Saturday, 17 October 2026

दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी व्यावसायिक पाठबळ आवश्यक

  

दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी व्यावसायिक पाठबळ आवश्यक

– राज्यपाल जिष्णु देव वर्मा

'मिट्टी कॅफे' हा सामाजिक समावेशकता आणि मानवी संवेदनशीलतेचा प्रेरणादायी उपक्रम;

राज्यपालांच्या हस्ते ओबेरॉय स्कायसिटी मॉल येथे ‘मिट्टी कॅफे’चे उद्घाटन

 

मुंबई, दि. 17 : दिव्यांग व्यक्तींच्या क्षमता ओळखून त्यांना योग्य संधी, प्रोत्साहन आणि सन्मान दिल्यास त्या स्वावलंबी होऊन समाजाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतात. व्यावसायिक उपक्रमांमध्ये सामाजिक बांधिलकी, करुणा आणि सेवाभाव यांची जोड दिल्यास त्यातून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणता येते. दिव्यांग व्यक्तींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत त्यांच्यातील कौशल्य आणि आत्मविश्वासाला व्यासपीठ देणारा ‘मिट्टी कॅफे’ हा सामाजिक समावेशकतेचा प्रेरणादायी उपक्रम असल्याचे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.

राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते मुंबईतील ओबेरॉय स्कायसिटी मॉल येथे ‘मिट्टी कॅफे’चे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार अतुल भातखळकर, उत्तर प्रदेश विधानसभेचे माजी आमदार सुभाष पासी, ज्येष्ठ पत्रकार कुमार राकेश, मिट्टी कॅफेच्या संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी अलिना आलम, स्कायसिटी मॉलचे प्रतिनिधी तसेच ‘प्रोजेक्ट मुंबई’चे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी शिशिर जोशी उपस्थित होते. यावेळी मिट्टी कॅफेमध्ये कार्यरत दिव्यांग सदस्यांचे पालकही उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi