Thursday, 11 September 2025

इतर मागास समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहे सुरू करण्याच्या कार्यवाहीला गती

 महसूल मंत्री श्री. बावनकुळे म्हणालेइतर मागास समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहे सुरू करण्याच्या कार्यवाहीला गती देण्यात यावी. वसतीगृहांसाठी लागणाऱ्या जागेबाबत लवकरच सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येईल. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सोयीसुविधा उपलब्ध करून देणे हे शासनाचे प्राधान्य आहे. यासाठी वसतीगृहांच्या उभारणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात आवश्यक असलेली जागास्थानिक गरजा व विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेऊन सविस्तर आराखडा विभागाने तयार करावा.ओबीसी समाजाच्या प्रश्नांवर उपाययोजना करण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या उपसमितीच्या शिफारशींबाबत विभागाने केलेल्या कार्यवाहीचा सविस्तर अहवाल पुढील बैठकीत सादर करावा असे त्यांनी यावेळी सांगितले.

ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारे धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची शासनाची भूमिका आहे. शासनाचा निर्णय हा सरसकट नसून पुराव्यावर आधारित आहे. फक्त कुणबी असल्याचे अधिकृत पुरावे सादर करणाऱ्यांनाच या आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. यासंदर्भात प्रमाणपत्रांचे वितरण करताना प्रांत अधिकाऱ्यांनी नियमावलीचे काटेकोर पालन करावेअसे महसूल मंत्री श्री. बावनकुळे यांनी यावेळी सांगितले.

  बैठकीत इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची अंमलबजावणीप्रलंबित बाबी आणि निधी वाटपाचा आढावा घेण्यात आला. बैठकीस नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीम गुप्तासामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळेइतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सचिव ए.बी. धुळाज, वित्त विभागाच्या सचिव शैला ए., संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित 

ओबीसी’ महामंडळांना निधी वाटपात भेदभाव होणार नाही

 ‘ओबीसी’ महामंडळांना निधी वाटपात भेदभाव होणार नाही

- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

 

मुंबईदि. १० : शैक्षणिकआर्थिक व सामाजिक विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या महामंडळांना त्यांच्या गरजेनुसार पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. राज्यातील सर्व समाजघटकांना समप्रमाणात न्याय मिळावाहा शासनाचा उद्देश आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत कार्यरत असलेल्या महामंडळांना निधी वाटप करताना कोणताही भेदभाव होणार नाही. सर्व समाजघटकांना समप्रमाणात न्याय मिळावा यासाठी निधी वाटपात सुसूत्रता आणण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली इतर मागासवर्गीय समाजाच्या सामाजिकशैक्षणिक व आर्थिक स्थितीबाबत तसेच इतर संलग्न बाबींवरील करावयाच्या कार्यवाहीबाबत गठीत करण्यात आलेल्या मंत्रीमंडळ उपसमितीची पहिली बैठक मंत्रालयात झाली. त्यावेळी ते बोलत होते.

अमरावती विभाग स्वच्छता कर्मचारी, अभियंता आणि पर्यावरण तज्ज्ञ यांच्या अथक परिश्रमाचा परिणाम

 अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी हा पुरस्कार संपूर्ण अमरावतीकरांचा सामूहिक विजय असल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या, "हा सन्मान केवळ महानगरपालिकेचा नाही, तर प्रत्येक नागरिक, स्वच्छता कर्मचारी, अभियंता आणि पर्यावरण तज्ज्ञ यांच्या अथक परिश्रमाचा परिणाम आहे. हा पुरस्कार आम्हाला भविष्यात पर्यावरणस्नेही धोरणे अधिक दृढतेने राबवण्यासाठी आणि अमरावतीला हरित शहर म्हणून नवी ओळख देण्यासाठी प्रेरणा देईल."


या सोहळ्यात इंदूर, जबलपूर, आग्रा, सूरत, झाशी, मुरादाबाद, अल्वर, देवास, परवानू आणि अंगुल या शहरांचाही त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी सन्मान करण्यात आला. तसेच, इंदूर आणि उदयपूर यांना रामसर करारांतर्गत पाणथळ शहर म्हणून आंतरराष्ट्रीय मान्यता देण्यात आली.

राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत १३० शहरांमध्ये

 राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत १३० शहरांमध्ये घेण्यात आलेल्या या सर्वेक्षणात हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी अमरावतीने केलेल्या ठोस उपाययोजनांनी सर्वांचे लक्ष वेधले. शहराने रस्त्यांच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा केली, ज्यामध्ये ३४० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांसह पदपथांची निर्मिती, ५३ उद्यानांचे हरितीकरण आणि १९ एकर ओसाड जमिनीचे घनदाट जंगलात रूपांतर यासारख्या उल्लेखनीय कामगिरीचा समावेश आहे. याशिवाय, धूळ नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन, जनजागृती मोहीम आणि हरित आच्छादन वाढवण्याच्या प्रयत्नांमुळे अमरावतीने स्वच्छ हवेच्या बाबतीत देशात आघाडी घेतली.

स्वच्छ वायू सर्वेक्षण २०२५ मध्ये अमरावती प्रथम७५ लाखांचे पारितोषिक आणि ट्रॉफीने सन्मानित

 वृत्त क्र. 3632

स्वच्छ वायू सर्वेक्षण २०२५ मध्ये अमरावती प्रथम

केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते

७५ लाखांचे पारितोषिक आणि ट्रॉफीने सन्मानित

 

नवी दिल्ली, १० : अमरावती शहराने स्वच्छ हवेच्या बाबतीत देशात अव्वल स्थान पटकावले आहे. केंद्रीय पर्यावरणवन आणि हवामान बदल मंत्रालयाने आयोजित स्वच्छ वायू सर्वेक्षण २०२५ मध्ये अमरावतीने ३ ते १० लाख लोकसंख्या असलेल्या शहरांच्या गटात प्रथम क्रमांक मिळवला आहे.

दिल्लीत झालेल्या सोहळ्यात केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते अमरावती महानगरपालिकेला ७५ लाख रुपयांचे रोख पारितोषिक आणि ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.

 अमरावती महानगरपालिकेने स्वच्छ वायू सर्वेक्षण २०२५ मध्ये देशातील ३ ते १० लाख लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये प्रथम स्थान पटकावले आहे. राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम (एनसीएपी) अंतर्गत घेण्यात आलेल्या या सर्वेक्षणात अमरावतीने २०० पैकी २०० गुण मिळवत उत्कृष्ट कामगिरी केली. केंद्रीय पर्यावरणवन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव आणि राज्यमंत्री कीर्ति वर्धन सिंह यांच्या हस्ते अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांना दिल्लीत आयोजित एका भव्य सोहळ्यात ७५ लाख रुपयांचे रोख पारितोषिक आणि ट्रॉफी प्रदान करण्यात आली.

सेवा पंधरवडा सर्व विभागीय आयुक्तांनी आपापल्या विभागामध्ये

 सर्व विभागीय आयुक्तांनी आपापल्या विभागामध्ये सुरू असलेल्या तयारीबाबत यावेळी माहिती दिलीजिल्हाधिकाऱ्यांपासून तलाठ्यांपर्यंत सर्व यंत्रणांची बैठक घेतली असून ग्रामसभेच्या माध्यमातून सर्व ग्रामस्थांना माहिती दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना विविध योजनांचा लाभ मिळवून देणेवनपट्ट्यांचे वाटपस्थलांतरित नागरिकांचा प्रश्न सोडविणेप्रकल्प बाधितांचे प्रश्न सोडविणेकातकरी उत्थानवन हक्क दावेशालेय विद्यार्थ्यांना दाखल्यांचे वाटपधरती आबा योजनेचा लाभसंजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना डीबीटीद्वारे लाभ आदी स्वरूपाचे उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी विविध विभागीय आयुक्तांनी दिली.

जमाबंदी आयुक्त सुहास दिवसे आणि नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे यांनी अनुक्रमे प्रत्येक सर्कलमध्ये गावांची निवड करून सातबारा अद्ययावत करण्याची मोहीम राबवली जात असल्याचे सांगितलेतसेचस्थानिक स्वराज्य संस्थांची करवसुली आणि ई-रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सोपी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी अपर मुख्य सचिव विकास खारगे म्हणाले, सर्वसामान्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या या अभियानाला व्यापक प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी सोशल मीडिया आणि पत्रकार परिषदा आयोजित करण्यात याव्यात. सर्वसामान्यांशी निगडित विषयांचा अधिकाधिक लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्याची सूचना त्यांनी केली.

00000

सेवा पंधरवडा तहसीलदारांनी तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांच्या मदतीने प्रत्येक ग्रामसभेला अभियानाची

 जिल्हाधिकारी यांना पालकमंत्र्यांशी संपर्क साधून कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देश महसूल मंत्री श्री.बावनकुळे यांनी दिले. तहसीलदारांनी तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांच्या मदतीने प्रत्येक ग्रामसभेला अभियानाची माहिती पोहोचवण्याचे निर्देश त्यांनी दिले.

१७ तारखेला पुणे येथे मुख्यमंत्री यांच्या हस्ते पंधरवड्याचा शुभारंभ होणार असून सर्व पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत आपापल्या जिल्ह्यात याचा शुभारंभ करण्यात यावा असे निर्देश श्री बावनकुळे यांनी दिले पंधरवड्याचा समारोप पवनार येथे होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

अभियानात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात येणार असल्याचे श्री.बावनकुळे यांनी यावेळी सांगितले.

Featured post

Lakshvedhi