Thursday, 19 February 2026

सर जे जे रुग्णालय नव्याने सुरू करण्यात आलेल्या प्रमुख सुविधा pl share

 नव्याने सुरू करण्यात आलेल्या प्रमुख सुविधा

१. अत्याधुनिक न्यूरोसर्जरी ऑपरेशन थिएटर

मेंदूतील गाठी (ब्रेन ट्यूमर) व आघातजन्य शस्त्रक्रिया

मेंदूतील रक्तस्राव व मणक्यांशी संबंधित विकारांवरील उपचार

गंभीर डोक्याच्या दुखापतींचे आपत्कालीन व्यवस्थापन

सुरक्षित न्यूरोसर्जिकल हस्तक्षेपासाठी आधुनिक तंत्रज्ञान

२. ईएनटी (कान-नाक-घसा) ऑपरेशन थिएटर

काननाक व घसा विकारांवरील शस्त्रक्रिया

टॉन्सिलेक्टॉमी शस्त्रक्रिया

कर्णपटल दुरुस्ती

आपत्कालीन ईएनटी सेवा

३. बाल शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर

अर्भक व बालकांसाठी विशेष शस्त्रक्रिया सेवा

जन्मजात विकृतींचे सुधारात्मक उपचार

हर्निया व अस्थिरोग विषयक शस्त्रक्रिया

बालस्नेही पायाभूत सुविधांसह आपत्कालीन सेवा

४. वॉर्ड क्रमांक ११ व १८ चे आधुनिकीकरण

वैद्यकीय व शस्त्रक्रिया रुग्णांसाठी सुधारित सुविधा

शस्त्रक्रियेपूर्व व शस्त्रक्रियेनंतरची सेवा अधिक सक्षम

निरीक्षणतपासणी व पुनर्वसनासाठी सुसज्ज व्यवस्था

५. केंद्रीय निर्जंतुकीकरण सेवा विभाग (सीएसएसडी)

शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या उपकरणांचे प्रगत निर्जंतुकीकरण

संसर्ग प्रतिबंध व नियंत्रण प्रणाली बळकट

ऑपरेशन थिएटरसाठी निर्जंतुक साहित्य पुरवठा

रुग्णालयीन स्वच्छता व सुरक्षिततेत वाढ

६. रक्तपेढी आधुनिकीकरण

रक्त साठवण व वितरण अधिक सक्षम

आपत्कालीन रक्तपुरवठा उपलब्धता

रक्त तपासणी व घटक विभाजन सुविधा

रक्तदात्यांच्या नोंदणी व प्रक्रियेत सुधारणा

७. शैक्षणिक व प्रशिक्षण सुविधा

७ वा मजला सभागृह — शैक्षणिक कार्यक्रमपरिसंवाद व संस्थात्मक उपक्रम

C.B.M.E. स्किल लॅब — सिम्युलेशन आधारित आधुनिक वैद्यकीय प्रशिक्षण

 

वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरासे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

0000

सर जे जे रुग्णालय येथे अत्याधुनिक आरोग्य सुविधांचे लोकार्पण भाग १

 सर जे जे रुग्णालय येथे अत्याधुनिक आरोग्य सुविधांचे लोकार्पण

 

मुंबईदि.१८: महाराष्ट्र शासनाच्या पुढाकारातून सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत मुंबई येथील सर जे. जे. रुग्णालय समूहात विविध अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांचे लोकार्पण करण्यात आले. या नव्या सुविधा रुग्णसेवेची गुणवत्ता वाढविण्यासोबतच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शैक्षणिक व नैदानिक प्रशिक्षण अधिक सक्षम करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत.

समारंभात बोलताना मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रुग्णसेवा बळकटीकरणासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांमुळे रुग्णांच्या उपचाराच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा होईलअसे त्यांनी सांगितले.

वैद्यकीय शिक्षण विभागाचे मुख्य ध्येय गुणवत्तापूर्ण वैद्यकीय शिक्षणासोबत उत्कृष्ट व परवडणारी आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे हे असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

स्थानिक भूगोल आणि हवामान समजून घेणे महत्त्वाचे

 स्थानिक भूगोल आणि हवामान समजून घेणे महत्त्वाचे

मुंबईसारख्या किनारपट्टीवरील शहरांमध्ये मुसळधार पावसामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर भाष्य करतांना वक्त्यांनी स्थानिक भूगोल आणि पर्जन्यमान लक्षात घेऊनच नियोजन करण्याचा सल्ला दिला.

युरोपमधील मॉडेल जसेच्या तसे भारतात लागू करता येत नाही. प्रत्येक शहराची हवामान व सामाजिक परिस्थिती वेगळी असतेनवकल्पना म्हणजे योग्य नियोजन आणि टिकाऊ विकास नवकल्पना म्हणजे केवळ नवे तंत्रज्ञान नव्हेतर संसाधनांचा योग्य वापरदीर्घकालीन टिकाऊपणा आणि लोकसहभाग असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. वेगापेक्षा दिशा महत्त्वाची आहे. स्थानिक वास्तव समजून घेतलेतरच शहरी प्रकल्प यशस्वी होतातअसे विविध वक्त्यांनी यावेळी सांगितले.

मूलभूत बाबींवर लक्ष देण्याची गरज

 मूलभूत बाबींवर लक्ष देण्याची गरज

मीरा-भाईंदर महापालिकेचे आयुक्त राधाबिनोद अरिबम शर्मा  यांनी नवकल्पनांवर बोलताना मूलभूत बाबींवर लक्ष देण्याचे आवाहन केले. नवीन तंत्रज्ञानएआय किंवा डिजिटल प्लॅटफॉर्म महत्त्वाचे असले तरी त्याआधी लोकसंख्यापाणीसांडपाणी आणि कचरा व्यवस्थापन याचे शास्त्रीय नियोजन आवश्यक आहे असे ते म्हणाले.

शर्मा यांनी विकेंद्रीकृत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची गरज अधोरेखित करत पुनर्वापराच्या संकल्पनेला खरी नवकल्पना असल्याचे नमूद केले. तसेच कोणताही प्रकल्प राबवताना राजकीयआर्थिकसामाजिकतांत्रिकपर्यावरणीय आणि कायदेशीर घटकांचा  सखोल विचार करण्याची आवश्यकता त्यांनी स्पष्ट केली.

मुंबई क्लायमेट वीकमध्ये ‘लिव्हेबल अर्बन फ्यूचर’साठी नवकल्पनांवर भर

 मुंबई क्लायमेट वीकमध्ये लिव्हेबल अर्बन फ्यूचरसाठी नवकल्पनांवर भर

 

मुंबईदि.१८: मुंबई क्लायमेट वीक अंतर्गत इनोव्हेटिव सोल्यूशन फॉर लिव्हेबल अर्बन फ्यूचर’ या विषयावर  शहरी विकासपाणी व्यवस्थापनहवामान बदल आणि टिकाऊ शहर नियोजन यावर विविध तज्ज्ञांनी नवकल्पनांवर भर दिला.

मुंबई क्लायमेट वीक अंतर्गत इनोव्हेटिव सोल्यूशन फॉर लिव्हेबल अर्बन फ्यूचर’ या विषयावर जिओ वर्ल्ड सेंटरवांद्रे येथे  चर्चा सत्र आयोजित करण्यात आले.या सत्रात सीताराम शेलार (पाणी हक्क समिती)नताशा जरीन (इकोसत्व)मानसी साहू (स्टुडिओ पॉड)प्रदीप कलबर (आयआयटी मुंबई)राज भगत (डब्ल्यूआर इंडिया)प्रेरणा लांगा (आगा खान एजन्सी फॉर हॅबिटॅट) आदी मान्यवरांनी या आपले सादरीकरण केले.

शंकर पाटील यांच्या जन्मशताब्दी निमित्त साहित्यावर आधारित 'आभाळाचे रंग' सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

 शंकर पाटील यांच्या जन्मशताब्दी निमित्त साहित्यावर आधारित

'आभाळाचे रंग' सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

मुंबईदि. १८ : सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या वतीने सुप्रसिद्ध ग्रामीण कथाकार शंकर पाटील यांच्या साहित्यावर आधारित 'आभाळाचे रंगया विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवारदि. २२ फेब्रुवारी२०२६ रोजी सायंकाळी ६:०० वाजता मिरज येथील बालगंधर्व नाट्यमंदिर येथे  होणार आहे.

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमात शंकर पाटील यांच्या खास विनोदी शैलीतील नाट्य प्रहसनकथा अभिवाचन आणि त्यांनी लिहिलेल्या अजरामर चित्रपटांतील नृत्यांचे सादरीकरण केले जाणार आहे. 

कार्यक्रमाचे वैशिष्ट्य

लेखन: योगेश मार्कंडे दिग्दर्शन: मिलिंद खानविलकरप्रमुख कलाकार: वर्षा दांदळेमाधवी जुवेकरगणेश रेवडेक

काजू उद्योगासाठी वाढीव परतावा योजनेबाबत शासन सकारात्मक

 काजू उद्योगासाठी वाढीव परतावा योजनेबाबत शासन सकारात्मक

— बंदरे मंत्री नितेश राणे

 

·         केंद्र-राज्य समन्वयातून महाराष्ट्रातून काजू निर्यात वाढविण्याची ग्वाही

 

मुंबईदि. १८ : काजू प्रक्रिया उद्योगनिर्यातदार तसेच शेतकरी यांना अधिकाधिक लाभ मिळावायासाठी आवश्यक त्या निर्णयांबाबत शासन सकारात्मक असल्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी सांगितले. काजू प्रक्रिया उद्योगासाठी लागू असलेल्या ५ टक्के परतावा योजनेअंतर्गत वाढीव निधी उपलब्ध करून देण्याबाबत मंत्रालयात मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. काजू उद्योगाला आर्थिक बळकटी देत स्थानिक अर्थव्यवस्थेला गती देण्याच्या उद्देशाने बैठक आयोजित करण्यात आली होती.

 

बैठकीत काजू निर्यात धोरणावर सविस्तर चर्चा करण्यात आली. केंद्र व राज्य शासन यांच्यात प्रभावी समन्वय साधून महाराष्ट्रातून काजू निर्यात वाढविण्यासाठी धोरणात्मक उपाययोजना राबविण्याचे निर्देश मंत्री नितेश राणे यांनी दिले.

 


 

या निर्णयामुळे सिंधुदुर्गसह संपूर्ण कोकणातील काजू उद्योगाला चालना मिळून रोजगारनिर्मितीला वेग येईलनिर्यातवाढीस प्रोत्साहन मिळेल आणि स्थानिक आर्थिक विकासाला भक्कम आधार मिळेलअसा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला

Featured post

Lakshvedhi