सर जे जे रुग्णालय येथे अत्याधुनिक आरोग्य सुविधांचे लोकार्पण
मुंबई, दि.१८: महाराष्ट्र शासनाच्या पुढाकारातून सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत मुंबई येथील सर जे. जे. रुग्णालय समूहात विविध अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांचे लोकार्पण करण्यात आले. या नव्या सुविधा रुग्णसेवेची गुणवत्ता वाढविण्यासोबतच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शैक्षणिक व नैदानिक प्रशिक्षण अधिक सक्षम करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत.
समारंभात बोलताना मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रुग्णसेवा बळकटीकरणासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांमुळे रुग्णांच्या उपचाराच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा होईल, असे त्यांनी सांगितले.
वैद्यकीय शिक्षण विभागाचे मुख्य ध्येय गुणवत्तापूर्ण वैद्यकीय शिक्षणासोबत उत्कृष्ट व परवडणारी आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे हे असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
No comments:
Post a Comment