बीज भांडवल योजनेसाठी अर्ज करण्याचे दिव्यांग व्यक्तींना आवाहन
मुंबई दि.२७ : दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या बीज भांडवल योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी, मुंबई उपनगर यांनी केले आहे.
या योजनेअंतर्गत लाभ मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज विहीत नमुन्यात दोन प्रतीत सादर करावा लागणार आहे. अर्जासोबत दिव्यांगत्वाचा दाखला, दोन पासपोर्ट साईज फोटो, जन्मतारखेचा दाखला किंवा वयाचा दाखला उत्पन्नाचा दाखला एक लाखापर्यंत तहसीलदार यांचेकडून, रहिवासी दाखला किंवा जागेचे प्रमाणपत्र रेशनकार्ड. दोन प्रतिष्ठीत व्यक्तीचे दाखले (नगरसेवक/संरपंच/ग्रामसेवक/एस.
इच्छुक दिव्यांग व्यक्तींनी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी, मुंबई उपनगर, प्रशासकीय इमारत, ४ था मजला, आर.सी. मार्ग, चेंबूर (पूर्व), मुंबई – ७१ येथे संपर्क साधावा. योजनांचे अर्ज कार्यालयात उपलब्ध असल्याचेही मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी यांनी प्रसीद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
No comments:
Post a Comment