‘ओबीसी’ महामंडळांना निधी वाटपात भेदभाव होणार नाही
- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
मुंबई, दि. १० : शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या महामंडळांना त्यांच्या गरजेनुसार पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. राज्यातील सर्व समाजघटकांना समप्रमाणात न्याय मिळावा, हा शासनाचा उद्देश आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत कार्यरत असलेल्या महामंडळांना निधी वाटप करताना कोणताही भेदभाव होणार नाही. सर्व समाजघटकांना समप्रमाणात न्याय मिळावा यासाठी निधी वाटपात सुसूत्रता आणण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली इतर मागासवर्गीय समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्थितीबाबत तसेच इतर संलग्न बाबींवरील करावयाच्या कार्यवाहीबाबत गठीत करण्यात आलेल्या मंत्रीमंडळ उपसमितीची पहिली बैठक मंत्रालयात झाली. त्यावेळी ते बोलत होते.
No comments:
Post a Comment