Thursday, 19 November 2026

विविध समाजघटकांच्या मागण्यांवर विचार

 विविध समाजघटकांच्या मागण्यांवर विचार

            राज्य शासन राज्यातील सर्व समाज घटनांना विविध योजनाच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगून महसूल मंत्री  बावनकुळे म्हणाले, धनगर, वाडी, कोळी यांसह भटक्या-विमुक्त समाजातील विविध घटकांच्या मागण्यांवरही बैठकीत चर्चा झाली. या समाजघटकांना घरे, वसाहती आणि जागा उपलब्ध करून देण्यासह त्यांच्या विविध प्रश्नांवर सकारात्मक विचार करण्यात आला. विविध समाजांचे प्रतिनिधी आपली निवेदने शासनाकडे सादर करीत असून, प्रत्येक समाजाच्या न्याय्य मागण्यांचा ओबीसी मंत्रिमंडळ उपसमिती विचार करीत असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

 

            ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपसमितीला आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. ओबीसी समाजाच्या हक्काचे लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजेत, यासाठी उपसमितीच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा आणि देखरेख केली जात आहे. ओबीसी समाजातील विकासासाठी शासनाकडून जास्तीत जास्त मदत आणि पुरेसा निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

 

            महात्मा जोतिबा फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त  विभागांनी विविध उपक्रम राबवावेत अशी सूचनाही त्यांनी बैठकीत केली.

 


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi