राज्यात वयानुसार उंची कमी असलेल्या बालकांचे प्रमाण सुमारे साडेएकोणतीस टक्के आहे. पुरेसा व विविध पोषणघटकांचा समावेश असलेला आहार मिळणाऱ्या बालकांचे प्रमाण केवळ नऊ टक्के आहे. आदिवासी भागात ही समस्या तुलनेने अधिक तीव्र असल्याने तेथे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता व्यक्त केली.
प्रारंभिक बालविकासासाठी अभियान पद्धतीने काम केल्यास शाश्वत विकासाच्या सात उद्दिष्टांतील 21 निर्देशाकांवर प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष सकारात्मक परिणाम साधता येईल. गरोदर महिलांमधील रक्तक्षय, बालकांचे कुपोषण, लसीकरण, संस्थात्मक प्रसूती, बालमृत्यू, शालेय प्रवेश, गळती, साक्षरता आणि उच्च शिक्षणातील सहभाग या बाबींशी पहिल्या एक हजार दिवसांचा थेट संबंध असल्याचेही त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment