Wednesday, 20 November 2024

बुधवारी होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी राज्यभरात कायदा व सुरक्षा यंत्रणा सतर्क व सजग राज्यभरात २ लाखांपेक्षा अधिक पोलीस व सुरक्षा यंत्रणांचे कर्मचारी तैनात आचारसंहिता कालावधी दरम्यान राज्यभरात ५३२ एफ. आय. आर

 बुधवारी होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी

राज्यभरात कायदा व सुरक्षा यंत्रणा सतर्क व सजग

राज्यभरात २ लाखांपेक्षा अधिक पोलीस व सुरक्षा यंत्रणांचे कर्मचारी तैनात

आचारसंहिता कालावधी दरम्यान राज्यभरात ५३२ एफ. आय. आर.

 

मुंबईदि. १९ : 'महाराष्ट्र विधानसभा निवडणूक - २०२४अंतर्गत बुधवार २० नोव्हेंबर २०२४ रोजी राज्यभरात मतदान होत आहे. ही सर्व प्रक्रिया शांततेत व खुल्या वातावरणात संपन्न व्हावीयासाठी राज्यभरात २ लाखांपेक्षा अधिक पोलीस व सुरक्षा कर्मचारी तैनात आहेत. यामध्ये महाराष्ट्र पोलीस दलासोबत गृहरक्षक दलनागरी संरक्षण दलकेंद्रीय सशस्त्र पोलीस दलराज्य सशस्त्र पोलीस दलराज्य राखीव पोलीस दलाचा समावेश आहे. या सर्व यंत्रणेला सतर्क आणि सजग राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

यंदाच्या विधानसभा निवडणूक प्रक्रियेसाठी १५ ऑक्टोबर २०२४ पासून आचारसंहिता लागू झाली आहे. या आचारसंहिता कालावधी दरम्यान आचारसंहिता व निवडणूक विषयक विविध तक्रारींच्या अनुषंगाने ५३२ एफ. आय. आर. दाखल झाले आहेत. यापैकी २१० प्रकरणे ही आदर्श आचारसंहितेच्या भंगाशी संबंधित असून ६३ प्रकरणे ही समाज माध्यमांशी संबंधित आहेत. तर उर्वरित २५९ प्रकरणे ही इतर बाबींशी संबंधित आहेत.

'एफ आय आरबद्दलची जिल्हा निहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे :

१) मुंबई शहर व मुंबई उपनगर :  ३६

२) ठाणे : ३८

३) पालघर : ०५

४) नाशिक : ४९

५) धुळे : ०१

६) बीड : १८

७) अहिल्यानगर : ३२

८) पुणे : ४८

९) छत्रपती संभाजीनगर : २५

१०) जालना : १०

११) जळगाव : १०

१२) नंदुरबार : ०३

१३) कोल्हापूर : २६

१४) रत्नागिरी : १०

१५) सिंधुदुर्ग : ००

१६) सातारा : १५

१७) सांगली : ०८

१८) सोलापूर : २८

१९) लातूर : १२

२०) धाराशिव : ०६

२१) रायगड : १९

२२) परभणी : ०७

२३) नांदेड : १५

२४) हिंगोली : १२

२५) यवतमाळ : ०७

२६) वाशिम: ०३

२७) वर्धा : ०६

२८) अमरावती : १७

२९) अकोला : ०२

३०) बुलढाणा : ०८

३१) चंद्रपूर : ०३

३२) गडचिरोली : ०६

३३) भंडारा : १५

३४) गोंदिया : ०३

३५) नागपूर : २९

===


तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय तुळजापूर येथे मतदान जनजागृतीसाठी रील तयार करण्याच्या स्पर्धेचे उत्साहात आयोजन

 श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय तुळजापूर येथे मतदान जनजागृतीसाठी रील तयार करण्याच्या स्पर्धेचे उत्साहात आयोजन

 

धाराशिव दि.१९ (जिमाका) प्रथमवेळी मतदानाचा हक्क बजावणाऱ्या सर्व नवमतदार विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी रील तयार करण्याची स्पर्धा श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय,तुळजापूर येथील संगणक विभागाकडून आयोजित केली होती.यामध्ये सर्व क्लासच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आणि विविध रील तयार करून यामध्ये मतदानाचा हक्क व त्याचे महत्त्व याचे सादरीकरण केले.

या स्पर्धेमध्ये Third Year CSE चा ग्रुपला प्रथम पारितोषिक तसेच Final Year CSE च्या ग्रुपला द्वितीय पारितोषिक तुळजापूरचे निवडणूक निर्णय अधिकारी संजय डव्हळे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अरविंद बोळंगे व अमोल ताकभाते यांच्या हस्ते विजेता ग्रुपचा सत्कार करण्यात आला.यावेळी उपप्राचार्य प्रा. मुदकन्ना आर जी, नायब तसीलदार संतोष पाटील, विभागप्रमुख प्रा.डी.जे.वाघमारे,प्रा. गणेश मोटे,ओंकार काटकर प्रा.नयन कदम प्रा.श्रीराम भोजने,दत्ता नन्नवरे,  मंगेश वाघोलीकर,श्री.मैंदग्री,नितीन कुलकर्णी, महेश नवगिरे व विद्यार्थी उपस्थित होते.नवमतदान करणाऱ्याना या स्पर्धेमुळे प्रोत्साहन मिळणार आहे.

****


उत्पादन शुल्कची हातभट्टी दारू निर्मितीवर कारवाई * १७ लाखांचा मुद्देमाल जप्त * २९ गुन्ह्यांची नोंद ; २९ आरोपींना अटक

  

उत्पादन शुल्कची हातभट्टी दारू निर्मितीवर कारवाई

 

१७ लाखांचा मुद्देमाल जप्त

२९ गुन्ह्यांची नोंद ; २९ आरोपींना अटक

 

धाराशिव दि.१९ ( माध्यम कक्षमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक - २०२४ ची आदर्श आचारसंहिता १५ ऑक्टोबरपासून लागू झाली आहेआदर्श आचारसंहिता कालावधीत राज्य उत्पादन शुल्क धाराशिव कार्यालयाच्या अधिनस्त असलेल्या सर्व अधिकाऱ्यांनी अवैध मद्य निर्मिती,वाहतूक  विक्री इत्यादीवर पूर्ण प्रतिबंध करण्याकरिता कठोर कारवाई करण्यात येत आहे.१७ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर या दोन दिवसात राज्य उत्पादन शुल्क विभागाने हातभट्टी दारू निर्मितीवर कारवाई केली.यामध्ये ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला  २९ गुन्ह्याची नोंद करून २९ आरोपींना अटक केली.

 

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे धाराशिवचे अधीक्षक गणेश बारगजे यांच्या मार्गदर्शनाखाली १७ ते १८ नोव्हेंबर दरम्यानच्या कालावधीत निरीक्षक,राज्य उत्पादन शुल्क,भरारी पथक विभाग धाराशिव  अधिनस्त अधिकारी / कर्मचारी यांनी जिल्हयात केलेल्या कारवाईमध्ये एकूण २९ गुन्हयांची नोंद करून २९ आरोपीला अटक केली आहे.या कारवाईमध्ये देशी दारु ३१७.३५ .लि विदेशी दारु २४४.२९  लि.हातभट्टी दारु तयार करण्यासाठी रसायन १५०० लि४७० लि.हाटभट्टी दारु,१२८.१८ लीबिअर  (एकूण अंदाजित किंमत रु३५ लक्ष १० हजार ९१० रु.) जप्त करण्यात आली आहे .

 

दिनांक १७  ते १८ नोव्हेंबर या कालावधीमध्ये निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क,भरारी पथक विभाग धाराशिव  अधिनस्त अधिकारी / कर्मचारी यांनी जिल्हयात केलेल्या कारवाईमध्ये एकूण  गुन्हयांची नोंद केली असून ४आरोपीला अटक केली आहे.या कारवाईमध्ये  वाहने जप्त करण्यात आली आहे .या कारवाईमध्ये देशी दारु २४१.८३  . लि.,विदेशी दारु ९८.५५ .लि. , बिअर २२.८८ .लि. गोवा निर्मित विदेशी मद्य २६ .२८ लि.( एकूण अंदाजित किंमत १७,५८,६३०/ - ) जप्त करण्यात आली आहे .

 

 

निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भूम विभाग  अधिनस्त अधिकारी / कर्मचारी यांनी भुम,परांडा  वाशी या तालुक्यामध्ये केलेल्या कारवाईमध्ये एकूण  गुन्हयांची नोंद केली असून ,  आरोपीला अटक केली आहे . सदरील कारवाईमध्ये देशी दारु .६४ .ली विदेशी दारु १६. .लि हातभट्टी दारु ५५ लिटर  रसायन ५०० लिटर ( एकूण अंदाजित किंमत रु.४३,००० / - ) जप्त करुन नष्ट करण्यात आली आहे .

 

निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क धाराशिव विभाग  अधिनस्त कर्मचारी यांनी धाराशिव  कळंब या तालुक्यामध्ये केलेल्या कारवाईमध्ये एकूण  गुन्हयांची नोंद केली असून ,  आरोपीला अटक केली आहे.या कारवाईमध्ये  वाहने जप्त करण्यात आली आहेत.कारवाईमध्ये हातभट्टी दारु ५० ली. हातभटी दारु निर्मिती करता वापरण्यात येणारे रसायन १०००  . लि . , देशी दारु ३६.६४ .ली. विदेशी दारु ६०.५२ .लि.( एकूण अंदाजित किंमत रु . १२,५१,७७० / - ) जप्त करुन नष्ट करण्यात आले आहे .

 

दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क सिमा तपासणी नाका तलमोड विभाग  अधिनस्त कर्मचारी यांनी उमरगा तालुक्यामध्ये केलेल्या कारवाईमध्ये  गुन्हयांची नोंद केली असून, आरोपीला अटक केली आहे . सदरील कारवाईमध्ये वाहन जप्त करण्यात आलेले आहे.या कारवाईमध्ये हातभट्टी दारु ७०  . लि. विदेशी दारु .६४ .लिटर ( एकूण अंदाजित किंमत रु . ७५,०८० / - ) जप्त करुन नष्ट करण्यात आली आहे .

 

 

निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क तुळजापूर विभाग  अधिनस्त अधिकारी / कर्मचारी यांनी तुळजापूर  उमरगा या तालुक्यामध्ये केलेल्या कारवाईमध्ये एकूण १० गुन्हयांची नोंद केली असून १० आरोपीला अटक केली आहे.या कारवाईमध्ये  वाहने जप्त करण्यात आलेली आहे.या कारवाईमध्ये बिअर १०५.३० .ली.विदेशी दारु ३३.२८ .ली.हातभट्टी दारु, .लिटर  देशी दारु ३०.२४  . लिटर ( एकूण अंदाजित किंमत रु.,८२,४३० / - ) जप्त करुन नष्ट करण्यात आली आहे .

 

१७ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत  उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवायामध्ये एकूण २९ गुन्हे नोंद करुन २९ आरोपींना अटक केलेली आहे.या कारवाईमध्ये एकूण १३ वाहने जप्त करण्यात आली आहे.कारवायात हातभटी दारु निर्मिती करता वापरण्यात येणारे १५०० लि.रसायन,४७० लि . हातभट्टी दारु,३१७.३५ लि.देशी दारु , २४४.२९ लि.विदेशी  २२८.१८ लि . बिअर जप्त करण्यात येऊन नष्ट केली असून याची अंदाजित किंमत ३५,१०,९१० / - इतकी आहे.

 

दिनांक १५/१०/२०२४ रोजी आदर्श आचारसंहिता सुरु झाल्यापासून दिनांक १८/११/२०२४ पर्यंत राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईमध्ये एकूण २७० गुन्हयांची नोंद करुन २५६ आरोपींना अटक केली आहेएकूण २७ वाहनांसह रुपये ८१.७८ लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

 

अधीक्षक,राज्य उत्पादन शुल्कधाराशिव कार्यालयाकडील अधिकारी  कर्मचारी यांचेकडून अवैध मद्य निर्मिती,वाहतूक  विक्री इत्यादींवर कठोर कारवाई करण्यात येत असून अवैध मद्य विक्री करणाऱ्या हॉटेल्स / ढाब्याबाबत माहिती असल्यास तसेच अवैध मद्य निर्मिती,वाहतूक  विक्रीची माहिती असल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाकडील टोल फी क्रमांक १८००२३३९९९९ अथवा व्हॉटस् अॅप क्रमांक ८४२२००११३३ वर माहिती द्यावीमाहिती देणाऱ्या नागरिकाचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार आहे.असे राज्य उत्पादन शुक्लचे अधीक्षक गणेश बारगजे यांनी कळविले आहे.

दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक मतदारांना मतदानाच्या दिवशी सुविधा

 दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक मतदारांना मतदानाच्या दिवशी सुविधा 

विधानसभा निवडणुकीसाठी मुंबई शहर जिल्हा निवडणूक प्रशासनाने दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक (८५ वर्ष व त्यापेक्षा अधिक) मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर जाण्याकरिता सक्षम ॲपवर नोंदणी केलेल्या मतदारांना पर्यायी सुविधा उपलब्ध करून दिली. या ॲपवर नोंदणीकृत दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक मतदारांना संबंधित सुविधा पुरविणा-या शासकीय व स्थान निश्चिती यंत्रणेला दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक मतदारांच्या मागणीनुसार आवश्यक मदत म्हणजेच गरजेनुसार वाहतूक व्यवस्थाव्हीलचेअरसहाय्यक पोहोचविण्याची व्यवस्था केली जाणार आहे. सक्षम मोबाईल ॲपवर नोंदणी न करू शकलेल्या काही दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांची मागणी नोंदविण्यात येत असल्याचे श्री. यादव यांनी सांगितले. मतदानाच्या दिवशी दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक मतदारांची मतदान केंद्रावर ने-आण करण्यासाठी मुंबई शहर जिल्हा प्रशासनातर्फे मोफत वाहन व्यवस्था सुविधा उपलब्ध करून दिली आहे. दिव्यांग मतदारांच्या सुविधेसाठी प्रत्येक विधानसभा मतदार संघनिहाय  मोफत बस प्रवासासाठी दिव्यांग समन्वय अधिकारी नेमले आहेत. मोफत बस सुविधेकरिता बेस्टकडून मतदान केंद्राच्या लोकेशननुसार प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी रूट प्लान तयार करण्यात आला आहे. समन्वय अधिकारी व रूट प्लान एका क्लिकवर मतदारांना मिळण्यासाठी क्युआर कोड तयार करण्यात आला आहे.

Featured post

Lakshvedhi