Sunday, 4 January 2026

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यात उभारण्यात आलेल्या आरोग्य संस्थांच्या

 आरोग्य मंत्री श्री. आबिटकर म्हणाले कीराष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यात उभारण्यात आलेल्या आरोग्य संस्थांच्या इमारतींचा रुग्णसेवेत उपयोग करावा. मागणीप्रमाणे आरोग्य संस्थांचे श्रेणीवर्धन करण्यात यावे. आरोग्य संस्थांच्या इमारतींची अंदाजपत्रके तपासून घेण्यात यावीत. रुग्णालयांमध्ये स्वच्छतारुग्णांना मिळणार आहार आणि मनुष्यबळ याबाबत कुठलीही तडजोड केली जाणार नाही. स्वच्छतेबाबत कटाक्षाने कारवाई करावी. स्वच्छतेच्या कामासाठी नियुक्त  कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन द्यावे. कामात व्यत्यय आणून काम बंद पाडणाऱ्या तसेच कामात कुचराई करीत असलेल्या कंत्राटदारांना काळे यादीत टाकावे संबंधित दोषी अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री आबिटकर यांनी दिले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi