Wednesday, 10 November 2021

 पालघर जिल्ह्यासह पेसा अंतर्गत शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यासाठी

कालबद्ध कार्यक्रम हाती घेणार

- शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड

 

            मुंबईदि. 9 : पालघर जिल्ह्यासह राज्यातील पेसा अंतर्गत शिक्षकांच्या सर्व रिक्त जागा भरण्यास शासन सकारात्मक आहे. या जागा भरण्यासाठी शालेय शिक्षण विभागामार्फत कालबद्ध कार्यक्रम हाती घेतला जाईलअसे शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी सांगितले. या जागा भरण्यासाठी आयुक्तांनी तातडीने प्रस्ताव सादर करावा आणि शिक्षण विभागाने सामान्य प्रशासन आणि वित्त विभागाची परवानगी घ्यावीअसे निर्देशही प्रा.गायकवाड यांनी दिले.

            पालघर जिल्ह्यातील शिक्षकांची पदे भरताना पवित्र पोर्टल प्रणाली लागू न करता स्थानिक पातळीवर भरती प्रक्रिया राबवावी या मागणीसाठी तेथील आदिवासी डीटीएडबीएड (टीईटी/ सीटीईटी) कृती समितीने आंदोलन केले आहे. त्याची दखल घेऊन प्रा.गायकवाड यांनी याबाबत ऑनलाईन बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी पालघर जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधीशालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णासामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिकग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार मीनाशिक्षण आयुक्त विशाल सोळंखीपालघर जिल्हाधिकारीशिक्षणाधिकारी यांच्यासह आंदोलनकर्ते आदिवासी डीटीएडबीएड (टीईटी/ सीटीईटी) कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

            पेसा क्षेत्रातील शिक्षकांच्या सर्व रिक्त जागा भरण्याबाबत सामान्य प्रशासन आणि वित्त विभागाची परवानगी घेतली जाईल. तसेच ही भरती प्रक्रिया राबविताना त्याच क्षेत्रातील उमेदवारांना प्राधान्य दिले जाईलअसे श्रीमती वंदना कृष्णा यांनी यावेळी सांगितले.

०००००


 हसून हसून पोट दुखेल  बाबाआजोबा आता तुमचा जमाना गेला...आता आमच्या नवीनम्हणी ऐका...आधुनिक युगाच्या अफलातून आधुनिक म्हणी-🍥

१) राहायला नाही घर म्हणे लग्न कर !🍥२) सासु क्लबमध्ये सुन पबमध्ये !🍥३) खिशात नाही डोनेशन, घ्यायला चालला ऍडमिशन !🍥४) मुलं करतात चॅनेल सर्फ़, आईबाप करतात होमवर्क !🍥५) चुकली मुलं सायबरकॅफ़ेत !🍥६) चुकल्या मुली ब्युटीपार्लरमध्ये !🍥७ ) ज्या गावचे बार, त्याच गावचे हवालदार !🍥८) नाजुक मानेला मोबाईलचा आधार !🍥९) मनोरंजन नको रिंगटोन आवर !🍥१०) स्क्रिनपेक्षा एस एम एस मोठा !🍥११) जागा लहान फ़र्निचर महान !🍥१२) उचलला मोबाईल लावला कानाला !🍥१३) रिकाम्या पेपरला जाहिरातिंचा आधार !🍥१४) काटकसर करुन जमवलं, इंकम टॅक्समध्ये गमावलं 🍥१५) साधुसंत येती घरा, दारंखिडक्या बंद करा !🍥१६) ज्याची खावी पोळी, त्यालाच घालावी गोळी🍥१७) एकमेका पुरवू कॉपी, अवघे होऊ उत्तीर्ण !🍥१८) लांबून देखणी, जवळ आल्यावर चकणी !🍥१९) चोर्या करुन थकला आणि शेवटी आमदार झाला🍥२०) आपले पक्षांतर, दुसर्याचा फुटीरपणा !🍥२१) प्रयत्ने लाईनीत उभे राहता रॉकेलही मिळे !🍥२२) अन्यायाचा फास बरा, पण चौकशीचा त्रास आवरा !🍥२३) जया अंगी खोटेपण, तया मिळे मोठेपण !🍥२४) एल.एल.बी झालो अन भिकेला लागलो !🍥२५) सरकार जेवू घालीना, पदवी भिक मागू देईना 🍥२६) वशिल्याच्या नोकरीला इंटरव्ह्यु कशाला !🍥२७) वयही गेले, पैसेही गेले, हाती राहीले दाखले !🍥२८) घोड्याच्या शर्यतीत वशिल्याचे गाढव पुढे !🍥२९) साहेबापुढे वाचली गीता, कालचा मेमो बराहोता !🍥३०) गाढवापुढे वाचली गीता वाचणारा गाढव होता !🍥३१) स्मगलींगचे खाणार, त्याला दाऊद देणार !🍥३३)न्हाव्यावर रुसला अन जंगल वाढवून बसला!🍥३४) पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा !🍥३५) पुढार्याचं मुळ व हॉटेलची चूल पाहु नये !🍥३६) नाव सुलोचनाबाई, चष्म्याशिवाय दिसत नाही !🍥३७) नाव गंगूबाई, आंघोळीला पाणी नाही!🍥३८) घरात नाही दाणा आणी म्हणे बर्शन आणा !🍥३९) घरावर नाही कौल पण अॅंटीनाचा डौल !🍥४०) घाईत घाई त्यात चष्मा नाही !🍥४१) रिकामा माळी ढेकळ फोडी !🍥४२) घरोघरी मॉडर्न पोरी !🍥४३) ओठापेक्षा लिपस्टीक जड !🍥४४) नाकापेक्षा चष्मा जड !🍥४५) अपुर्या कपडयाला फॅशनचा आधार !🍥४६) बायकोची धाव माहेरापर्यंत !🍥४७) गोष्ट एक चित्रपट अनेक !🍥४८) काम कमी फाईली फार!🍥४९) लाच घे पण जाच आवर !🍥५०) मंत्र्याच पोर गावाला घोर !🍥५१) मरावे परी मूर्तिरुपे उरावे !🍥५२) नटीच्या लग्नाला सतरा नवरे !🍥५३) मिळवत्या मुलीला मागणी फार !🍥५४) रिकामी मुलगी शृंगार करी!🍥५५) प्रेमात पडला हुंडयास मुकला !🍥५६) दुरुन पाहुणे साजरे !🍥५७) ऑफीसात प्यून शहाणा !🍥५) सत्ता नको पण खैरनार आवर !🍥५९) एक ना धड भाराभर पक्ष !🍥६०) हरावे परी डिपॉझिटरुपी उरावे !🍥६१) थेंबे थेंबे लोकसंख्या वाढे !🍥६२) तोंडाला पदर गावाला गजर !🍥६३) कष्टानं कमावलं बाटलीनं गमावलं !🍥६४) रात्र थोडी डास फार !🍥६५) शिर सलामत तो रोज हजामत !🍥६६) नेता छोठा कटआऊट मोठा !🍥६७) चिल्लरपुरता सत्यनारायण!🍥६८) दैव देते आयकर नेत !🍥६९) डीग्री लहान वशिला महान!

Tuesday, 9 November 2021




 

 गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗


मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा.


मग काय ! 


गाडी सुसाट !!


🚗🚗🚗🚗


:


आणि अचानक वळणावर एक गाढव आडवं आलं.


😲 😳 🥵🥶


गीतानी कर्ररररकचू्..न ब्रेक दाबला.


: 😫😤😤😖😖


वाटलं आता जाऊन धडकतेकी काय .. !!


गीतानी डोळे घट्ट मिटून घेतले.. 😣😫


आणि.....


:


:


:


:


:


हुश्श.....!!!


:


:


:

:

:

:

:

:

:

:....

गाडी गाढवाच्या अगदी जवळ जाऊन, त्याच्या पुढचं थांबली. व अशाप्रकारे,


*गाढवा पुढे वाचली गीता.*

😆😂😎


नंतर घाबरलेली गीता घरी आली आणि घडलेली कथा आपला नवरा हरीला सांगितली. तिने हट्टच धरला की ज्या गाढवामुळे माझे प्राण वाचले त्याला घरी घेऊनच या. 

मग बिचारा हरी गाढवाकडे गेला. पण गाढवही हट्टी. ते काही तयार होईना.

शेवटी...

..

...

...

...

....

....

....

....

....

....

.......


*अडला हरी अन् गाढवाचे पाय धरी..*


शेवटी कसाबसा हरी गाढवाला घरी घेवुन आला.


उन्हातून आल्यामुळे गीता ने गाढवास बसायला खुर्ची दिली आणि पाणी व गुळाचा तुकडा खावयास दिला .. 


गाढव पाणी गटा गटा प्यायला आणि मग गूळ खावयास लागला. 


अचानक काय झाले कळ लेच नाही. गाढव पाण्याच्या गुळण्या करू लागले. 


हरीला आणि गीताला हे कोडे आज पर्यंत सुटले नाही 


..

..

..

..

..

..

..

..

..

*गाढवाला गुळाची चव काय* 

😂😝😝😀

लेखक काहीही करु शकतात🤣

 महानगरपालिका पोटनिवडणुकांसाठी

12 नोव्हेंबरला प्रारूप मतदार याद्या

 

            मुंबईदि. 9 (रानिआ): विविध सहा महानगरपालिकांमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 12 नोव्हेंबर 2021 रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यावर 16 नोव्हेंबर 2021 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतीलअशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली.

            श्री. मदान यांनी सांगितले कीभारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या व 1 नोव्हेंबर 2021 रोजी अस्तित्वात आलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या याद्या या पोटनिवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. त्या प्रभागनिहाय विभाजित केल्यानंतर 12 नोव्हेंबर 2021 रोजी प्रारूप स्वरूपात प्रसिद्ध करण्यात येतील. त्यावर 16 नोव्हेंबर 2021 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. त्यानंतर 17 नोव्हेंबर 2021 रोजी प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. 22 नोव्हेंबर 2021 रोजी मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध केल्यानंतर 23 नोव्हेंबर 2021 रोजी मतदान केंद्रनिहाय अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील.

            प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुकामतदाराचा चुकून प्रभाग बदलणेविधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या करण्यात येतातअशीही माहिती श्री. मदान यांनी दिली.

            विविध महानगरपालिकानिहाय रिक्त पदे अशी: धुळे- 5,  अहमदनगर- 9नांदेड-वाघाळा- 13मीरा-भाईंदर- 10ड आणि 22सांगली-मिरज-कुपवाड- 16अ आणि  पनवेल- 15ड.

 लोकसहभागातून स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यात यावा

- मुख्य सचिव सीताराम कुंटे

            मुंबई, दि. 9 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र शासनाने आखून दिलेल्या संकल्पनेनुसार आणि लोकसहभागातून राज्यात सर्वत्र कार्यक्रमांचे उत्साहाने आयोजन करून त्यांची माहिती यासाठी निर्मित स्वतंत्र संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात यावीअशा सूचना मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे आयोजित बैठकीत  दिल्या.

            भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला पुढील वर्षी 75 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने 15 ऑगस्ट 2022 पर्यंत 75 आठवडे राज्यभर विविध कार्यक्रम राबवून अमृतमहोत्सवी वर्षाचा सोहळा साजरा करण्यात येत आहे.  स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमांबाबत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी गृह विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तवमहसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितिन करीरमाहिती - तंत्रज्ञान विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्लासांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजयउपसचिव विलास थोरात व संबंधित अधिकारी उपस्थित होते. सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरेदर्शनिका विभागाचे संचालक डॉ. दिलीप बलसेकर उपस्थित होते. राज्यातील सर्व विभागीय आयुक्तजिल्हाधिकारीमहापालिका आयुक्तपोलीस आयुक्तपोलीस अधीक्षक दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.

            स्वातंत्र्याच्या 75 वर्षानिमित्त आयोजित करावयाच्या कार्यक्रमांमध्ये जास्तीज जास्त स्थानिकयुवाविद्यार्थी यांचा सहभाग घ्यावा.  खासगी संस्थास्थानिक स्वराज्य संस्थालोकप्रतिनिधी यांच्या सहकार्याने आणि सहभागाने उत्साहाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन होणे गरजेचे असल्याचेहीमुख्य सचिव श्री.कुंटे यांनी सांगितले.

            गृह विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनीपोलीस बँड पथकाद्वारेही देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे. अज्ञात स्वातंत्र्यसेनानीस्वातंत्र्यकालीन महत्त्व असलेली स्थळे प्रकाशात आणण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावेअशा सूचना दिल्या.

            महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर यांनी सूचना केली की स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे फक्त उत्सवी स्वरूप न राहता कायमस्वरूपी स्मरण राहिलअसे भरीव स्मारक उभे करण्याबाबतही सर्व संबंधितांनी प्रस्तावित करावे.

            सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय यांनी प्रास्ताविक केले तर सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी सादरीकरण केले.

            विविध जिल्ह्यांत आजवर  झालेल्या कार्यक्रमांची माहिती संबंधित विभागीय आयुक्तांनी दिली. दर्शनिका विभागाचे संचालक डॉ.दिलीप बलसेकर यांनी प्रत्येक जिल्ह्याचे विशेष पुरवणी गॅझेट तयार करण्यासंदर्भात व गॅझेटच्या आकृतीबंधाबाबत माहिती दिली. भारतीय स्वातंत्र्य आंदोलन इतिहास आधार साहित्य खंड १ ( सन १८१८) ते खंड १३ भारत छोडो डिसेंबर १९४२ या  ग्रंथाचे चार ई बुक संच यावेळी  मुख्य सचिव यांना सांस्कृतिक कार्य सचिव यांच्या हस्ते भेट देण्यात आला.

०००


 पेट्रोल पंपढाबेहॉटेल्सला पोचमार्गासाठी परवानगीच्या प्रक्रियेमध्ये येणार सुसूत्रता

राज्य व जिल्हा मार्गावरून पोचमार्ग बांधण्यासाठी

परवानगीची नवी कार्यपद्धती लागू

- सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची माहिती

 

            मुंबईदि. 9 : राज्य मार्गप्रमुख जिल्हा मार्ग आदी मार्गांवरून पेट्रोलपंपासह सर्व्हिस स्टेशनरिसॉर्टसहॉटेल्सढाबे यांसारख्या खासगी आस्थापनांना  पोचमार्ग बांधण्यास परवानगी देण्यासाठी नवीन कार्यपध्दती लागू केली आहे. या कार्यपद्धतीमुळे ऑईल कंपन्या व इतर खाजगी आस्थापनांना पोचमार्ग बांधण्यास परवानगी मिळविण्यामधील अडचणी दूर झाल्या असून परवानगीच्या प्रक्रियेमध्ये सुसूत्रता आली आहेपरिणामी शासनाच्या 'ईज ऑफ डुईंग बिझनेसया संकल्पनेस चालना मिळाली आहेअशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.

            सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे रस्त्याच्या कडेला पेट्रोलपंपासह सर्व्हिस स्टेशन्सरिसॉर्टसहॉटेल्सढाबे यांना राष्ट्रीय महामार्गराज्यमार्ग,  प्रमुख जिल्हामार्ग इत्यादी मार्गावरुन पोचमार्गाची निकड भासतेत्या पोचमार्गासाठी परवानगी प्रस्तावांची छाननी इंडियन रोड काँग्रेस व केंद्र शासनाच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या 2003 च्या परिपत्रकातील तरतुदीनुसार केली जात होती.

            केंद्र शासनाच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या दि. 26 जून 2020 च्या परिपत्रकान्वये पेट्रोलपंपासह सर्व्हिस स्टेशनरिसॉर्टहॉटेलढाबे यांना राष्ट्रीय महामार्गांवरुन पोचमार्ग बांधण्याकरीता नव्याने सूचना जारी केल्या आहेत. या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाने दि.4 सप्टेंबर 2020 रोजीच्या परिपत्रकान्वये राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग यांना लागू केल्या होत्यामात्रया सूचना या केवळ राष्ट्रीय महामार्गांकरीता असल्यामुळे त्या राज्यमार्गप्रमुख जिल्हा मार्ग यांना लागू करताना अडचणी येत होत्या व त्यामुळे क्षेत्रीय स्तरावर पोचमार्ग परवानगीच्या प्रस्तावांची पडताळणी करणे जिकिरीचे ठरत होते.

            याबाबत ऑईल कंपन्यालोकप्रतिनिधी  आदींकडून शासनाकडे तक्रारी आल्या होत्या. या समस्येचे निराकरण करण्याकरिता  सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी पुढाकार घेऊन या निकषांमध्ये राज्यातील रस्त्यांच्या दृष्टीने रस्त्यांच्या दर्जानुरूप सुधारणा करण्यासाठी सा. बां. प्रादेशिक विभाग पुण्याच्या मुख्य अभियंत्यांच्या अध्यक्षतेखाली एक त्रिसदस्यीय समिती गठित केली.

            या समितीने केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनाइंडियन रोड काँग्रेसची मानकेमध्य प्रदेशपंजाबउत्तर प्रदेशबिहार व हरियाणा या राज्यांनी तयार केलेले निकषविविध न्याय निर्णयऑईल कंपन्यांच्या प्रतिनिधींच्या सूचना यांचा रस्ते सुरक्षा व सुरळीत वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने तुलनात्मक व सखोल अभ्यास करुन पेट्रोलपंपासह सर्व्हिस स्टेशन व रिसॉर्टहॉटेलढाबे यांसारख्या खासगी आस्थापनांना राज्यमार्गप्रमुख जिल्हामार्ग इत्यादी मार्गावरुन पोचमार्ग बांधण्यास परवानगी देण्याकरिताची सुधारित मार्गदर्शक तत्वे दि. 9 जून 2021 रोजी शासनास अहवालाव्दारे सादर केली.

            समितीच्या अहवालानंतर राज्यातील राज्यमार्गप्रमुख जिल्हामार्ग इत्यादी मागांवरुन पोचमार्ग बांधण्यास परवानगी देण्यासाठी अवलंबिण्यात येणारी प्रचलित कार्यपध्दती बदलून राज्य शासनाने 13 ऑक्टोबर 2021 च्या शासन निर्णयानुसार पोचमार्ग बांधण्यास परवानगी देण्यासाठी नवी कार्यपद्धती लागू केली आहे. या कार्यपद्धतीमुळे ऑईल कंपन्या व इतर खाजगी आस्थापनांना राज्यजिल्हा मार्गावरून पोचमार्ग बांधण्यास परवानगी मिळविण्यात सुसूत्रता येणार असल्याचेही सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री.चव्हाण यांनी सांगितले.

०००००

Featured post

Lakshvedhi