Tuesday, 16 September 2025

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

 मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी 

महाराष्ट्रात मोठ्या संधी

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मत्स्यव्यवसाय सुधारणा व दीर्घकालीन विकासासाठी बैठक

 

मुंबईदि १५ : मत्स्यव्यवसाय आणि पशुसंवर्धन क्षेत्रात विकासाच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धनसह कृषी आणि बांधकाम क्षेत्रात आंध्र प्रदेशच्या धर्तीवर राज्यात कार्यक्रम राबवावा असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

वर्षा निवासस्थानी राज्यातील मत्स्यव्यवसाय क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक झाली. राज्यातील मत्स्य व्यवसायत्याचा विकासआर्थिक तरतुदीतसेच दीर्घमध्यम आणि लघुकालीन उद्दिष्टांची आखणी याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीस पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेमत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणेग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे‘मैत्री’ संस्थेचे प्रवीण परदेशीसंबंधित विभागाचे अपर मुख्य सचिवप्रधान सचिवसचिवआयुक्त यांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले कीमत्स्य व्यवसाय हा ग्रामीण व सागरी भागातील लाखो कुटुंबांचा मुख्य आधार आहे. या क्षेत्रात आर्थिक वाढीच्या प्रचंड संधी आहेत. यासाठी व्यापक धोरण तयार करण्यावर भर देण्यात येत आहे. आज झालेल्या सादरीकरणातून विकासाचा स्पष्ट मार्ग दिसत असून २०४७ पर्यंत या क्षेत्रातील विकासाच्या माध्यमातून राज्य विकसित अर्थव्यवस्थेच्या दिशेने जाऊ शकते. महिलांनी विकासात योगदान देणे हे महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीव्हिजन मॅनेजमेंट युनिटची स्थापना करून मत्स्य व्यवसाय क्षेत्रातील नियोजन व अंमलबजावणी अधिक कार्यक्षम बनवावी. राज्यातील तज्ज्ञअधिकारी आणि स्थानिक घटक यांच्या सहभागातून तयार केलेले व्हिजन डॉक्युमेंट मत्स्यव्यवसाय विकासासाठी उपयुक्त असून त्याची अंमलबजावणी गतीने करावी. मत्स्यव्यवसाय वाढीसाठी आर्थिक तरतूद वाढविण्यात येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विविध योजनाप्रकल्प व पायाभूत सुविधा उभारणीबाबत सूचना मांडल्या.

यावेळी राज्यातील विविध क्षेत्रात असलेल्या विकासाच्या संधी तसेच एक ट्रिलियन अर्थ व्यवस्थेसाठी करावयाच्या उपाययोजना आणि धोरणात्मक सुधारणा याविषयीही चर्चा करण्यात आली.

Monday, 15 September 2025

तुमच्या नजरेतून महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे’ (Maharashtra Destinations Throgh Your Lens)' उपक्रम

 तुमच्या नजरेतून महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे’

(Maharashtra Destinations Throgh Your Lens)' उपक्रम

       महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा प्रचार व प्रसिद्धी होण्यासाठी 'तुमच्या नजरेतून महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे (Maharashtra Destinations Throgh Your Lens)'  हा  उपक्रम ‘एमटीडीसी’ मार्फत राबविण्यात येत आहे. या उपक्रमात प्रवाशांनी घेतलेली निवडक छायाचित्रेफोटो ऑफ दि डेफोटो ऑफ दी मन्थफोटो ऑफ दी इअर या श्रेणीमध्ये विभागणी करून समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करण्यात येतील. डिजिटल फोटो गॅलरीमध्ये निवडक छायाचित्रकारांची माहिती प्रदर्शित केली जाईल. फोटो ऑफ दि इअर या श्रेणींसाठी नामवंत पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींच्या समितीकडून छायाचित्र निवडण्यात येतील. प्रथम विजेत्यांस ५ लाख रूपयेप्रथम उपविजेता - १ लाख रूपये, द्वितीय उपविजेता - ७५ हजारपाच उत्स्फुर्त पारितोषिके प्रत्येकी ५० हजार रूपये याप्रमाणे देण्यात येतील. फोटो ऑफ दि मन्थ विजेत्यांना दोन जणांसाठी तीन दिवस, दोन रात्रीचे एमटीडीसी रिसॉर्टमध्ये विनामूल्य राहता येईल. फोटो ऑफ दि डेफोटो ऑफ दी मन्थ ची निवड समाजमाध्यमावरून मतदानावर आधारित निकषानुसार करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र पर्यटन विकास रिसार्टचे उत्पन्न वाढविण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्यात यावी.

 महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या अखत्यारितील सर्व रिसॉर्टसची उत्पन्ननिहाय वर्गवारी  करण्यात यावी. रिसार्टचे उत्पन्न वाढविण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्यात यावी. प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात येणाऱ्या पर्यटन सुरक्षा दल निर्मितीबाबत वाहने घेण्याच्या कार्यवाहीला गती देण्यात यावी. महामंडळामार्फत निवास कार्यव्यवसाय विकासप्रसिद्धी अशा कार्यक्षेत्रात नवीन उपक्रम हाती घेतले आहेत त्यांना गती देण्यात यावी. क्रुझ पर्यटन विकासजबाबदार पर्यटनपी.एम.गतीशक्ती उपक्रमाशी सुसंगत डेटा आधारित नियोजनसमन्वय आणि पर्यटन प्रकल्पांचे नियोजन करावे. विकसित महाराष्ट्र २०४७ अंतर्गत उपक्रम प्रभावीपणे राबवावेत. सार्वजनिक खासगी भागीदारी धोरणाचा अवलंब करण्यात यावागुलदार प्रकल्पाचे काम गतीने करावे असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या कामकाजाचा आढावाही त्यांनी यावेळी घेतला

'तुमच्या नजरेतून महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे' उपक्रमात प्रथम विजेत्याला पाच लाख रूपयांचे पारितोषिक देणार

 'तुमच्या नजरेतून महाराष्ट्रातील पर्यटन स्थळेउपक्रमात

प्रथम विजेत्याला पाच लाख रूपयांचे पारितोषिक देणार

- पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

 

मुंबई, दि. १५ : राज्यातील पर्यटन स्थळांचा प्रवासी छायाचित्रणांच्या माध्यमातून प्रचार व प्रसिध्दीसाठी ‘तुमच्या नजरेतून महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे’ (Maharashtra Destinations Throgh Your Lens)' या उपक्रमात प्रवासी छायाचित्रकारांनी घेतलेल्या छायाचित्रांतील निवडक छायाचित्रातील प्रथम विजेत्याला ५ लाख रूपयांचे पारितोषिक देण्यात येईल असे पर्यटनमंत्री शंभुराज देसाई  यांनी सांगितले.

        

            पर्यटन मंत्री शंभूराज देसाई म्हणाले कीमहाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचे सौंदर्यवैविध्य आणि सांस्कृतिक समृद्धी याची प्रचार व प्रसिध्दी मोठ्या प्रमाणात होण्यासाठी ‘तुमच्या नजरेतून महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे’ (Maharashtra Destinations Throgh Your Lens)'  हा उपक्रम राबवला जात आहे. तो अत्यंत चांगला आहे. या उपक्रमात जास्तीत जास्त पर्यटनप्रेमींनी सहभाग घ्यावा यासाठी प्रथम विजेत्याला २.५० लाख ऐवजी ५ लाख रूपयांचे पारितोषिक देण्यात येईल.

पुण्यात आणि राज्यात इतर ठिकाणी पडलेल्या पावसाचा आढावा घेतला.

 पुण्यात आणि राज्यात इतर ठिकाणी पडलेल्या पावसाचा आढावा घेतला. आष्टी पाथर्डी तालुक्यातील काही गावांना पुराच्या पाण्याने वेढल्याने त्यात ४० गावकरी अडकून पडले होते. त्यांना एनडीआरएफच्या मदतीने एअरलिफ्ट करून बाहेर काढावे लागेल, असे संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानुसार नाशिक वरून हेलिकॉप्टर बोलवून या अडकलेल्या लोकांना तत्काळ एअरलिफ्ट करून सुरक्षित ठिकाणी हलवावे असे निर्देश उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले. तसेच छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्तांशी देखील त्यांनी या कक्षातून संवाद साधला.

 

भारतीय हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठी दिलेल्या हवामान अंदाजानुसार पावसाची परिस्थिती कशी राहणार आहे त्यानुसार आपत्ती नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाने दक्षता घेण्याचे उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

 

गेल्या २४ तासात सचेत ॲपच्या माध्यमातून राज्यभरात पावसाचा अलर्ट देणारे ३५ कोटी मेसेज पाठविण्यात आल्याची माहिती डॉ. चव्हाण यांनी यावेळी दिली.


राज्य आपत्कालीन कार्य केंद्राला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली भेट मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मदत आणि

 राज्य आपत्कालीन कार्य केंद्राला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली भेट

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मदत आणि बचावकार्यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्क रहावे

 -उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आष्टी तालुक्यात पुरामुळे अडकलेल्या ४० जणांना एअरलिफ्ट करण्याचे दिले निर्देश

 

मुंबईदि. १५: मुंबईसह राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयातील राज्य आपत्कालीन कार्य केंद्राला भेट देऊन पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. बीड जिल्ह्यातील आष्टी पाथर्डी तालुक्यातील काही गावांना पुराच्या पाण्याने वेढल्याने अडकलेल्या ४० ग्रामस्थांना एनडीआरएफच्या मदतीने एअरलिफ्ट करून सुरक्षित ठिकाणी हलवावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. अतिवृष्टी असलेल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी यावेळी त्यांनी संवाद साधत मदत आणि बचाव कार्याबाबत माहिती  घेतली आणि जिल्हा प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना दिल्या.

 

यावेळी उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नविन सोनाकार्य केंद्राचे संचालक डॉ. भालचंद्र चव्हाण आदी उपस्थित होत. यावेळी डॉ. चव्हाण यांनी राज्यातील परिस्थ‍ितीची माहिती दिली. यावेळी त्यांनी पुणेछत्रपती संभाजीनगर आणि मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरुन संवाद साधत त्यांच्याकडून पावसाची परिस्थिती जाणून घेतली. तसेच मुंबईत जिथे जिथे पाणी साचल्याच्या तक्रारी येत आहेत तिथे अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करून लवकरात लवकर पाण्याचा निचरा होण्यासाठी पंप बसविण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

ह्युंदाई कंपनी राज्यात सामाजिक उत्तरदायित्वअंतर्गत विविध कामांसाठी ५६ कोटी रुपयांचा निधी

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेकंपनी राज्यात सामाजिक उत्तरदायित्वअंतर्गत विविध कामांसाठी ५६ कोटी रुपयांचा निधी देत आहे. ही बाब स्तुत्य असून या निधीतून राज्यात सुरू असलेली कामे पथदर्शी ठरतील. या निधीतून कंपनीने पर्यावरण संवर्धनासाठी काम करीत रस्ता सुरक्षाचालक प्रशिक्षण आदींमध्ये काम करावे. राज्यात उद्योगस्नेही वातावरण तयार करून उद्योगांना सहकार्य करण्याची राज्य शासनाची भूमिका आहेअसेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

बैठकीत कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सादरीकरण करीत कंपनीच्या गुंतवणुकीसंदर्भातील माहिती दिली. पुणे येथील प्रकल्पाच्या कामाची माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून पुणे जिल्ह्यातील तळेगाव येथील वृक्षारोपण मोहीमरस्ता सुरक्षा उपक्रम आदींचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला.

0000

Featured post

Lakshvedhi