वृत्त क्र. 3632
स्वच्छ वायू सर्वेक्षण २०२५ मध्ये अमरावती प्रथम
केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते
७५ लाखांचे पारितोषिक आणि ट्रॉफीने सन्मानित
नवी दिल्ली, १० : अमरावती शहराने स्वच्छ हवेच्या बाबतीत देशात अव्वल स्थान पटकावले आहे. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने आयोजित स्वच्छ वायू सर्वेक्षण २०२५ मध्ये अमरावतीने ३ ते १० लाख लोकसंख्या असलेल्या शहरांच्या गटात प्रथम क्रमांक मिळवला आहे.
दिल्लीत झालेल्या सोहळ्यात केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते अमरावती महानगरपालिकेला ७५ लाख रुपयांचे रोख पारितोषिक आणि ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.
अमरावती महानगरपालिकेने स्वच्छ वायू सर्वेक्षण २०२५ मध्ये देशातील ३ ते १० लाख लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये प्रथम स्थान पटकावले आहे. राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम (एनसीएपी) अंतर्गत घेण्यात आलेल्या या सर्वेक्षणात अमरावतीने २०० पैकी २०० गुण मिळवत उत्कृष्ट कामगिरी केली. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव आणि राज्यमंत्री कीर्ति वर्धन सिंह यांच्या हस्ते अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांना दिल्लीत आयोजित एका भव्य सोहळ्यात ७५ लाख रुपयांचे रोख पारितोषिक आणि ट्रॉफी प्रदान करण्यात आली.
No comments:
Post a Comment