Sunday, 4 January 2026

राज्यात लोकसंख्यानिहाय आरोग्य उपकेंद्र ते संदर्भ सेवा

 राज्यात लोकसंख्यानिहाय आरोग्य उपकेंद्र ते संदर्भ सेवा रुग्णालयापर्यंत बळकटीकरणावर भर देत  दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्यासाठी राज्याच्या बृहत आराखडा तयार करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.

            विधान भवन येथे समिती कक्षात आरोग्य विभागाच्या बांधकामाधीन इमारतींचा आढावा बैठकीत आरोग्यमंत्री श्री आबिटकर बोलत होते

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यात उभारण्यात आलेल्या आरोग्य संस्थांच्या

 आरोग्य मंत्री श्री. आबिटकर म्हणाले की, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यात उभारण्यात आलेल्या आरोग्य संस्थांच्या इमारतींचा रुग्णसेवेत उपयोग करावा. मागणीप्रमाणे आरोग्य संस्थांचे श्रेणीवर्धन करण्यात यावे. आरोग्य संस्थांच्या इमारतींची अंदाजपत्रके तपासून घेण्यात यावीत. रुग्णालयांमध्ये स्वच्छता, रुग्णांना मिळणार आहार आणि मनुष्यबळ याबाबत कुठलीही तडजोड केली जाणार नाही. स्वच्छतेबाबत कटाक्षाने कारवाई करावी. स्वच्छतेच्या कामासाठी नियुक्त  कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन द्यावे. कामात व्यत्यय आणून काम बंद पाडणाऱ्या तसेच कामात कुचराई करीत असलेल्या कंत्राटदारांना काळे यादीत टाकावे संबंधित दोषी अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री आबिटकर यांनी दिले.

Saturday, 3 January 2026

देशातील सर्वात मोठे शिपयार्ड महाराष्ट्रात उभारावे

 देशातील सर्वात मोठे शिपयार्ड महाराष्ट्रात उभारावे

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कोल्हापूर ते वैभववाडी रेल्वे मार्गासाठी भूसंपादन सुरू करावे

बंदरे विभागाची आढावा बैठक

 

नागपूर, दि. 11 : राज्याला लाभलेला 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा, निर्माणाधीन वाढवण बंदर आणि सागरी क्षेत्रातील अपार संधी लक्षात घेता 2026 मध्ये देशातील सर्वात मोठे शिपयार्ड महाराष्ट्रात उभारावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

          विधान भवन स्थित मंत्रीपरिषद सभागृहात आयोजित बैठकीत बंदरे विकास विभागाचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज घेतला. यावेळी मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे उपस्थित होते.

          मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, देशातील सर्वात मोठे शिपयार्ड करण्यासाठी विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करावा. यासाठी जागेची निश्चिती करण्यात यावी. जयगड, आंग्रे, रेडी व विजयवाडा बंदरांचा विकास करण्यासाठी वैभववाडी ते कोल्हापूर रेल्वेमार्ग तयार करावा. या मार्गासाठी राज्य शासनाच्या आर्थिक सहभागाची तरतूद करण्यात यावी. वाढवण बंदर ते नाशिकपर्यंत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ महामार्ग करीत आहे. या महामार्गाच्या दोन्ही बाजूला प्रभावित क्षेत्र लक्षात घेऊन विकासाचे नियोजन करावे.

बंदर असलेल्या परिसराच्या विकासाचे महत्त्व लक्षात घेता या ठिकाणी उद्योग करण्यास गुंतवणूकदारांना आकर्षित करावे. या परिसरात औद्योगिक विकास करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व बंदरे विभाग यांच्या समन्वयातून कंपनी स्थापन करावी. निर्माण होत असलेले वाढवण बंदर लक्षात घेता मोठी बंदरे आणि संबंधित परिसराचा विकास करण्यासाठी विशेष नियोजन प्राधिकरण निर्माण करावे.

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक विषमतेविरोधात लढण्याची प्रेरणा देईल

  

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक

विषमतेविरोधात लढण्याची प्रेरणा देईल

– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

सातारा, दि. ३: क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे नायगाव येथे उभे राहणारे स्मारक त्यांच्या कार्याची आठवण देईल, त्यामुळे लढण्याची प्रेरणा तर मिळेलच परंतु समाजातील विषमतेच्या विरोधात क्रांतीची बिजे तयार होतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. महिलांना अधिकार देण्यासाठी, त्यांना सक्षम करण्यासाठी येथे उभ्या राहणाऱ्या महिला प्रशिक्षण केंद्रात आवश्यक सर्व प्रकारच्या प्रशिक्षणाची व्यवस्था करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

महाराष्ट्राला जीसीसी हब बनवण्याच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा

 महाराष्ट्राला जीसीसी हब बनवण्याच्या दिशेने  महत्त्वाचा टप्पा

मुंबईत येणार जगातील सर्वात मोठा GCC (जीसीसी) प्रोजेक्ट; ४५ हजार रोजगार निर्माण होणार

मायक्रोसॉफ्टसोबत एआय सहकार्याची मोठी घोषणा

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि.12 - महाराष्ट्राला GCC (जीसीसी) हब बनवण्याच्या दिशेने हा अतिशय महत्त्वाचा टप्पा असून ब्रुकफील्ड कंपनी मुंबईत सुमारे 20 लाख चौरस फूट क्षेत्रावर आशियातील सर्वात मोठे Global Capability Center (GCC) अर्थात जागतिक क्षमता केंद्र  उभारणार आहे. या प्रकल्पातून 15,000 थेट आणि 30,000 अप्रत्यक्ष असे एकूण 45,000 रोजगार निर्माण  होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

जिओ कन्व्हेशन सेंटर येथे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला, सीईओ, ANSR , विक्रम आहुजा, ब्रुकफिल्डचे अंकुर गुप्ता यांच्यासोबत  बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. राज्यासाठी अनेक महत्त्वाच्या गुंतवणूक व तांत्रिक भागीदारी  प्रकल्पाच्या अनुषंगाने यावेळी चर्चा करण्यात आली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यातील प्रतिभा, पायाभूत सुविधा आणि उद्योगसुलभ वातावरणामुळे महाराष्ट्र जागतिक कॅपेबिलिटी सेंटरचे पसंतीचे ठिकाण ठरत आहे. नव्या GCC धोरणामुळे मोठ्या प्रमाणात कौशल्याधारित रोजगारनिर्मिती आणि आर्थिक वृद्धी साधली जाईल. जागतिक लॉजिस्टिक्स क्षेत्रातील अग्रणी कंपनी FedEx देखील मुंबई–नवी मुंबई विमानतळ परिसरात आपल्या GCC आणि इतर ऑपरेशन्ससाठी गुंतवणूक करण्यास उत्सुक आहे. 

2024 मध्ये ब्रुकफिल्डने पुण्यात एका मोठ्या वित्तीय सेवा

 2024 मध्ये ब्रुकफिल्डने पुण्यात एका मोठ्या वित्तीय सेवा कंपनीसाठी ‘बिल्ड-टू-सूट’ टॉवर उभारला होता. याच वर्षी MMRDA सोबत 12 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार करण्यात आला. जून 2025 मध्ये कंपनीने बांद्रा-कुर्ला संकुलात 2.1 एकर जागा खरेदी केली आहे.

ब्रुकफिल्डचे वरिष्ठ गुंतवणूक अधिकारी  अंकुर गुप्ता म्हणाले , “आशिया खंडातील कार्यालय विकास क्षेत्रात नवा मापदंड ठरेल असा हा आयकॉनिक प्रकल्प आम्ही उभारत आहोत.   मुंबईत करण्यात आलेली गुंतवणूक आता 4 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक झाली आहे. उच्च दर्जाची, शाश्वत आणि आधुनिक कार्यस्थळे निर्माण करण्यासाठी ब्रुकफिल्ड कटिबद्ध आहे.”

ब्रुकफिल्ड ही भारतातील सर्वात मोठ्या कार्यालयीन मालक आणि ऑपरेटर कंपन्यांपैकी एक असून देशातील सात शहरांमध्ये सुमारे 55 दशलक्ष चौरस फूट क्षेत्राचे व्यवस्थापन करते. उच्च दर्जाच्या, ग्रेड-A प्रकल्पांची विकास व संचालन क्षमता कंपनीने सातत्याने सिद्ध केली आहे. पवईतील प्रस्तावित प्रकल्पाला उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी, सामाजिक सुविधा व मोठ्या प्रमाणातील कुशल मनुष्यबळाचा लाभ मिळणार आहे.

0000

ही उभारणी महाराष्ट्रातील गुंतवणूकदार-अनुकूल वातावरणाबाबत जागतिक कंपन्यांचा वाढता विश्वास

 मुख्यमंत्री म्हणाले की, ही उभारणी महाराष्ट्रातील गुंतवणूकदार-अनुकूल वातावरणाबाबत जागतिक कंपन्यांचा वाढता विश्वास अधोरेखित करणारी आहे. प्रकल्पासाठी 100 टक्के हरित उर्जेचा वापर करण्याचे उद्दिष्ट असून इमारत बाजारातील सर्वोत्तम शाश्वत बांधकाम मानकांनुसार उभारली जाणार आहे. यामुळे मुंबईचे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर हब म्हणूनचे स्थान आणखी मजबूत होणार आहे.

2024 मध्ये ब्रुकफिल्डने पुण्यात एका मोठ्या वित्तीय सेवा कंपनीसाठी ‘बिल्ड-टू-सूट’ टॉवर उभारला होता. याच वर्षी MMRDA सोबत 12 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार करण्यात आला. जून 2025 मध्ये कंपनीने बांद्रा-कुर्ला संकुलात 2.1 एकर जागा खरेदी केली आहे.

Featured post

Lakshvedhi