शंकर पाटील यांच्या जन्मशताब्दी निमित्त साहित्यावर आधारित
'आभाळाचे रंग' सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
मुंबई, दि. १८ : सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या वतीने सुप्रसिद्ध ग्रामीण कथाकार शंकर पाटील यांच्या साहित्यावर आधारित 'आभाळाचे रंग' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवार, दि. २२ फेब्रुवारी, २०२६ रोजी सायंकाळी ६:०० वाजता मिरज येथील बालगंधर्व नाट्यमंदिर येथे होणार आहे.
सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमात शंकर पाटील यांच्या खास विनोदी शैलीतील नाट्य प्रहसन, कथा अभिवाचन आणि त्यांनी लिहिलेल्या अजरामर चित्रपटांतील नृत्यांचे सादरीकरण केले जाणार आहे.
कार्यक्रमाचे वैशिष्ट्य
लेखन: योगेश मार्कंडे दिग्दर्शन: मिलिंद खानविलकर, प्रमुख कलाकार: वर्षा दांदळे, माधवी जुवेकर, गणेश रेवडेक
No comments:
Post a Comment