श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय तुळजापूर येथे मतदान जनजागृतीसाठी रील तयार करण्याच्या स्पर्धेचे उत्साहात आयोजन
धाराशिव दि.१९ (जिमाका) प्रथमवेळी मतदानाचा हक्क बजावणाऱ्या सर्व नवमतदार विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी रील तयार करण्याची स्पर्धा श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय,तुळजापूर येथील संगणक विभागाकडून आयोजित केली होती.यामध्ये सर्व क्लासच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आणि विविध रील तयार करून यामध्ये मतदानाचा हक्क व त्याचे महत्त्व याचे सादरीकरण केले.
या स्पर्धेमध्ये Third Year CSE चा ग्रुपला प्रथम पारितोषिक तसेच Final Year CSE च्या ग्रुपला द्वितीय पारितोषिक तुळजापूरचे निवडणूक निर्णय अधिकारी संजय डव्हळे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अरविंद बोळंगे व अमोल ताकभाते यांच्या हस्ते विजेता ग्रुपचा सत्कार करण्यात आला.यावेळी उपप्राचार्य प्रा. मुदकन्ना आर जी, नायब तसीलदार संतोष पाटील, विभागप्रमुख प्रा.डी.जे.वाघमारे,प्रा. गणेश मोटे,ओंकार काटकर प्रा.नयन कदम प्रा.श्रीराम भोजने,दत्ता नन्नवरे, मंगेश वाघोलीकर,श्री.मैंदग्री,नितीन कुलकर्णी, महेश नवगिरे व विद्यार्थी उपस्थित होते.नवमतदान करणाऱ्याना या स्पर्धेमुळे प्रोत्साहन मिळणार आहे.
****
No comments:
Post a Comment