Saturday, 10 October 2026

केंद्रीय पथकाकडून सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी

 केंद्रीय पथकाकडून सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी


· उपळाई ठोंगे, पानगाव येथे सोयाबीन व तूर पिकांची पाहणी; साठवण तलाव कोरडा, ११ तालुके दुष्काळग्रस्त


· केंद्रीय पथकाकडून पानगाव साठवण तलावाची पाहणी, जिल्ह्यात सध्या १०८ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू


            सोलापूर, दि. ९ (जिमाका) : खरीप हंगामातील दुष्काळी परिस्थिती आणि पीक नुकसानीची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी केंद्र शासनाच्या आंतर-मंत्रालयीन केंद्रीय पथकाने बार्शी तालुक्यातील उपळाई ठोंगे व पानगाव येथे प्रत्यक्ष शेतपाहणी केली. पावसाअभावी जळालेली सोयाबीनची पिके, तूर पिकांची स्थिती आणि पानगाव येथील पूर्णपणे कोरडा पडलेला साठवण तलाव यांची पाहणी करून पथकाने शेतकऱ्यांशी संवाद साधला.


            केंद्रीय पथकाचे नेतृत्व कृषी व शेतकरी कल्याण विभागाच्या पीक विभागाचे संचालक डॉ. के. पोन्नुसामी करीत आहेत. पथकामध्ये पेयजल व स्वच्छता विभागाचे टीम लीडर अबसार अहमद खान आणि अन्न व सार्वजनिक वितरण विभागाचे सहाय्यक संचालक सुमित शर्मा यांचा समावेश आहे. कृषी आयुक्त सूरज मांढरे हेदेखील पथकासोबत उपस्थित होते.



No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi