Saturday, 31 January 2026

प्रजासत्ताक दिन संचलनात ‘कोकण पर्यटन’ चित्ररथाने वेधले लक्ष

 प्रजासत्ताक दिन संचलनात कोकण पर्यटन’ चित्ररथाने वेधले लक्ष

 

मुंबईदि. 26 : प्रजासत्ताक दिनानिमित्त दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावर  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजवंदनानंतर झालेल्या संचलनात पर्यटन मंत्री  शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेला पर्यटन विभागाचा कोकण पर्यटन’ हा चित्ररथ विशेष आकर्षण ठरला.

यावेळी कोकण विभागाच्या उपसंचालक (पर्यटन) डॉ. प्रज्ञा मनोहर यांच्यासह पर्यटन विभागातील अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कोकणच्या समृद्ध संस्कृतीऐतिहासिक वारसा आणि आधुनिक पर्यटन सुविधांचा सुरेख संगम या चित्ररथातून सादर करण्यात आला.

या चित्ररथाच्या माध्यमातून कोकणच्या विस्तीर्ण किनारपट्टीसह तेथील प्रमुख पर्यटन स्थळांचे प्रभावी चित्रण करण्यात आले. अरबी समुद्र किनाऱ्यांचे रक्षण करणाऱ्या अभेद्य विजयदुर्ग किल्ल्याची भव्य प्रतिकृती तसेच गणपतीपुळे मंदिराचा देखावा प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत होता. यासोबतच कोकणातील निसर्गरम्य होम स्टे आणि ग्रामीण पर्यटनाचा देखावास्कुबा डायव्हिंगडॉल्फिन प्रतिकृती आणि जलक्रिडांमधील लोकप्रिय बनाना राइडचे कलात्मक सादरीकरण करण्यात आले.

कोकणच्या दळणवळणात क्रांती घडवून आणणाऱ्या रो-रो फेरीची प्रतिकृती हे चित्ररथाचे मुख्य आकर्षण ठरले. यामुळे कोकणचे नैसर्गिक सौंदर्यसाहसी पर्यटन आणि आधुनिक पायाभूत सुविधा यांचा एकत्रित अनुभव प्रेक्षकांना घेता आला.

या चित्ररथासोबत पर्यटन विभागाने सादर केलेले विशेष गीतही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. या गीतातून कोकणचे पर्यटन प्रभावीपणे मांडण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील मुख्य संचलनात सहभागी झालेल्या या चित्ररथाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या पर्यटन वैभवाचा डंका पुन्हा एकदा देशभर गाजला.

            पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे म्हणाले कीप्रजासत्ताक दिनाच्या संचलनात कोकण पर्यटन’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथाचा आम्हाला अभिमान असून कोकणचा नैसर्गिकसांस्कृतिक आणि ऐतिहासिक ठेवा देशभर पोहोचवण्याचा हा प्रभावी प्रयत्न आहे. या माध्यमातून महाराष्ट्राच्या पर्यटन क्षमतेचे सशक्त दर्शन घडले आहे. हा उपक्रम कोकण पर्यटनाला नवी ऊर्जा देणारा ठरेल.    

पर्यटन संचालनालयाचे संचालक डॉ. बी. एन. पाटील म्हणाले कीकोकण पर्यटन चित्ररथातून पारंपरिक वारसा आणि आधुनिक पर्यटन सुविधा यांचा समतोल साधण्यात यश आले आहे. विजयदुर्गगणपतीपुळेजलक्रीडा आणि रो-रो फेरीसारख्या संकल्पनांमुळे प्रेक्षकांना कोकणचा सर्वांगीण अनुभव मिळाला. हा चित्ररथ महाराष्ट्र पर्यटनाच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरेल.

प्रगतीचा संदेश देणारे चित्ररथ

 प्रगतीचा संदेश देणारे चित्ररथ

 

ग्रामविकास व पंचायतराज विभागमराठी भाषा विभागसहकारपणन आणि वस्त्रोद्योग विभागपाणी पुरवठा व स्वच्छता विभागसार्वजनिक आरोग्य विभागसामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागपर्यटन विभागजलसंपदा विभागइतर मागास बहुजन कल्याण विभागअन्ननागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागसांस्कृतिक कार्य विभागआदिवासी विकास विभागकृषी विभागगृह विभागवाहतूकअल्पसंख्याक विभागउच्च व तंत्रशिक्षण विभागकामगार विभागकौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता विभागगृहनिर्माण विभागवन विभाग आणि ऊर्जा विभागाच्या चित्ररथांनी संचलनात सहभाग घेतला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मृण्मयी भजक आणि पल्लवी मुजुमदार यांनी केले. तरकिरण शिंदेअरुण शिंदेविवेक शिंदे आणि कु.आराध्या शिंदे यांनी सनई चौघडा वादन केले.

 

संचलनात विविध पथकांचा सहभाग

 संचलनात विविध पथकांचा सहभाग

प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात भारतीय नौदलगोवा पोलीसराज्य राखीव पोलीस बलबृहन्मुंबई पोलीस सशस्त्र दलबृहन्मुंबई पोलीस दंगल नियंत्रण पथकबृहन्मुंबई सशस्त्र महिला पोलीस दलमुंबई लोहमार्ग पोलीस दलगडचिरोली व गोंदिया जिल्ह्याचे सी-६० पथकगृह रक्षक दल (पुरुष)बृहन्मुंबई वाहतूक पोलीस दलगृहरक्षक दल (महिला)राज्य उत्पादन शुल्क विभागवन विभाग: मुंबई अग्निशमन दलबृहन्मुंबई महानगरपालिका सुरक्षा दलसुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मुंबई व ठाणे जिल्हाराष्ट्रीय सेवा योजना (मुले/मुली)सी.कॅडेट कोअर (मुली)सी.कॅडेट कोअर (मुले)रोड सेफ्टी पेट्रोल (मुली) रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूलदहिसर मुंबईरोड सेफ्टी पेट्रोल (मुले) सेंट पॉल हायस्कूलदादरमुंबईरोड सेफ्टी पॅट्रोल (मुली) सेंट पॉल कॉन्व्हेंट हायस्कूलदादरमुंबईरोड सेफ्टी पेट्रोल (मुले) डॉ.अँटोनिओ डा सिल्वा हायस्कूल दादरमुंबईरोड सेफ्टी पेट्रोलमनपा (मुली) वामनराव महाडिक उर्दू आणि पंतनगर मनपा इंग्रजी शाळाघाटकोपर (पूर्व)मुंबईरोड सेफ्टी पेट्रोल मनपा (मुले) जी.व्ही. स्कीम मुलुंड आणि क.दा. गायकवाड हिंदी शाळासायन भोईवाडामुंबईभारत स्काऊट गाईड मनपा शाळा (मुली)भारत स्काऊट गाईड मनपा शाळा (मुले)स्टुडंट पोलीस कॅडेट (मुले/मुली) पुणे विद्याभवन पंतनगर आणि शिवाजी टेक्निकल स्कूल पंतनगरमुंबई यांच्यासह पाईप बँडमहिला पाईप बँडब्रास बँड पथकअश्वदल पोलीस पथक सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे भारतीय नौदलबृहन्मुंबई पोलीस दलमहिला निर्भया पथक आणि बृहन्मुंबई अग्निशमन दलाच्या वाहनांनी संचलनात सहभाग घेतला. नौदलाचे कमांडर पंकज बघेल

शेतकऱ्यांच्या हितासाठी शासन कटिबद्ध

 शेतकऱ्यांच्या हितासाठी शासन कटिबद्ध

शेतकऱ्यांच्या हितासाठी शासन कटिबद्ध असून अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना भरघोस मदत करण्यात आली आहे. पुढील टप्प्यात दुष्काळमुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी नदीजोड प्रकल्प राबवून राज्याच्या कानाकोपऱ्यात पाणी पोहोचविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात महाराष्ट्र नवे विक्रम प्रस्थापित करीत असून मुंबई महानगर प्रदेशातील पायाभूत प्रकल्पसमृद्धी महामार्ग आणि शक्तिपीठ महामार्ग यांसारखे प्रकल्प राज्याच्या विकासाला गती देणारे ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले.

स्वातंत्र्य, समता व बंधुता ही मूल्ये भारतीय संस्कृतीत रुजलेली

 स्वातंत्र्यसमता व बंधुता ही मूल्ये भारतीय संस्कृतीत रुजलेली

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पण करतसंविधान निर्मितीसाठी त्यांनी व संविधान समितीच्या सदस्यांनी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. स्वातंत्र्यसमता व बंधुता ही मूल्ये भारतीय संस्कृतीत रुजलेली असून त्यांचे प्रभावी प्रतिबिंब भारतीय संविधानात दिसून येतेअसे त्यांनी सांगितले. भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेली बंधुतेची भावना संविधानाच्या केंद्रस्थानी असल्याचेही त्यांनी नमूद केले.

भारताची महत्त्वपूर्ण जागतिक शक्ती व अर्थव्यवस्था म्हणून ओळख

 भारताची महत्त्वपूर्ण जागतिक शक्ती व अर्थव्यवस्था म्हणून ओळख

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताकडे आज एक महत्त्वपूर्ण जागतिक शक्ती व अर्थव्यवस्था म्हणून पाहिले जात असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले कीहे यश संविधानाने दिलेल्या लोकशाही व्यवस्थेमुळेच शक्य झाले आहे. महाराष्ट्र ही संतांची व वीरांची भूमी असून छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या स्वाभिमानाच्या मूल्यांवर राज्याची प्रगती सुरू आहे. विदर्भमराठवाडाउत्तर महाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रकोकण आणि मुंबईसह राज्यातील सर्व भागांमध्ये गुंतवणूक व रोजगारनिर्मिती होत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

 

पायाभूत प्रकल्पांविषयी

 पायाभूत प्रकल्पांविषयी...

· छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मेट्रो लाईन 8 जोडणीस मान्यता.

· मेट्रो मार्गाची एकूण लांबी 35 किलोमीटर, भूमिगत मार्ग 9.25 किलोमीटर, उन्नत मार्ग 24.636 किमी, एकूण 20 स्थानके, 6 स्थानके भूमिगत, 14 स्थानके उन्नत.  

· छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल 2 स्थानक ते घाटकोपर (पूर्व) पर्यंत भूमिगत स्थानके.

· घाटकोपर (पश्चिम) स्थानक ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल दोन स्थानकापर्यंत उन्नत स्थानके, दोन स्थानकांतील सरासरी अंतर 1.9 किलोमीटर.

· 30.7 हेक्टर भूसंपादनाची आवश्यकता, भूसंपादनासाठी 388 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित. प्रकल्प पूर्ण होण्यासाठी एकूण 22 हजार 862 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित.

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर परिक्रमा मार्गाची निर्मिती, मार्गाची एकूण लांबी 66.15 किलोमीटर, या प्रकल्पासाठी एकूण 3 हजार 954 कोटीच्या खर्चास मान्यता. या प्रकल्पाला विशेष बाब म्हणून 50 टक्के भूसंपादन झाल्यास कार्यादेश देण्याचा निर्णय.

गडचिरोली जिल्ह्यातील खनिज वाहतुकीसाठी नवेगाव मोरे - कोनसरी - मूळचेरा - हेदरी - सुरजागड महामार्गाच्या सुधारित 85.76 किलोमीटर लांबीस मान्यता, चार पदरी सिमेंट काँक्रिटकरणाचा महामार्ग.

Featured post

Lakshvedhi