Monday, 15 September 2025

महाराष्ट्र पर्यटन विकास रिसार्टचे उत्पन्न वाढविण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्यात यावी.

 महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या अखत्यारितील सर्व रिसॉर्टसची उत्पन्ननिहाय वर्गवारी  करण्यात यावी. रिसार्टचे उत्पन्न वाढविण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्यात यावी. प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात येणाऱ्या पर्यटन सुरक्षा दल निर्मितीबाबत वाहने घेण्याच्या कार्यवाहीला गती देण्यात यावी. महामंडळामार्फत निवास कार्यव्यवसाय विकासप्रसिद्धी अशा कार्यक्षेत्रात नवीन उपक्रम हाती घेतले आहेत त्यांना गती देण्यात यावी. क्रुझ पर्यटन विकासजबाबदार पर्यटनपी.एम.गतीशक्ती उपक्रमाशी सुसंगत डेटा आधारित नियोजनसमन्वय आणि पर्यटन प्रकल्पांचे नियोजन करावे. विकसित महाराष्ट्र २०४७ अंतर्गत उपक्रम प्रभावीपणे राबवावेत. सार्वजनिक खासगी भागीदारी धोरणाचा अवलंब करण्यात यावागुलदार प्रकल्पाचे काम गतीने करावे असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या कामकाजाचा आढावाही त्यांनी यावेळी घेतला

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi