Monday, 19 October 2026

हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन, उपदान व वेतन फरकाबाबत वित्त विभागाचा अभिप्राय घेऊन कार्यवाही करावी

  

हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन, उपदान व वेतन फरकाबाबत

वित्त विभागाचा अभिप्राय घेऊन कार्यवाही करावी

– सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचे निर्देश

 

मुंबई, दि. १३ : हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांना पेन्शन व उपदानाचा लाभ देणे, सहाव्या वेतन आयोगाची थकीत वेतन फरकाची रक्कम अदा करणे तसेच सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत वित्त विभागाचा अभिप्राय घेऊन उचित कार्यवाही करावी, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले.

 

राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली निर्मल भवन येथे हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत बैठक झाली. या बैठकीत कर्मचाऱ्यांचे एकवेळ समावेशन, पेन्शन व उपदानाचा लाभ, सहाव्या वेतन आयोगाची थकीत फरकाची रक्कम, सातवा वेतन आयोग लागू करणे तसेच हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांचे अनुकंपा तत्वावर समावेशन या विषयांवर सविस्तर चर्चा झाली.

 

बैठकीस संचालक डॉ. विजय कंदेवाड, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या उपसचिव डॉ. उर्मिला जोशी, अवर सचिव डॉ. श्वेता सावदेकर, मुख्यमंत्री कार्यालयाचे समन्वयक चेतन भोजकर, आरोग्य सेवा कर्मचारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ तसेच महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते. आयुक्त काटकर आणि स्पार्क फाउंडेशनचे महेश पोहरणेकर यांनी दृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभाग घेतला.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi