तुमच्या नजरेतून महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे’
(Maharashtra Destinations Throgh Your Lens)' उपक्रम
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा प्रचार व प्रसिद्धी होण्यासाठी 'तुमच्या नजरेतून महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे (Maharashtra Destinations Throgh Your Lens)' हा उपक्रम ‘एमटीडीसी’ मार्फत राबविण्यात येत आहे. या उपक्रमात प्रवाशांनी घेतलेली निवडक छायाचित्रे, फोटो ऑफ दि डे, फोटो ऑफ दी मन्थ, फोटो ऑफ दी इअर या श्रेणीमध्ये विभागणी करून समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करण्यात येतील. डिजिटल फोटो गॅलरीमध्ये निवडक छायाचित्रकारांची माहिती प्रदर्शित केली जाईल. फोटो ऑफ दि इअर या श्रेणींसाठी नामवंत पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींच्या समितीकडून छायाचित्र निवडण्यात येतील. प्रथम विजेत्यांस ५ लाख रूपये, प्रथम उपविजेता - १ लाख रूपये, द्वितीय उपविजेता - ७५ हजार, पाच उत्स्फुर्त पारितोषिके प्रत्येकी ५० हजार रूपये याप्रमाणे देण्यात येतील. फोटो ऑफ दि मन्थ विजेत्यांना दोन जणांसाठी तीन दिवस, दोन रात्रीचे एमटीडीसी रिसॉर्टमध्ये विनामूल्य राहता येईल. फोटो ऑफ दि डे, फोटो ऑफ दी मन्थ ची निवड समाजमाध्यमावरून मतदानावर आधारित निकषानुसार करण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment