Saturday, 3 October 2026

धारावी ही केवळ झोपडपट्टी नाही; ती एक मोठे आर्थिक इंजिन आहे.

 धारावी ही केवळ झोपडपट्टी नाही; ती एक मोठे आर्थिक इंजिन आहे. येथे कुंभारवाड्यातील मातीभांडी उद्योग, चामड्याचा व्यवसाय, अन्नप्रक्रिया, प्लास्टिक पुनर्चक्रीकरण तसेच अन्य लघु-मध्यम उद्योगांमधून मोठी अर्थव्यवस्था उभी राहिली आहे. या उद्योगांचा सन्मान राखत त्यांना अधिक चांगली आणि नियोजित कार्यस्थळे उपलब्ध करून देण्याचा विचार पुनर्विकास आराखड्यात करण्यात आला आहे. धारावीची विद्यमान सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक ओळख जपत तिचे सर्वंकष नागरी परिवर्तन करण्याचा हा प्रयत्न आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात होत असलेल्या नागरी परिवर्तनाचे हे आदर्श उदाहरण असल्याचेही त्यांनी सांगितले.


मुख्यमंत्री म्हणाले, धारावी पुनर्निर्माण प्रकल्प नेमका कसा असेल, आजची धारावी कशी आहे आणि भविष्यात तिचे स्वरूप कसे बदलणार आहे, याची ‘रिअल टाइम’ माहिती ‘धारावी एक्सपिरियन्स सेंटर’मध्ये सर्वांना मिळणार आहे. पुनर्विकासानंतर आपले काय होणार, हा धारावीकरांच्या मनातील प्रश्न आणि त्यासंबंधीचा संभ्रम दूर करण्यासाठी हे केंद्र महत्त्वपूर्ण ठरणार आहे. धारावीतील रहिवाशांना मिळणारी घरे, रस्ते, खुली मैदाने, सामाजिक सुविधा आणि रोजगाराच्या संधी यांची माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे हे केंद्र नागरिक, हितधारक आणि देशभरातील नागरी नियोजनाचा अभ्यास करणाऱ्यांसाठीही उपयुक्त ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. 


धारावी एक्सपिरियन्स सेंटरमध्ये आधुनिक दृश्य-श्राव्य आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून धारावीच्या वर्तमानापासून भविष्यातील स्वरूपापर्यंतचा प्रवास उलगडण्यात आला आहे. या संपूर्ण केंद्राची पाहणी मुख्यमंत्र्यांनी केली. यावेळी प्रख्यात गायक शंकर महादेवन यांनी गायिलेल्या, बदलत्या धारावीचे चित्र मांडणाऱ्या ‘धारावी का कल’ या विशेष गीताचे लाँचिंग आणि ‘मेरे सपनों की धारावी’ या पुस्तकाचे प्रकाशनही यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi