मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी जात असतात. त्यामुळे कॅनडा येथील विद्यापीठांनी महाराष्ट्रात येत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय 'एज्युसिटीमध्ये आपली शैक्षणिक दालने उघडावी.

Featured post

Lakshvedhi