Sunday, 30 November 2025

फ्लश टँकमध्ये मतदार ओळखपत्र फ्लश टँकमध्ये मतदार ओळखपत्र सापडल्यासंदर्भात माहिती देण्याचे

 फ्लश टँकमध्ये मतदार ओळखपत्र  

फ्लश टँकमध्ये मतदार ओळखपत्र सापडल्यासंदर्भात माहिती देण्याचे

मुंबई उपनगर जिल्ह्याचे उप जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे आवाहन

मुंबई, दि. 27 : मुंबई उपनगर जिल्हयातील अंधेरी भागात टॉयलेट फ्लश टँकमध्ये निवडणूक मतदार ओळखपत्र सापडल्याबाबत काही मुद्रित व इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांत वृत्त व व्हिडीओ क्लिप प्रसारित झाली आहे. प्रसारित व्हिडीओ क्लिपमधून कोणताही बोध होत नाही. हे वृत्त सोशल मिडिया येथून घेऊन प्रसारित करण्यात आले असल्याचा खुलासा संबधीत माध्यमांनी केला आहे. त्याची चौकशी केली असता घटना कुठे घडली हे स्पष्ट होत नाही. त्यामुळे ही बातमी व व्हिडीओ क्लिपच्या अनुषंगाने २० नोव्हेंबर. २०२५ रोजी डी. एन. नगर पोलीस स्टेशनमध्ये प्रथम खबर अहवाल (FIR-१२१८/२०२५) अज्ञाताविरुद्ध दाखल करण्यात आला आहे. तरी देखील या वृत्तातील क्लिपबाबत जर कोणत्याही नागरिकांस माहिती असेल तर त्यांनी निदर्शनास आणून द्यावी. त्याची संपूर्ण चौकशी करण्यात येईल, असे मुंबई उपनगर जिल्ह्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांनी कळविले आहेसापडल्यासंदर्भात माहिती देण्याचे

मुंबई उपनगर जिल्ह्याचे उप जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे आवाहन

मुंबईदि. 27 : मुंबई उपनगर जिल्हयातील अंधेरी भागात टॉयलेट फ्लश टँकमध्ये निवडणूक मतदार ओळखपत्र सापडल्याबाबत काही मुद्रित व इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांत वृत्त व व्हिडीओ क्लिप प्रसारित झाली आहे. प्रसारित व्हिडीओ क्लिपमधून कोणताही बोध होत नाही. हे वृत्त सोशल मिडिया येथून घेऊन प्रसारित करण्यात आले असल्याचा खुलासा संबधीत माध्यमांनी केला आहे. त्याची चौकशी केली असता घटना कुठे घडली हे स्पष्ट होत नाही. त्यामुळे ही बातमी व व्हिडीओ क्लिपच्या अनुषंगाने २० नोव्हेंबर. २०२५ रोजी डी. एन. नगर पोलीस स्टेशनमध्ये प्रथम खबर अहवाल (FIR-१२१८/२०२५) अज्ञाताविरुद्ध दाखल करण्यात आला आहे. तरी देखील या वृत्तातील क्लिपबाबत जर कोणत्याही नागरिकांस माहिती असेल तर त्यांनी निदर्शनास आणून द्यावी. त्याची संपूर्ण चौकशी करण्यात येईल, असे मुंबई उपनगर जिल्ह्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांनी कळविले आहे.

0000

महाराष्ट्र शासनाचे १५ वर्षे मुदतीचे १,००० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

 महाराष्ट्र शासनाचे १५ वर्षे मुदतीचे

,००० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

मुंबईदि. २७ : महाराष्ट्र शासनाच्या १५ वर्षे मुदतीच्या १,००० कोटींच्या रोख्यांची विक्री शासनाच्या सुधारित अधिसूचनेतील अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कामासाठी अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईलअशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे.

       अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या १० टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र एका गुंतवणुकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीतजास्त एक टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंत वाटप करण्यात येईल.

       २ डिसेंबर२०२५ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे  मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईल. तर लिलावाचे बीडस् २ डिसेंबर२०२५ रोजी संगणकीय प्रणालीनुसाररिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

        यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारे ई-कुबेर सिस्टीमनुसार सकाळी  १०.३० ते ११.३० वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बीडस् ई-कुबेर सिस्टिमनुसार सकाळी १०.३० ते ११.०० पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान ३ डिसेंबर२०२५  रोजी रोखीनेबँकर्स धनादेश/प्रदान आदेशडिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.

       कर्जरोख्याचा कालावधी १५ वर्षांचा असूनरोख्यांचा कालावधी ३ डिसेंबर२०२५ पासून सुरू होईलतर कर्जरोख्याची परतफेड दिनांक ३ डिसेंबर२०४० रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. व्याजाचा दर हा अधिकतम प्राप्तीचा दर हा लिलावात विक्री केलेल्या रोख्यांवरिल दरसाल दर शेकडा कूपन दरा एवढा असेल. व्याजाचे प्रदान रोख्याच्या मूळ दिनांकापासून मूळ किमतीवर प्रतिवर्षी दिनांक ३ जून आणि ३ डिसेंबर रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

       शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम१९४९ खालील कलम २४ अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतीलअशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

महाराष्ट्र शासनाचे नऊ वर्षे मुदतीचे १,००० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

 महाराष्ट्र शासनाचे नऊ वर्षे मुदतीचे

,००० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

मुंबईदि. २७ : महाराष्ट्र शासनाच्या नऊ वर्षे मुदतीच्या १,००० कोटींच्या रोख्यांची विक्री शासनाच्या सुधारित अधिसूचनेतील अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कामासाठी अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईलअशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे.

       अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या १० टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र एका गुंतवणुकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीतजास्त एक टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंत वाटप करण्यात येईल.

       २ डिसेंबर२०२५ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे  मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईल. तर लिलावाचे बीडस् २ डिसेंबर२०२५ रोजी संगणकीय प्रणालीनुसाररिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

        यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारे ई-कुबेर सिस्टीमनुसार सकाळी  १०.३० ते ११.३० वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बीडस् ई-कुबेर सिस्टिमनुसार सकाळी १०.३० ते ११.०० पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान ३ डिसेंबर२०२५  रोजी रोखीनेबँकर्स धनादेश/प्रदान आदेशडिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.

       कर्जरोख्याचा कालावधी नऊ वर्षांचा असूनरोख्यांचा कालावधी ३ डिसेंबर२०२५ पासून सुरू होईलतर कर्जरोख्याची परतफेड दिनांक ३ डिसेंबर २०३४ रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. व्याजाचा दर हा अधिकतम प्राप्तीचा दर हा लिलावात विक्री केलेल्या रोख्यांवरिल दरसाल दर शेकडा कूपन दरा एवढा असेल. व्याजाचे प्रदान रोख्याच्या मूळ दिनांकापासून मूळ किमतीवर प्रतिवर्षी दिनांक ३ जून आणि ३ डिसेंबर रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

       शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम१९४९ खालील कलम २४ अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतीलअशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

                                                            ००००

महाराष्ट्र शासनाचे चार वर्षे मुदतीचे १,००० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

 महाराष्ट्र शासनाचे चार वर्षे मुदतीचे

,००० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

मुंबईदि. २७ : महाराष्ट्र शासनाच्या चार वर्षे मुदतीच्या १,००० कोटींच्या रोख्यांची विक्री शासनाच्या सुधारित अधिसूचनेतील अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कामासाठी अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईलअशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे.

       अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या १० टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र एका गुंतवणुकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीतजास्त एक टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंत वाटप करण्यात येईल.

       २ डिसेंबर२०२५ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे  मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईल. तर लिलावाचे बीडस् २ डिसेंबर२०२५ रोजी संगणकीय प्रणालीनुसाररिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

        यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारे ई-कुबेर सिस्टीमनुसार सकाळी  १०.३० ते ११.३० वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बीडस् ई-कुबेर सिस्टिमनुसार सकाळी १०.३० ते ११.०० पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान ३ डिसेंबर२०२५  रोजी रोखीनेबँकर्स धनादेश/प्रदान आदेशडिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.

       कर्जरोख्याचा कालावधी चार वर्षांचा असूनरोख्यांचा कालावधी १० सप्टेंबर२०२५ पासून सुरू होईलतर कर्जरोख्याची परतफेड दिनांक १० सप्टेंबर२०२९ रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. व्याजाचा दर हा अधिकतम प्राप्तीचा दर हा लिलावात विक्री केलेल्या रोख्यांवरिल दरसाल दर शेकडा  .७४ टक्के एवढा असेल. व्याजाचे प्रदान रोख्याच्या मूळ दिनांकापासून मूळ किमतीवर प्रतिवर्षी दिनांक १० मार्च आणि १० सप्टेंबर रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

       शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम१९४९ खालील कलम २४ अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतीलअशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

महा-देवा फुटबॉल उपक्रम' अंतर्गत निवडक ६० विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षणासाठी सामंजस्य करार

 'महा-देवा फुटबॉल उपक्रमअंतर्गत निवडक ६० विद्यार्थ्यांना

विशेष प्रशिक्षणासाठी सामंजस्य करार

- क्रीडा मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

मुंबई दि.२७ : राज्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील फुटबॉलमधील प्रतिभेला व्यासपीठ देण्यासाठी महादेवा फुटबॉल उपक्रम अंतर्गत निवड झालेल्या ६० मुला-मुलींना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे.  यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा व युवक कल्याण विभागमहाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा),वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (डब्ल्यूआयएफएआणि व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाऊंडेशन (व्हीएसटीएफयांच्यात  सामंजस्य करार करण्यात आला असल्याची माहिती क्रीडा मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिली.

या उपक्रमांतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना तज्ज्ञ  प्रशिक्षकांकडून प्रशिक्षणआंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधाफिटनेस मॉड्यूल तसेच राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील मोठ्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्याच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. राज्यातील प्रत्येक खेळाडूला योग्य संधीसक्षम मार्गदर्शन आणि दर्जेदार सुविधा देण्यात येणार असल्याचे क्रीडामंत्री कोकाटे यांनी सांगितले.

0000

बीज भांडवल योजनेसाठी अर्ज करण्याचे दिव्यांग व्यक्तींना आवाहन

 बीज भांडवल योजनेसाठी अर्ज करण्याचे दिव्यांग व्यक्तींना आवाहन

मुंबई दि.२७ : दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या बीज भांडवल योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारीमुंबई उपनगर यांनी केले आहे.

या योजनेअंतर्गत लाभ मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज विहीत नमुन्यात दोन प्रतीत सादर करावा लागणार आहे. अर्जासोबत दिव्यांगत्वाचा दाखलादोन पासपोर्ट साईज फोटोजन्मतारखेचा दाखला किंवा वयाचा दाखला उत्पन्नाचा दाखला एक लाखापर्यंत तहसीलदार यांचेकडूनरहिवासी दाखला किंवा जागेचे प्रमाणपत्र रेशनकार्ड. दोन प्रतिष्ठीत व्यक्तीचे दाखले (नगरसेवक/संरपंच/ग्रामसेवक/एस.ई. ओ. यांचेकडून) संबंधित व्यवसायाचे खरेदी कोटेशन १ लाख ५० हजार पर्यंत, राष्ट्रीयकृत बँकेचे नांव व शाखाव्यवसायाचे प्रोजेक्ट रिपोर्ट (सी. ए. कडील) ज्या जागेमध्ये व्यवसाय करणार आहे. त्या जागेची बृहन्मुंबई महानगरपालिका वॉर्ड ऑफिसमधील नोंद कागदपत्रे/संमतीपत्र/भाडे प्रमाणपत्रशॉप ॲक्ट लायन्सेस इत्यादी कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.

इच्छुक दिव्यांग व्यक्तींनी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारीमुंबई उपनगरप्रशासकीय इमारत४ था मजलाआर.सी. मार्गचेंबूर (पूर्व)मुंबई – ७१ येथे संपर्क साधावा. योजनांचे अर्ज  कार्यालयात उपलब्ध असल्याचेही मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी यांनी प्रसीद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त टूर सर्कीटचे आयोजन

 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त टूर सर्कीटचे आयोजन

-पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर  महापरिनिर्वाण दिनानिमित्त पर्यटन संचालनालयाचा कौतुकास्पद उपक्रम

मुंबईदि.29 :  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून  पर्यटन संचालनालयामार्फत दि. 3, ते 5 डिसेंबर 2025 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्कीटचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईतील चैत्यभूमी येथे भेट देणारे पर्यटक तसेच अनुयायींसाठी टूर सर्किट निःशुल्क असणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे प्रेरणादायी  महान कार्यत्यांचे जीवनचरित्रविचार  पर्यटक व नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे हा या टूर सर्कीटचा मुख्य उद्देश आहे.पर्यटकांनी या पर्यटन सर्किटचा  लाभ घ्यावा, असे आवाहन पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पर्यटन सर्किट ही केवळ एक पर्यटन संकल्पना नसूनभारताच्या लोकशाहीचा पाया रचणाऱ्या महामानवाच्या विचारांना अभिवादन आहे. त्यांच्या जीवनातील क्रांतिकारी कार्यसंघर्ष आणि आदर्श या परिपथाच्या माध्यमातून भावी पिढीपर्यंत पोहोचणार आहेत. महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाने हाती घेतलेला हा उपक्रमइतिहाससंस्कृती आणि सामाजिक परिवर्तन यांना जोडणारा प्रेरणादायी प्रवास आहे. या परिपथामुळे अनुयायीपर्यटकांना बाबासाहेबांच्या महत्त्वाच्या स्थळांना भेट देण्याची आणि त्यांच्या विचारसंपदेचा जवळून अनुभव घेण्याची संधी मिळेल. हा केवळ प्रवास नसूनसमानतास्वातंत्र्य आणि बंधुतेच्या मूल्यांची अनुभूती आहे, असे पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई म्हणाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्कीटमध्ये मुंबईतील चैत्यभूमीराजगृहडॉ. बाबासाहेब आंबेडकर इकॉनॉमिक्स व कॉमर्स महाविद्यालयवडाळाडॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनपरळमधील बीआयटी चाळसिद्धार्थ महाविद्यालयफोर्ट या स्थळांचा समावेश आहे.  या टूर सर्कीटच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली स्थळे आणि प्रेरणादायी जीवनाचा प्रवाससामाजिक समताशिक्षण आणि संविधान निर्मितीतील योगदानाचे महत्त्व सर्व सामान्य नागरिक व पर्यटकांपर्यंत पोहोचविण्याचा हा शासनाचा प्रयत्न आहे.

            टूर सर्कीट अंतर्गत दररोज 3 बसेस उपलब्ध करण्यात आल्या असून प्रथम येणाऱ्यांना प्रथम प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश देण्यात येईल. सहलीमध्ये सहभागी होणारे पर्यटक/अनुयायी यांच्यासाठी निःशुल्क प्रवाससहल मार्गदर्शकअल्पोपहार आदी सोयी-सुविधा पर्यटन संचालनालयाद्वारे पुरविण्यात येणार आहेत. पर्यटन संचालनालयाने या सर्किटचे योग्य नियोजन केले असून पर्यटकांना सर्वोत्तम अनुभव देण्यासाठी हे टूर सर्किट महत्त्वपूर्ण ठरेल.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्कीटचा शुभारंभ  3 डिसेंबर 2025रोजी सकाळी  9.30 वाजता वीर सावरकर राष्ट्रीय स्मारक समोर गणपती मंदिरशिवाजी पार्क येथे पार पडेल. सदर टूर सर्कीटची सुरुवात चैत्यभूमीदादरमुंबई येथून सकाळी 9.30 वाजता होऊन  सहलीचा समारोप चैत्यभूमी दादर येथे होणार आहे.

000

*सहलीसाठी संपर्क :* 

सूरज चतुर्वेदी - ८१०८१७५५३०

पवन पवार – ७६६६६०३२११                                

पर्यटन संचालनालय चॅटबोट क्र – ९९९३३०८८८३

Featured post

Lakshvedhi