Tuesday, 7 June 2022

कांदे पोहे

 'जागतिक पोहे दिन'निमित्त जाणून घ्या पोहे खाण्याचे आरोग्यदायी फायदे

    7 जून हा दिवस जागतिक पोहे दिन (World Poha Day) म्हणून साजरा केला जातो. पोह्यांचा नाश्ता माहित नाही असं एकही कुटुंब सापडणार नाही. प्रत्येक प्रदेशानुसार, पोहे करण्याची पद्धती आणि चव बदलते. पोह्याचा नाश्ता चविस्ट तसेच आरोग्यदायीदेखील आहे. त्यामुळे संपूर्ण भारतात पोह्याच्या नाश्त्याला पंसती आहे. जे लोक डायटिंग करतात. त्यांच्यासाठी पोह्यांचा नाश्ता (Poha is a Healthy Breakfast) अत्यंत आरोग्यदायी समजला जातो.


महाराष्ट्र, ओडिसा, मध्य प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, गुजरात आणि राज्यस्थानमध्ये पोह्याचा नाश्ता प्रसिद्ध आहे. भारतात पोह्याचा शोध नेमका कुठे लागला हे कोणाला माहिती नाही. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, पोह्यात 76.9 टक्के कार्बोहाड्रेटस आणि 23.1 टक्के प्रोटीन असते. वजन कमी करण्यासाठी पोहे फायदेशीर मानले जातात. आज या लेखात जागतिक पोहे दिनानिमित्त पोहे खाण्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घेऊयात. 

पोह्याचे आरोग्यदायी फायदे -

कार्बोहाड्रेटस चा उत्तम स्त्रोत -

पोह्यात 76.9 टक्के कार्बोहाड्रेटस असतात. तसेच पोह्यात 23 टक्के फॅट्स असतात. कार्बोहाड्रेटसमुळे शरीराला ऊर्जा मिळते. त्यामुळे सकाळी पोह्याचा नाश्ता आरोग्यदायी मानला जातो.


शरीराला लोहाचा पुरवठा होता -

पोह्यात लोहाचे प्रमाण भरपूर प्रमाणात असते. पोहे तयार करण्याच्या प्रक्रियेत तांदळावरून लोखंडी रूळ फिरवले जातात. या प्रक्रियेत लोह्याचा अंश पोह्यात शिरतो. त्यामुळे यात लोहाचे प्रमाण अधिक असते.

रक्तातील साखरेवर नियंत्रण -

मधुमेहाच्या रुग्णांसाठी पोह्यांचा नाश्ता आरोग्यदायी मानला जातो. पोह्यात फायबरचे प्रमाण अधिक असते. पोह्याच्या सेवनाने रक्तातील साखर नियंत्रित होण्यास मदत होते.

पचनास हलके -

पोह्यांचा नाश्ता पचनास हलका असतो. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात त्याचा समावेश केला जातो. पोह्यामुळे पोट भरलेले राहते आणि खूप कमी लागते.

लठ्ठपणा येत नाही -

पोहे खाल्ल्याने लठ्ठपणा वाढत नाही. एक वाटी पोह्यामध्ये कमीत कमी 250 कॅलरीज असतात. तसेच पोह्यांमध्ये व्हिटामिन, मिनरल आणि अँटी ऑक्सिडंट असतात.

भवताल

 एका पंजाने उलगडलेल्या रहस्याची गोष्ट !

(भवतालाच्या गोष्टी २६)

त्या गुहेची पाहणी करत असताना म्हाला हाडांचे काही ढीग आणि मातीत काही विसाव्याच्या खुणा सापडल्या. पण त्या कोणत्या प्राण्याच्या आहेत हे ओळखण्यासाठी आणखी काही चिन्हे मिळणे आवश्यक होतेतेवढ्यातविवेकला गुहेच्या का भागात काहीतरी भन्नाट दिसले. तो होताचिखलात उमटलेला एका पंजाआम्ही त्याचा बारकाईने अभ्यास केलात्याचा नेमका आकार (size) लक्षात यावा म्हणून माझा पा शेजारी ठेवून त्याची काही छायाचित्रे घेतलीही पंजाची खूण अगदी अलीकडची होती. पण तिथे पंजाची ही फक्त एकच खूण कशीआम्ही सर्वत्र काळजीपूर्वक शोध घेतलापण इतर कही मिळाले नाही एका पंजावरून त्या प्राण्याचे रहस्य उलगडले... ते कसे? आणि तो प्राणी कोणता? याची ही भन्नाट गोष्ट.

संपूर्ण वाचण्यासाठी लिंक-

https://www.bhavatal.com/One-Paw-Mystery

 

(भवताल वेबसाईटच्या वाचकांसाठी खास भवतालाच्या गोष्टी या सदरातील ही २६ वी गोष्ट)

भवतालाविषयी दर्जेदार वाचण्यासाठी -  bhavatal.com

(इतरांसोबतही शेअर करा)


--


भवताल
(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)
९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com

Bhavatal
(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)
9545350862 / bhavatal@gmail.com


 












दरोडा घाला च

 *सुशिक्षित दरोडा*😊😃😁


हॉंगकॉंगमध्ये एका बँकेवर दारोडा पडला.


‘सगळ्यांनी मुकाट्याने जमिनीवर आडवे पडून रहा. 


लक्षात ठेवा पैसा सरकारचा आहे पण जीव तुमचा आहे.’ 


दरोडेखारांनी ओरडून सांगताच

सर्वजण मुकाट्याने जमिनीवर आडवे झाले.


*याला म्हणतात ‘माईंड चेन्जिंग कन्सेप्ट’* 

( *Mind Changing Concept* ) म्हणजेच माणसांच्या

सर्वसाधारण विचारांमधे बदल घडवण्याची

किमया.


त्यातील एक महिला कर्मचारी 'अश्लील’ पद्धतीने आडवी

पडली होती. एक दरोडेखोर तिला ओरडून

म्हणाला, 


‘मॅडम! जरा सभ्यपणे वागा. हा

दरोडा आहे, बलात्कार नाही.’


*याला म्हणतात व्यावसायिक रहाणे* 

( *Being professional* ). आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करा.


दरोडा टाकल्यावर दरोडेखोर लूट घेऊन घरी आले. 

त्यातला ज्युनिअर दरोडेखोर, *जो एम.बी.ए. होता*  

 तो 6 वी पर्यंत शिकलेल्या

सिनियर दरोडेखोराला म्हणाला., ‘चला

आता आपण पैसे मोजायला लागूया!’ त्यावर

सिनिअर दरोडेखोर म्हणाला, ‘वेडा आहेस की

काय? हे पैसे मोजायला कित्येक तास लागतील. 

जरा धीर धर. रात्री टी. व्ही.

वरच्या बातम्या बघ. तुला आपोआपच कळेल की

आपण किती लाखांचा दरोडा घातला आहे ते.’


*याला अनुभव म्हणजेच*

*‘एक्सपिरिअन्स’*

   ( *Experience* ) असे म्हणतात.


हल्ली कागदी पदव्यांपेक्षा अनुभव जास्त

महत्वाचा झाला आहे.


दरोडेखोर बँकेतून निघून गेल्यावर बँक मॅनेजर

सुपरवायझरला म्हणाला, ‘ताबडतोब

पोलिसांना फोन कर!’ 


सुपरवायझर म्हणाला ,

‘थोडे थांबा साहेब! *आपण आधीच बँकेच्या 70 लाख* *डॉलर्सवर डल्ला मारला आहे. त्यात अजून 10 लाख डॉलर्सची भर घालूया व मग पोलिसांना बोलवूया!’*


*याला म्हणतात ‘लाटेबरोबर पोहणे’*

( *Swim with the tide* ). म्हणजेच संकटाचे रुपांतर संधीत करून

स्वतःचा स्वार्थ साधून घेणे.


सुपरवायझर म्हणाला, ‘जर दर महिन्यात असा

दरोडा पडला तर काय मजा येईल!’


*याला म्हणतात ‘प्रॉयॉरिटी बदलणे’* 

( *Changing priority*). 


कारण ‘पर्सनल

हॅपिनेस’ हा तुमच्या ‘जॉब’ पेक्षा जास्त महत्वाचा असतो.


दुस-या दिवशी टी. व्ही. वर बातमी झळकली

की *बँकेवर 100 लाख डॉलर्सचा दरोडा पडला*.


पण ही बातमी ऐकून दरोडेखोर मात्र हैराण झाले. 


कारण त्यांनी आणलेली कॅश परत परत मोजली. पण ती फक्त 20 लाख डॉलर्सच निघाली. 

*मग 80 लाख डॉलर्स कुठे गेले?* 


*खरी मेख काय आहे ते सिनियर दरोडेखोराच्या बरोबर लक्षात आहे.*


 तो वैतागून म्हणाला, ‘आपण

जीवावर उदार होऊन दरोडा टाकला पण.

आपल्याला फक्त 20 लाख डॉलर्सच मिळाले. 


पण

त्या बँक मॅनेजरने मात्र काहीही न करता 80

लाख डॉलर्स लाटले. 


*खरे आहे माणसाने शिकले पाहिजे.नुसतेच दरोडेखोर न* *होता ‘सुशिक्षित दरोडेखोर’ व्हायला पाहिजे,’*


*याला म्हणतात ‘ज्ञान’ म्हणजेच* *‘नॉलेज’* 

( *Knowledge*) ज्याची किंमत

सोन्यापेक्षाही जास्त असते. 


तुमचे सोने नाणे

लोक पळवून नेऊ शकतात पण तुमचे ‘नॉलेज’ कुणीच

पळवून नेऊ शकत नाही.     

🔴 *Point to be Noted*   

             🙏🙏

 मुळ रचना ज्याने केली त्याला 100000 सलाम.

👍👍🙏🙏


घरटे उडते वादळात  

बिळा-वारूळात पाणी शिरते 

कोणती मुंगी? कोणतं पाखरू?

म्हणून आत्महत्या करते?

🐜🕊


प्रतिकूल परिस्थितीतही 

वाघ लाचारीने जगत नाही 

शिकार मिळाली नाही म्हणून 

कधीच अनुदान मागत नाही.

🐅


घरकुलासाठी मुंगी

करत नाही अर्ज 

स्वतःच उभारते वारूळ 

कोण देतो गृहकर्ज?

🎭


हात नाहीत सुगरणीला 

फक्त चोच घेऊन जगते 

स्वतःच विणते घरटे छान 

कोणतं पॅकेज मागते?

🕴


कुणीही नाही पाठी 

तरी तक्रार नाही ओठी 

निवेदन घेऊन चिमणी 

फिरते का कोणत्या योजनेसाठी?


घरधन्याच्या संरक्षणाला 

धावून येतो कुत्रा 

लाईफ इन्शुरन्स काढला का? 

असं विचारत नाही मित्रा!

🐕


राब राब राबून बैल 

कमावून धन देतात 

सांगा बरं कुणाकडून 

ते निवृत्तीवेतन घेतात?

🐂


कष्टकऱ्याची जात आपली 

आपणही हे शिकलं पाहिजे 

पिंपळाच्या रोपासारखं 

पाषाणावर टिकलं पाहिजे

🤕


कोण करतो सांगा त्यांना 

पुरस्काराने सन्मानित 

तरीही मोर फुलवतो पिसारा 

अन् कोकिळ गाते मंजुळ गीत

🐧


मधमाशीची दृष्टी ठेव 

फुलांची काही कमी नाही 

मधाच्या पोळ्यासाठी मित्रा 

कोणतीच रोजगार हमी नाही

🐝


घाबरू नको कर्जाला 

भय, चिंता फासावर टांग 

जीव एवढा स्वस्त नाही 

सावकाराला ठणकावूण सांग

😎


काळ्या आईचा लेक कधी 

संकटापुढे झुकला का? 

कितीही तापला सूर्य तरी 

समुद्र कधी सुकला का?

🌊💦


निर्धाराच्या वाटेवर 

टाक निर्भीडपणे पाय 

तू फक्त विश्वास ठेव 

पुन्हा सुगी देईल धरणी माय

🎑


निर्धाराने जिंकू आपण 

पुन्हा यशाचा गड 

आयुष्याची लढाई 

फक्त हिमतीने लढ...

फक्त हिमतीने लढ...!!

👊


आवडली तर इतरांनाही Share करा.

          🌹🙏🙏🙏🌹❣️👍


 

 Don't feel alone there is always someone who silently cares for you.

Good Morning.

Featured post

Lakshvedhi