'तुमच्या नजरेतून महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे' उपक्रमात
प्रथम विजेत्याला पाच लाख रूपयांचे पारितोषिक देणार
- पर्यटनमंत्री शंभूराज देसाई
मुंबई, दि. १५ : राज्यातील पर्यटन स्थळांचा प्रवासी छायाचित्रणांच्या माध्यमातून प्रचार व प्रसिध्दीसाठी ‘तुमच्या नजरेतून महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे’ (Maharashtra Destinations Throgh Your Lens)' या उपक्रमात प्रवासी छायाचित्रकारांनी घेतलेल्या छायाचित्रांतील निवडक छायाचित्रातील प्रथम विजेत्याला ५ लाख रूपयांचे पारितोषिक देण्यात येईल असे पर्यटनमंत्री शंभुराज देसाई यांनी सांगितले.
पर्यटन मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचे सौंदर्य, वैविध्य आणि सांस्कृतिक समृद्धी याची प्रचार व प्रसिध्दी मोठ्या प्रमाणात होण्यासाठी ‘तुमच्या नजरेतून महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे’ (Maharashtra Destinations Throgh Your Lens)' हा उपक्रम राबवला जात आहे. तो अत्यंत चांगला आहे. या उपक्रमात जास्तीत जास्त पर्यटनप्रेमींनी सहभाग घ्यावा यासाठी प्रथम विजेत्याला २.५० लाख ऐवजी ५ लाख रूपयांचे पारितोषिक देण्यात येईल.
No comments:
Post a Comment