Saturday, 29 March 2025

तुळजापूर हेरिटेज टूर

 तुळजापूर हेरिटेज टूर

            आराखड्यात तुळजापूर हेरिटेज टूर विकसित करण्याचे प्रस्तावित असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. यामध्ये अष्टतीर्थ भेट व दर्शन, मुख्य मंदिर भेट व दर्शनरामदरा तलावाच्या डोंगरावर श्री तुळजाभवानी देवी यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांना आशीर्वाद रूपात भवानी तलवार देतानाचे 108 फूट उंचीचे भव्य शिल्प व शिव उद्यान, उद्यानात लाइट अँड साऊंड शो,रामदरा तलावात बोटिंगची सुविधा आदी बाबींचा समावेश आहे.

 

            मंदिर संस्थानचे विश्वस्त आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांच्या अपेक्षेनुसार आराखड्यातील कामे दोन वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे सांगतांना त्यांनी मुख्यमंत्री यांचे आभारही मानले.

येत्या दोन वर्षात तुळजापूरचा कायापालट; आराखड्यातील महत्त्वाच्या कामांना तातडीने निधी

 येत्या दोन वर्षात तुळजापूरचा कायापालट;

आराखड्यातील महत्त्वाच्या कामांना तातडीने निधी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

 

            धाराशिव,दि.29 मार्च (जिमाका) : तुळजापूर विकास आराखड्याला शासनाने तत्वत: मान्यता दिली असून यातील महत्त्वाच्या कामांना तातडीने निधी वितरीत करण्यात येईलअशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आराखड्यातील कामांमुळे येत्या दोन वर्षात तुळजापूरचा कायापालट झालेला दिसेलअसेही मुख्यमंत्री म्हणाले.

 

            मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुळजापूर येथे श्री. तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. त्यानंतर मंदिर संस्थानच्या प्रशासकीय इमारतीतील सभागृहात मुख्यमंत्र्यांसमोर तुळजापूर विकास आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मित्राचे उपाध्यक्ष तथा मंदिर संस्थानचे विश्वस्त आमदार राणा जगजितसिंह पाटीलआमदार अभिमन्यू पवारमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव डॉ.श्रीकर परदेशीविभागीय आयुक्त दिलीप गावडेछत्रपती संभाजीनगरचे विशेष पोलिस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रजिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारीमंदिर संस्थानचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

            सादरीकरणादरम्यान जिल्हाधिकारी श्री. पूजार यांनी विकास आराखडा राबवताना एकूण 73 एकर भूसंपादनाची गरज असल्याचे तसेच मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीच्या बैठकीत तुळजापूर विकास आराखड्यासाठी 1866 कोटी रूपयांचा आराखडा मंजूर करण्यात आल्याची माहिती दिली. त्यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी भूसंपादनाच्या कामाला वेग द्यावा अशी सूचना जिल्हा प्रशासनाला केली. यामुळे आराखड्यातील कामांनाही गती मिळणार असल्याचे ते म्हणाले.

आराखड्यातील महत्त्वाच्या बाबी

            तुळजापूरला जागतिक दर्जाचे धार्मिक आणि सांस्कृतिक पर्यटनस्थळ म्हणून ओळख मिळवून देण्यासाठी स्थानिक नागरिकांचा सहभाग घेत शाश्वत विकास करण्यासाठी तुळजापूर विकास आराखड्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. भाविकांचा त्रास कमी करून त्यांना श्री तुळजाभवानी देवीचे सुलभ व जलद दर्शन मिळावेसध्याच्या पायाभूत सुविधांचा दर्जात्मक विकास करून नवीन पायाभूत सोयीसुविधांची निर्मिती करण्याचे काम या आराखड्याच्या अंमलबजावणीतून होणार असल्याचेही जिल्हाधिकारी म्हणाले.

 

            मंदिराचा इतिहास, संस्कृती, वारसा आणि आध्यात्मिक मांगल्याची जपणूक यात होणार आहे.गर्दीचे नियोजन करताना स्मार्ट क्यू सिस्टीमऑनलाईन दर्शन व्यवस्थाभाविकांच्या संख्येचे नियमन, रस्त्यांचे रुंदीकरण, वैकल्पिक मार्ग तयार करणे, नवीन पार्किंग व्यवस्था, वाहन पार्किंगपासून मंदिरापर्यंतची वाहतूक सेवा, शौचालयांची संख्या वाढवणेकचरा वर्गीकरण, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, प्राथमिक आरोग्य सुविधांचा विस्तार, विश्रांती स्थळे, भाविक सुविधा केंद्राची उभारणी, वॉटर कुलर व आरामदायक शौचालयाची सुविधा, सूचना व मार्गदर्शन करण्यासाठी डिजिटल पद्धती (ॲप) चा वापर अशा काही सुधारणा या आराखड्यात समाविष्ट आहेत.मंदिर परिसरात मंदिर परिसीमा वाढवणे,मंदिर शिखर संवर्धन, कुंड, तीर्थ सुधारणा व संवर्धनइतर मंदिर संवर्धन,विद्युतीकरणपावसाच्या पाण्याचे व्यवस्थापनसुरक्षा व टेहळणी व्यवस्थावातानुकूलन यंत्रणा इत्यादीचा समावेश आराखड्यात असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी मुख्यमंत्री यांना दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

पंढरपूरदि.29 :-   मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे  दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांचा शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला.  

यावेळी त्यांच्या समवेत पालकमंत्री जयकुमार गोरेआमदार सर्वश्री समाधान आवताडेअभिजीत पाटीलगोपीचंद पडळकरसचिन कल्याणशेट्टीबाबासाहेब देशमुखमाजी आमदार राम सातपुतेविभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवारविशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारीजिल्हाधिकारी कुमार आशीर्वादजिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,  मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री तसेच मंदिर समितीचे सदस्य उपस्थित होते.

तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धन विकास आराखड्याअंतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. यामध्ये श्री विठ्ठल गर्भगृहश्री रुक्मिणी गर्भगृहश्री विठ्ठल चारखांबी व सोळखांबीबाजीराव पडसाळीमहालक्ष्मी मंदिर आदी ठिकाणची पाहणी करून आवश्यक त्या सूचना दिल्या.

00000000

मुख्यमंत्री यांच्याकडून परिचारक कुटुंबियांची सांत्वन पर भेट

                  पंढरपूर दिनांक 29: - माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे वडील प्रभाकर परिचारक यांचे मागील दोन महिन्यापूर्वी वृद्धापकाळाने निधन झालेले होते. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशांत परिचारक यांच्या पंढरपूर येथील निवासस्थानी त्यांची व कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

               यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरेआमदार सर्वश्री समाधान आवताडेसचिन कल्याणशेट्टीगोपीचंद पडळकररणजीतसिंह मोहिते पाटीलबाबासाहेब देशमुखमाजी आमदार प्रशांत परिचारकउमेश परिचारक आदी उपस्थित होते.

*🟥आजारी पडण्यापुर्वी पुढील गोष्टी फक्त आयुर्वेदच करु शकतो.*

 *🟥आजारी पडण्यापुर्वी पुढील गोष्टी फक्त आयुर्वेदच करु शकतो.*

(खाली अनेक उपाय दररोज करा म्हणून नमुद केलेले आहे परंतु ते आपण जसे जमेल तसे, परंतु वर्षभरात किमान 4 ते 6 वेळा व प्रत्येक वेळेस किमान 21 दिवस सलग केल्यास तुम्हास डाॅक्टर कडे जाण्याची गरजच पडणार नाही)


*◾कॅन्सर होण्याची भीती वाटते*-नियमित कडीपत्त्याचा रस प्या.


*◾हार्ट अँटॅकची भीती वाटते* - नियमित अर्जुनासव किँवा अर्जुनारिष्ट प्या.


*◾मुळव्याध होण्याची भीती वाटतेय* - दररोज सकाळी हिरव्या पानफुटीची पाने खा.


*◾किडनी फेल होण्याची भीती वाटतेय*- दररोज सकाळी कोथिंबीरीचा रस अनुषापोटी प्या.


*◾पित्त होण्याची भीती वाटतेय* -नियमित आवळा रस प्या.


*◾सर्दी होण्याची भीती वाटतेय* - नियमित कोमट पाण्यात हळद टाकुन प्या.


*◾टक्कल पडण्याची भीती वाटतेय*- वडाच्या पारंब्या खोबरेल तेलात उकळुन गाळुन आँघोळीपुर्वी डोक्याला मालिश करा.


*◾दात लवकर पडण्याची भीती वाटतेय* - फ्रिज/कुलरमधील पाणी कधीच पिऊ नका.


*◾डायबेटीस होण्याची भीती वाटते-* तणावमुक्त जीवन जगा, व्यायाम करा. जागरण टाळा. साखर खाणे बंद करा. गुळ खा.


*◾भीतीमुळे झोप येत नाही*-रात्रि जेवणापुर्वी 2 तास आधी अश्वगंधारिष्ट ग्लासभर पाण्यात प्या.


*◾काही आजार नसला तरी, अनुलोमीलम 15 मी कपालभाती 15 मी सुर्यनमस्कार 12 आर्वतन रोज करा.*


*🟩आरोग्य संवाद स्वतःसाठी एवढं तरी करा.*


◾रिकाम्या पोटी हातपाय प्रेस करा, गरम करा.


◾भरपूर टाळ्या वाजवा.


◾हातापायाचे तळवे जेथे दुखत असतील तेथे पंपिंग करून दाब द्या.


◾पायाखाली लाटणे घेऊन त्यावर तळवे फिरवा. (अँक्युप्रेशर करा)


◾आठवड्यातून एकदा तरी तेलाने सर्व शरीराला माँलिश करा.


◾नियमित प्राणायाम करा. (भस्त्रिका, कपालभाती व अनुलोम विलोम)


◾सकाळी एक / दोन ग्लास कोमट पाणी प्या.


◾सकाळी जास्तच नाष्टा करा. ८ ते ९ या वेळेत.


◾दुपारी मध्यम आहार घ्या. १ ते २ या वेळेत.


◾संध्याकाळी गरज असेल तरच जेवा. किंवा हलका आहार घ्या. ७ ते ८ या वेळेत.


◾नाभिचक्र मूळ जागी ठेवा.


◾पाय गरम, पोट नरम, डोके शांत ठेवा.


◾एकाचवेळी भरपेट खाऊ नका.


◾चौरस आहार घ्या.


◾जास्तीत जास्त शाकाहारी रहा.


◾Black Tea च प्या.


◾जेवणात कोशिंबीर (कच्चे) खा.


◾ध्यानधारणा करा.


◾सकारात्मक वर्तन / विचार ठेवा.


◾सत्य बोला. समाजसेवा करा.


◾भरपूर ऐका मात्र कमी बोला.

◾नैसर्गिक जीवन जगा.


◾गरज असेल तर घरगुती औषधे (आजीबाईचा बटवा) घेणे.


◾पोट साफ ठेवणे.


◾वात, पित्त व कफ प्रवृत्ती ओळखून उपचार करा.


साभार : @ravindra2962

केशवतीर्थ प्रयासराज !* होय.हे तीर्थस्थळ भारतात ,त्र्यंबकेश्वर तालुक्यात हिवाळी नावाच्या गावात . ठाणापाडा नावाच्या आदिवासी पाड्यावर आहे.

 *केशवतीर्थ प्रयासराज !*


होय.हे तीर्थस्थळ भारतात 

महाराष्ट्रात 

नाशिक जिल्ह्यात 

त्र्यंबकेश्वर तालुक्यात 

हिवाळी नावाच्या गावात .

ठाणापाडा नावाच्या आदिवासी पाड्यावर आहे.


ही जिल्हापरिषदेची बारा तास भरणारी बारमाही शाळा आहे.अगदी ३६५ दिवस अखंडपणे या शाळेचे विद्यार्थी आणि शिक्षक आनंदाने शाळेत येत असतात.रविवार नाही,दिवाळी नाही की कसलीही स्थानिक सुट्टी बिट्टी कुछ नही !

असं काय असतं या शाळेत ? 

यु ट्यूबवर या शाळेचा एक व्हीडीओ पाहण्यात आला.३६५ दिवस बारा तास भरणारी शाळा या थंबनेलने मला थांबवलं.मग एकच नव्हे तर या शाळेचे लागोपाठ अनेक व्हीडीओ समोर आले.आणि त्या शाळेबद्दल जे कळलं त्याने अनावरा उत्सुकता निर्माण झाली. 

याच अमाप कुतूहलाने मी या शाळेला भेट दिली.

या शाळेचे कर्ता करविता आहेत,

श्री.केशव गावित गुरूजी.

२००९ सालात डी.एड,होऊन या शाळेत शासनाकडून त्यांना 'टाकलं' गेलं.

बियाणं कसदार असलं की कुठल्याही मातीत टाकलं तरी जोमदारपणे वाढतं तसे गुरूजी स्वतः तर तिथे रूजलेच पण त्यांनी आजतागायत तिथे असंख्य रोपे फुलवली आहेत ;नव्हे तर नव्या पिकासाठी बियाणी तयार करण्याचा अखंड यज्ञ सुरू ठेवला आहे.

या शाळेत बालवाडी पासून सहावीपर्यंत विद्यार्थी आहेत.

शाळेला वेळापत्रक नाही पण बांधीव कृतिकार्यक्रम आहे.सकाळी साडेनऊ वाजता शाळा भरते ती रात्री साडेनऊला संपते.

शाळेचं बांधकाम पर्यावरण पूरक आहे.

या इमारतीत एकही खिडकी नाही पण दहा दिशातून येणारा उजेड वारा शाळेला मोकळा श्वास देतो,भिंती असलेल्या वर्गखोल्या नाहीत पण ज्ञानाच्या खोलीपर्यंत मुलं स्वतः उतरू शकतात.

या शाळेत अॕम्फी थिएटर आहे.

अद्ययावत वाचनालय आहे,

संगणककक्ष आहे.

बोलक्या भिंती आहेत,

गोशाळा आहे.परसबाग आहे.

या सा-यांशी जीवप्राण जोडलेले केशवगुरूजी आहेत,गावकरी आहेत आणि पासष्ट विद्यार्थी आहेत.

नेमलेला अभ्यासक्रम जून ते आॕक्टोबर पर्यंत पूर्ण होतो आणि नंतर सुरू होते ते अभ्यासक्रम मनात मुरवण्यासाठीचा कौशल्यविकास !


डावा आणि उजवा मेंदू सतत कार्यरत ठेवण्याचे

तो एकाच वेळी यशस्वी कार्यरत करण्याचे कौशल्य !


या शाळेतले विद्यार्थी दोन्हा हातांनी दोन वेगवेगळी कामं एकाचवेळी करतात.

दोन्ही हातांनी कितीही संख्येची उजळणी लिहितात.


म्हणजे डावा हात एक ते दहा लिहित असेल तर त्याच वेळी उजवा हात अकरा ते वीस पाढे लिहितो,


डावा हात मराठी शब्द लिहित असतो त्याच्याच समोर योग्य अंतरावर त्याच वेळी त्याच अर्थाचा इंग्रजी शब्द लिहिला जातो.


डाव्या हाताने लिहिलेल्या इंग्रजी किंवा मराठी शब्दांची दर्पण प्रतिमा ( mirror image )उजवा हात लिहितो.


डाव्या उजव्या हाताने कामं चाललेली असतांना तोंडाने संविधानाची कुठलीही  कलमे अचूक सांगता येतात.ही नुसती पाठांतराची पोपटपंची नसते.विद्यार्थी त्याचा अर्थही सांगू शकतात.(विचारून बघा ना,तुमची स्वतःची पाठ असली तर  संविधानातली कुठलीही कलमे नि पोटकलमे !)


रंगांची सुसंगत रचना करणारे ठोकळे  (  क्यूब साॕल्व्हर )  काही मिनिटात एका ओळीत सहज फिरवले जातात.

मुलं प्रश्न विचारतात.

यू ट्युबवर बघून वाद्य शिकतात,गाणी शिकतात,विविध भाषा शिकतात.

पाचवी सहावीचे विद्यार्थी खालच्या वर्गातल्या मुलांना शिकायला मदत करतात.त्यांची काळजी घेतात.

 

ही कौशल्ये माझ्याही अंगात नाहीत हे केशव गुरूजी मोकळळेपणी मुलांसमोरच कबूल करतात.कशी आत्मसात करता येतील त्याचे मार्ग ते दाखवतात आणि वर्षे तीन ते दहा बाराची पोरं पोरी त्या कौशल्यांचे बाप होतात.


गो पालन! यात गायीची काळजी घेणं,गोठा साफ करणं,शेणखत  तयार करणं ,गायीवर माया करणं याच शाळेतला अभ्यासक्रम आहे.

परसबाग फुलवणं,झाडांना पाणी घालणं ही या शाळेची दैनंदिनी आहे.शाळेच्या भोवती असलेल्या कुंडीत पाणी जास्त झालं आणि शाळेत ओघळ आले तर बालवाडीच्या मुलांचे चिमुकले हात फडक्याने ते पाणी टिपतात आणि झाडांच्या मुळांशी जाऊन पिळतात.


मी मुलांसाठी नेलेला केळी हा खाऊ खाऊन झाल्यावर सालपटांचा खाऊ लगोलाग गोमातेच्या मुखी घातला गेला.


केशव गुरूजींनी या शाळेत जी किमया केली तिचा सुरूवातीचा प्रवास खडतरच होता.तो वृत्तांत त्यांच्याशी केलेल्या संभाषणातून सोबतच्या व्हीडीओमधून  कळेल.

या शाळेला भेट दिल्यावर प्रभावित होणार नाही तो माणूसच नव्हे.

अनेक दानशुरांनी या शाळेला भरघोस मदत केली आहे.

श्री रमेश आणि उमा अय्यर या दांपत्याने या शाळेच्या दोन वेळच्या भोजनाची कायमस्वरूपी जबाबदारी उचललेली आहे.

विशेष म्हणजे नव्या ईमारतीच्या उद्घाटन सोहळ्यासाठी आलेल्या उपमुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे आणि शिक्षणमंत्र्यांसह इतर मंत्रीही भाषणात जास्त वेळ न दवडता संपूर्णपणे विद्यार्थ्यांच्या बरोबरच बोलत होते.


शासनाने गुरूजींच्या कामाची दखल घेऊन त्यांच्या कामाच्या स्वातंत्र्यासाठी  आणि स्वातंत्र्यासाठी त्यांची बदली केलेली नाही.


या विद्यार्थ्यांना भारताच्या राजधानी दिल्लीत येण्याचे निमंत्रण खुद्द मा.पंतप्रधान श्री.नरेन्द्र मोदीजींनी दिले आहे.

या शाळेतले माजी विद्यार्थी MPSC च्या परीक्षेची तयारी करत आहेत.

इथल्या चिमुकल्यांना शास्त्रज्ञ , शेतकरी, चित्रकार,भाषाअभ्यासक,शिक्षक व्हायची स्वप्ने आहेत,त्यांच्या स्वप्नांना आकार देणारा कुशल हात केशव गुरूजींच्या रूपाने मुलांच्या पाठीशी आहे.आॕनलाईन आणि आॕफलाईन शिक्षणपद्धतीची डोळस सांगड त्यांनी घातली आहे.


त्यांची एकूलती मुलगी अनन्या ही सुद्धा बालवाडीत सगळ्यांबरोबरच शिकते आहे.तिनेही सगळी कौशल्ये आत्मसात करायला सुरूवात केली आहे.


गुरूजींनी आजवर नाटक सिनेमा यांची चैन केलेली नाही.घरातील लग्न असो की विघ्न यात ते जरुरीपीरताच सहभाग घेतात.पत्नी सविता आणि आईवडील भावंडं यांचा पूर्ण पाठिंबा गुरूजींना आहे.

 


बाकी माझ्यासारख्या सामान्य निवृत्त शिक्षिकेने तासादोन तासांच्या भेटीत

राजकारण,जातीधर्मकारण ,या बाहेर जाऊन संविधानाचे मर्म मुलांच्या मनात रुजवून त्यांचे शेत पिकवणा-या

व्यावहारिक प्रलोभनांपसून आश्चर्यकारक रितीने लांब रहाणा-या

 या ऋषितुल्य श्री.केशल गावित या गुरूजींची स्तोत्रे 

किती गावित ?


नाशिकमधल्या पारंपरिक तीर्थक्षेत्रांहून परमपवित्र असे हे प्रयासराज तीर्थ प्रत्येक शिक्षकाने जाऊन पहायला हवेच असे !



वैशाली पंडित.

फळे खाण्याचे फायदे*

 🍉🍉🍉🍉🍇🍇🍇🍇

*फळे खाण्याचे फायदे*


स्ट्रॉबेरी :


वयस्कर दिसण्यापासून संरक्षण देते


चेरी :


नसांचे कार्य सुरळीत करते


द्राक्ष :


रक्ताभिसरणाचे कार्य चांगले होते


अननस : सांधेदुखीपासून आराम देतो


ब्लूबेरी :


हृदयरोगांपासून बचाव करते


कलिंगड :


हृदयरोगांपासून बचाव करते


संत्री :


त्वचा आणि दृष्टीसाठी उपयुक्त ठरते


सफरचंद : संसर्गाचा प्रतिकार करण्यास मदत करतं


*कलिंगड खाण्याचे फायदे*


कलिंगड वजन कमी करण्यासाठी सर्वात उत्तम फळ आहे.


कलिंगडात पाणी आणि फायबर भरपूर प्रमाणात असल्यामुळे अपचन आणि गॅसची समस्या दूर होते.


कलिंगडात पोटॅशियम आणि मॅग्नेशिअम असल्याने रक्तदाब वाढत नाही.


कलिंगडामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते. त्यामुळे हृदयरोग होण्याचा धोका कमी होतो.


कलिंगडात लोयकोपिन अधिक प्रमाणात असते, त्यामुळे त्वचा चमकदार होण्यास मदत होते.


कलिंगड सगळ्या प्रकारच्या आम्लदोषांवर उपयोगी आहे.


कलिंगडाचे नियमित सेवन डोळ्यांसाठी फायदेशीर ठरते.


*कॉपी पेस्ट*


*   9970329295 ह्या नंबर वर 



राज्य के 64 लाख किसानों को मिलेगा ₹2,555 करोड़ का बीमा मुआवजा

 राज्य के 64 लाख किसानों को मिलेगा ₹2,555 करोड़ का बीमा मुआवजा

कृषि मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

 

मुंबई28 मार्च: महाराष्ट्र सरकार ने राज्य के करीब 64 लाख किसानों को राहत देने वाला एक महत्वपूर्ण निर्णय लिया है। उनके बैंक खातों में सीधे ₹2,555 करोड़ का बीमा मुआवजा जमा किया जाएगा। सरकार ने बीमा कंपनियों को लंबित राज्य अनुदान हिस्से के रूप में ₹2,852 करोड़ वितरित करने की मंजूरी दी है।

इस निर्णय के चलतेविभिन्न पिछली फसली ऋतुओं के लंबित बीमा मुआवजे की राशि सीधे किसानों के आधार लिंक बैंक खातों में जमा की जाएगी। बीमा कंपनियों को यह प्रक्रिया जल्द से जल्द पूरी करने के निर्देश दिए गए हैंजिससे किसानों को उनका हक समय पर मिल सकेऐसा कृषि मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे ने कहा।

इस योजना के तहत मुआवजे का वितरण इस प्रकार होगा:

खरीफ 2022 और रबी 2022-23: ₹2.87 करोड़

खरीफ 2023: ₹181 करोड़

रबी 2023-24: ₹63.14 करोड़

खरीफ 2024: ₹2,308 करोड़

कुल मिलाकरराज्य के 64 लाख लाभार्थी किसानों को ₹2,555 करोड़ की राशि वितरित की जाएगी।

सरकार ने पहले ही बीमा कंपनियों को निधि जारी कर दी हैऔर यह मुआवजा जल्द ही किसानों के खातों में जमा किया जाएगा। इस निर्णय से किसानों को बड़ी राहत मिलेगीऐसा कृषि मंत्री एडवोकेट ॲड.माणिकराव कोकाटे ने कहा।

0000

 

Featured post

Lakshvedhi